Ticker

10/recent/ticker-posts

mazi shala sundar shala registration|माझी शाळा सुंदर शाळा

 mazi shala sundar shala registration|माझी शाळा सुंदर शाळा 

माझी शाळा सुंदर शाळा फ्लेक्स 


Majhi Shala sundar shala flex


SCERT महाराष्ट्र मार्फत 
मार्गदर्शक व्हिडिओअभियानाची उद्दिष्टे

 • 'राज्यातील शाळांमध्ये पायाभूत सोयी सुविधा वाढविणे

 • 'शाळांमध्ये शिक्षणाबाबत स्पर्धात्मक वातावरण तयार करणे,विद्यार्थ्यांचा निर्णय प्रक्रियेत सहभाग वाढविणे

 • आरोग्य, पर्यावरण, कौशल्य विकास आर्थिक साक्षरता या विषयांवर उपक्रम राबविण्यासाठी शाळांना

 • प्रोत्साहित करणे 'यासाठी राज्यात 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा ' अभियानाचा ५ डिसेंबरपासून प्रारंभ करण्यात आला आहे.


अभियानाचे स्वरूप

 • ४५ दिवसांच्या कालावधीकरिता अभियान चालू राहील. या

 • अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन या ४५ (१ जानेवारी ते १५ फेब्रुवारी )दिवसात आवश्यक राहील.


 • " अभियानाचे स्वरूपः-४.१ अभियानात सहभागी होऊन एकमेकांशी स्पर्धा करणाऱ्या शाळांना खालील गुणांकन देण्यात येईल.


 • अ) विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांचे आयोजन व त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग – एकूण ६० गुण

 • "ब) शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम व त्यातील विविध घटकांचा- एकूण ४० गुण

अभियान स्तर

वर्ग अ व वर्ग ब च्या महानगरपालिकांचेकार्यक्षेत्र :-

 • अ) शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा

 • ब) उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा


शाळा व परिसराचे सौंदर्यीकरण 10 गुण

विद्यार्थ्यांमार्फत वर्ग सजावट व शाळा सजावट -२ गुण

शाळेच्या आवारात पर्यावरण संरक्षणास हातभार लावणाऱ्या वृक्षांचे रोपण व जोपासना- ३ गुण

शाळेच्या इमारतीची व असल्यास संरक्षक भिंतीची रंगरंगोटी- २ गुण

प्रबोधनात्मक सुविचार, चित्रे इत्यादीद्वारे बोलक्या भिंतीची उभारणी - ३ गुण


विद्यार्थ्यांचा विविध उपक्रमातील, व्यवस्थापनातील व

निर्णय प्रक्रियेतील सहभाग

 • विद्यार्थी मंत्रिमंडळ / बालसंसद स्थापन करून त्याद्वारे शाळेतील कामकाज पार पाडणे - २ गुण

 • प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेच्या अनुषंगाने नियोजन व अंमलबजावणी यामधील विद्यार्थ्यांचा सहभाग - २ गुण

 • प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेच्या अनुषंगाने शाळेच्या आवारात परसबागेची निर्मिती करून त्याद्वारे आरोग्यदायी भाज्यांची लागवड यामधील विद्यार्थ्यांचा सहभाग - ३ गुण

 • मेरी माटी मेरा देश या उपक्रमातील विद्यार्थ्यांचा सहभाग - ३ गुण

 • शाळेची बचत बँक / पैशाचा योग्य विनियोग व व्यवस्थापन यातीलविद्यार्थ्यांचा सहभाग - २ गुण

 • नवभारत साक्षरता अभियानातील शाळेचा सहभाग - ३ गुणशैक्षणिक गुणवत्ता व व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक अवांतर उपक्रम :- गुण १०


 • विद्यार्थ्यांच्या शाळेतील उपस्थितीचे प्रमाण- २ गुण

 • 'महावाचन चळवळीतील विद्यार्थ्यांचा सहभाग - २ गुण •

 • 'वक्तृत्व स्पर्धा/लेखन स्पर्धा / संगीत स्पर्धा / इतर कला स्पर्धा यांचे आयोजन व त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग - ३ गुण

 • यथास्थिती NCC/Scout Guide / MCCव समान प्रकारच्या इतर

 • उपक्रमातील विद्यार्थ्यांचा सहभाग - ३ गुणशाळेची इमारत व परिसराची स्वच्छता १० गुण


 • स्वच्छता मॉनिटर अभियान - टप्पा-२ मधील सहभाग (हा टप्पा राबविण्यासाठी निधीसह आवश्यक तो उपाययोजना राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांनी करावी.) १० गुणराष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन देण्याबाबतचे उपक्रम ५ गुण


प्रत्येक शाळेने देशातील कोणतेही एक राज्य निवडून त्याचा सांस्कृतिकवारसा जसे- पेहराव,खानपान, सण-उत्सव इत्यादी बाबत तसेच राष्ट्राच्या उभारणीत त्या राज्याचे योगदान महती दर्शविणारे सादरीकरण- ५ गुण


विविध क्रीडास्पर्धाचे आयोजन १० गुण

विविध क्रीडास्पर्धाचे आयोजन:- यात अधिकाधिक देशी

खेळांना प्राधान्य- १० गुण(ब)

शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम व त्यातील विविध घटकांचा सहभाग

आरोग्य :- १५ गुण

 • विद्यार्थी व शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या करिता आरोग्यतपासणी शिबीर यात आरोग्याची सर्वसाधारण तपासणी ५ गुण

 • शाळेत प्रथमोपचार पेटीची उपलब्धता - २ गुण

 • बदलत्या जीवन शैलीमुळे लहान वयातच होऊ लागलेल्या लठ्ठपणा, मधुमेह व डोळ्यांचे विकार यासारख्या आजारांची माहिती व त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय यासाठी तज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शनपर व्याख्यान- ३ गुण

 • किशोरवयीन विद्यार्थिनीसाठी मासिक पाळी व्यवस्थापनाबाबत समुपदेशन सत्राचे आयोजन -३ गुण

 • हात स्वच्छ धुवण्याचे योग्य पद्धतीचे प्रात्यक्षिक व त्यासाठीची सुविधा- २ गुण


आर्थिक साक्षरता व कौशल्य विकास १० गुण

 • विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनापासूनच आर्थिक साक्षरता रुजविण्याच्या दृष्टीने पैशाचे नियोजन, गुंतवणूक, बँकाचे व्यवहार, कर्ज व व्याज प्रणाली इत्यादी बाबत तसेच आर्थिक व्यवहाराकरिता UPI सारख्या आधुनिक साधनांचा वापर करताना घ्यावयाची काळजी याबाबत तज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शनपर व्याख्यान- ५ गुण

 • स्वयंरोजगार, व्यवसाय, व्यापार, उद्योग अशा क्षेत्रात भविष्यात करीअर घडविण्यासाठी विशिष्ट कौशल्यावर आधारित व्यवसाय शिक्षणाचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यासाठी तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन पर व्याख्यान- यात अशा अभ्यासक्रमांची ओळख, शिक्षण देणाऱ्या संबंधित संस्था, प्रवेश प्रक्रिया, भविष्यातील संधी इत्यादीबाबतची माहिती असावी - ५ गुण


 भौतिक सुविधा तसेच अध्यापन व अध्ययनाशी संबंधित आधुनिक साधनांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी कॉर्पेरेट कंपन्या, स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्ती इत्यादी घटकांकडून वस्तू व सेवा यांच्या स्वरुपात अधिकाधिक देणगी गोळा करण्यासाठीचे प्रयत्न -३ गुण


शाळा व्यवस्थापन समितीने पार पाडलेले अन्य कोणतेही प्रभावी कामकाज- २ गुण


तंबाखू मुक्त भाळा :- शाळेपासून किमान २०० मीटर अंतरावर तंबास्तू व तंबाखूजन्य

पदार्थांच्या विक्रीस बंदी - १ गुण


प्लास्टिक मुक्त भाळा: पर्यावरणास हानिकारक असलेल्या प्लास्टिकचा वापर शाळेच्या आवारात अथवा कामकाजात होणार नाही याची दक्षता - २ गुण


प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत विद्यार्थ्यांना पुरविण्यात येत असलेल्या पोषण आहायतील शिल्लक अन्नावर योग्य ती प्रक्रिया करून विल्डेवाट लावण्यासाठी अभिनव उपक्रम- २ गुण


 उपरोल्लेस्वित विद्यार्थकिंद्रित उपक्रम तसेच शाळा व्यवस्थापनांनी आयोजित करावयाचेbउपक्रम यामध्ये शाळेचे माजी विद्यार्थी, पालक, स्थानिक सेवाभावी संस्था इत्यादींचा शक्‍य असेल त्याठिकाणी अधिकाधिक सहभाग- ५ गुण

माहिती भरण्यासाठी खालील वेबसाईटवर भेट द्या.

https://education.maharashtra.gov.in/माझी शाळा सुंदर शाळा उपक्रम राबवणे शासन निर्णय


माहिती कशी भरावी यासाठी पीडीएफ CLICK HERE

माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात कोणती माहिती भरावीमाझी शाळा सुंदर शाळा गुणदान

माझी शाळा सुंदर शाळा दिशा दर्शक


माझी शाळा सुंदर शाळा कालदर्शिकाअ) शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा

ब) उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळाPost a Comment

0 Comments

Total Pageviews