Ticker

10/recent/ticker-posts

PAT| पायाभूत चाचणी गुण

 विषय : पायाभूत चाचणीचे गुण (महाराष्ट्र) या चॅटबॉटवर शिक्षकांनी नोंदविणे बाबत प्रशिक्षण
 महत्वाची सूचना......


VSK राज्य समन्वयक यांचेशी आपल्याला आलेल्या काही प्रॉब्लेम बाबत चर्चा झाल्या नंतर राज्यस्तरावर याबाबत technical team सोबत चर्चा सूरु आहे आपण खालील मुद्द्याच्या अनुषंगाने PAT चे काम करा ज्यांचे शालार्थ ID आहेत अशाच शिक्षकांनी गुण भरावेत,आश्रमशाळा व अन्य सेवार्थ मधील शिक्षकांनी भरू नये इयत्ता 5 वि इंग्रजी विषयाच्या गुणांकनात तफावत असल्याने सध्या इंग्रजी वगळून इतर गुण भरावेत,2 दिवसात इंग्रजी बाबत बदल होणार आहे. जे विद्यार्थी BOT मध्ये दिसत नाहीत त्यांचे गुण भरता येणार नाही,याबाबत DATA UPDATE चे काम सुरू आहे. काही वेळा इयत्ता select होते मात्र विद्यार्थी दिसत नाही ,काळजी करू नका ते नंतर भरण्यासाठी वेळ दिला जाईल जे विद्यार्थी दुसऱ्या शाळेत किंवा दुसऱ्या शाळेतून आलेले आहेत. अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत हजर किंवा गैरहजर काही करु नयेत. ते विद्यार्थी तसेच असुदेत. काही शिक्षकांच्या अन्य ठिकाणी बदल्या झाल्याने सध्याच्या शाळेत नाव दिसत नाही,त्या ठिकाणी सध्या जैसे थे असू द्या ज्या शाळेवर शिक्षक नाहीत मात्र अन्य शाळेतील शिक्षक व्यवस्थापन करतात,अशा शाळेतील विद्यार्थ्यांचे गुण सध्या भरू नये. सप्टेंबर 2023 ला सर्व data update झाल्यानंतर त्या शाळेचे गुण भरता येतील. ..काळजी नसावीPDF

  1. App डाऊनलोड करण्यासाठी खालील चित्रावर स्पर्श करा.
ॲप डाऊनलोड केल्यानंतर खालील लिंक वर क्लिक करून पायाभूत चाचणी चे गुण भरा.


विद्या समिक्षा केंद्र (VSK) अंतर्गत SwiftChat ऍप मध्ये PATBot घेऊन PAT अंतर्गत पायाभूत चाचणीचे गुण PATBot मध्ये भरावयाचे आहेत. PATBot साठी लिंक:-http://bit.ly/PAT-MH      वरील विषयान्वये STARS प्रकlल्पामधील SIG - 2 Iimproved Learning Assessment System  नुसार सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत  पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी १ व संकलित मूल्यमापन चाचणी २ चे आयोजन  करण्यात येत  आहे.

राज्यात पायाभूत चाचणीचे आयोजन दि. १७ ते १९  ऑगस्ट २०२३ या कालावधीत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळामध्ये करण्यात आलेले होते. प्रथम भाषा (सर्व माध्यम), गणित (सर्व माध्यम), तृतीय भाषा- इंग्रजी या विषयांची पायाभूत चाचणी घेण्यात आलेली आहे. सदर पायाभूत चाचणी शिक्षकांनी तपासणेबाबत सूचित करण्यात आलेले होते. तसेच चाचणीचे गुण विद्या समीक्षा केंद्र (VSK) यांचेमार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या पोर्टलवर भरायचे असून याबाबतच्या सविस्तर सूचना यथावकाश देण्यात येतील असेही कळविण्यात आलेले होते.  

       *विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) हा चॅटबॉट पायाभूत चाचणीचे गुण भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. यावर पायाभूत चाचणीचे गुण शिक्षकांनी नोंदविणे आवश्यक आहे*. सदर चाटबॉटवर पायाभूत चाचणीचे गुण शिक्षकांनी कसे नोंदवावेत याच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना व याबाबतच्या *व्हिडीओची यु-ट्यूब लिंक  सोबत देण्यात येत आहे*. तसेच PAT (महाराष्ट्र) या चाटबॉटबाबतचे *दि.१४ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी ठीक १२:०० ते ०१:३० या कालावधीत यु-ट्युबद्वारे प्रशिक्षण शिक्षकांना देण्यात येईल*.संबधित  शिक्षकांना याबाबतचे प्रशिक्षण  यु-ट्युबद्वारे घेण्याबाबत कळविण्यात  यावे.  प्रशिक्षण घेतल्यानंतर शिक्षकांनी  *पायाभूत चाचणीचे गुण दि. १४ ते १८ सप्टेंबर २०२३ या कालावधीत PAT (महाराष्ट्र) या चॅटबॉटवर नोंदविणे आवश्यक आहे*.


जिल्हा शिक्षणाधिकारी(प्राथमिक)यांनी आपल्या कार्यालयातील एका अधिकाऱ्याकडे PAT (महाराष्ट्र) जिल्हा समन्वयक म्हणून जबाबदारी द्यावी .सदर जिल्हा समन्वयक यांनी जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) हा चॅटबॉटवर  पायाभूत चाचणीचे गुण कसे भरावेत याबाबत आवश्यकतेनुसार मार्गदर्शन करावे. तसेच ज्या शाळांमध्ये पायाभूत चाचणी घेण्यात आलेली आहे, अशा इयत्ता तिसरी ते आठवी शाळामधील विषयनिहाय विद्यार्थ्यांचे गुण चॅटबॉटवर नोंदविणेबाबत कार्यवाही करण्यात यावी. चॅटबॉटच्या बाबतीत तांत्रिक मदतीसाठी श्री. वेंकटेश अनंतरामन ८०००४९४७६४ यांचेशी संपर्क करण्यात यावा.


  तरी आपल्या अधिनस्थ शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक यांना याबाबतची आवश्यक कार्यवाही करण्याबाबत सूचित करण्यात यावे.


यु-ट्यूब लिंक:  https://www.youtube.com/live/oC0gFdpOOV0?si=18vatwfwV7tNslrk


   *राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र,     पुणे*

Post a Comment

0 Comments

Total Pageviews