Ticker

10/recent/ticker-posts

P. M.Poshan Shakti Nirman Yojana | Cook Cum Helper Payment |स्वयंपाकी व मदतनीस मानधनात वाढ

 

P. M.Poshan Shakti Nirman Yojana | Cook Cum Helper Payment |स्वयंपाकी व मदतनीस मानधनात वाढ

वाचा:१) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. शापोआ-२०१०/प्र.क्र.१८/प्राशि-४,

दि.०२ फेब्रुवारी २०११.

२) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. शापोआ-२०१८/प्र.क्र.१५६/एस.डी.-३,

दि. २३ जानेवारी, २०१९.

प्रस्तावना:प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत राज्यामध्ये स्वयंपाकी तथा मदतनीस कार्यरत आहेत. सदर स्वयंपाकी तथा मदतनीस यांना संदर्भाधिन दि. २३ जानेवारी, २०१९ च्या शासन निर्णयान्वये केंद्र हिस्सा रु.६००/- व राज्य हिस्सा रु.१००/- असे एकत्रित मिळून प्रति माह रु.१५००/इतके मानधन १० महिन्यांसाठी सध्यस्थितीत देण्यात येत आहे. सदर मानधनात वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत कार्यरत असणाऱ्या स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या मानधनाबाबत खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे.

1. प्रस्तुत योजनेंतर्गत कार्यरत स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या राज्य हिस्स्यातील मानधनामध्ये रु. १०००/- प्रति माह इतक्या रक्कमेची वाढ करण्यास मान्यता देण्यात येत आहे. त्यानुसार केंद्र व राज्य हिस्सा मिळून स्वयंपाकी तथा मदतनीस यांना प्रति माह रु.२५००/- इतके मानधन देय राहील.

शासन निर्णय क्रमांका शापोआ- २०२२/प्र.क्र.१३०/एस.डी. ३

॥ प्रस्तुत मानधनवाढ सन २०२३-२४ या आर्थिक वर्षापासून (माहे एप्रिल २०२३ पासून) वर्षातील १० महिन्यांसाठी लागू राहील.

ii. स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या मानधनातील केंद्र हिस्स्याची रक्कम वाढविण्यासाठी शिक्षण संचालक (प्राथ.), महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात यावा.

iv. सदर शासन निर्णय नियोजन आणि वित्त विभागाच्या मान्यतेने त्यांच्या अनुक्रमे अनौपचारिक संदर्भ क्र.३६४/१४७१, दि. १४/१२/२०२२ व क्र. १२८३ / व्यय-५,

दि.२९/१२/२०२२ अन्वये निर्गमित करण्यात येत आहेत.

प्रस्तुत शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर

उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेताक २०२३०२०९१७१७२१६६२१ असा आहे. हा

आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.Post a Comment

0 Comments

Total Pageviews