उतारा वाचन मराठी | उतारा वाचन व त्यावरील प्रश्न | Utara Vachan Marathi
शरद ऋतु हा उन्हाळा आणि हिवाळा यांच्यामध्ये येतो.या सुंदर ऋतुत खूप बदल होतात. दिवस लहान होतो. झाडाच्या पानांचा रंग बदलतो. पाने हिरवी न राहता तांबुस लाल, पिवळी आणि नारंगी रंगाची होतात. वस्तुतः पाने हिरवी राहण्यासाठी झाडांना सूर्यप्रकाश आवश्यक असतो. ऊन न मिळाल्याने पाने पिवळी होतात. गवत आता फक्त ओलसर न राहता त्यावर गोठलेले दवबिंदू पसरतात, कारण तापमान हिमबिंदूपर्यंत खाली येते. जनावरे हिवाळ्याच्या दिवसांसाठी पुरेसे खाद्य साठवू लागतात. हे बदल तेव्हा होतात जेव्हा आपण उन्हाळ्याच्या उष्णतेकडून हिवाळ्याच्या थंडीसाठी तयार होत असतो.
0 Comments