वीर बालदिवस | Veer Bal Diwas
विषय :- महाराष्ट्र राज्यात २६ डिसेंबरला सर्व शाळा, महाविद्यालयांमध्ये आणि शासकीय स्तरावर बालदिवस साजरा करणेबाबत.
संदर्भ :- मा.मंत्री,शालेय शिक्षण यांच्या कार्यालयाचे दि.०५.१२.२०२२ चे पत्र.
वरील विषयाबाबतचे संदर्भाधिन पत्र व त्यासोबत जोडलेले भारत सरकारच्या दि. ९ जानेवारी,२०२२ च्या राजपत्राचे कृपया अवलोकन करावे.
२.दहावे शिखगुरु श्री गुरु गोविंदसिंह यांचे बलिदानीपुत्र श्री जोरावरसिंह आणि श्री. फतेसिंह यांचे ९ वर्ष आणि ६ वर्ष वयाचे असताना शिख संप्रदायाचा सन्मान, अस्मिता हेतू आणि रक्षणार्थ २५ डिसेंबर १७०५ रोजी या दोन वीरपुत्रांनी सर्वोच्च बलिदान दिले. त्यांच्या गौरवार्थ २६ डिसेंबर हा दिवस वीर बालदिवस म्हणून साजरा करावा असे भारत सरकारने निर्देशित केले आहे.
३.त्याअनुषंगाने महाराष्ट्र सरकारने देखील या विषयाचे महत्व लक्षात घेऊन समाजातील विविध
घटकांमध्ये हा दिवस साजरा करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. त्यासाठी १९ डिसेंबरपासून ते २६ डिसेंबरच्या दरम्यान विविध ठिकाणी वीर बालदिवसाचे कार्यक्रम आयोजित केले जावे. वीर बालदिवसानिमित्त महाराष्ट्रातील शाळा महाविद्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी गुरुपुत्र श्री. जोरावरसिंह आणि श्री. फतेसिंह यांची बलिदानाची गाथा सांगितली जावी.
४.सदर पत्रामध्ये दिलेल्या सूचनांनुसार राज्यातील शाळांमध्ये वीर बालदिवस साजरा करण्याच्या अनुषंगाने आपल्या स्तरावरून राज्यातील सर्व शाळांना अवगत करण्यात यावे, ही विनंती.
विषय :- महाराष्ट्र राज्यात २६ डिसेंबरला सर्व शाळा, महाविद्यालये आणि शासकीय स्तरावर
वीर बालदिवस साजरा करणेबाबत..
संदर्भ :- महाराष्ट्र शासन पत्र क्र. संकीर्ण-२०२२/(७३९/२२) एसडी-४, दि. १२.१२.२०२२
उपरोक्त संदर्भीय विषयान्वये, दहावे शिखगुरू श्री. गोविंदसिंह यांचे बलिदानीपुत्र श्री. जोरावरसिंह आणि
श्री. फतेसिंह यांचे ९ वर्ष आणि ६ वर्ष वयाचे असताना शिख संप्रदायाचा सन्मान, अस्मिता हेतू आणि रक्षणार्थ २५ डिसेंबर१७०५ रोजी या दोन वीरपुत्रांनी सर्वोच्च बलिदान दिले. त्यांच्या गौरवार्थ २६ डिसेंबर हा दिवस वीर बालदिवस म्हणून साजरा करावा असे भारत सरकारने निर्देशित केले आहे.त्यानुषंगाने उपरोक्त संदर्भीय पत्रातील दिलेल्या सूचनानुसार राज्यातील शाळांमध्ये वीर बालदिवस
साजरा करण्याच्या अनुषंगाने आपल्या स्तरावरून राज्यातील सर्व शाळांना अवगत करण्यात यावे.
1. जनजागृती उपक्रम
2. साहित्यिक उपक्रम
सूचक उपक्रम
3. कला उपक्रम
4. साहिबजादा जोरावर सिंग जी आणि साहिबजादा फतेह सिंग जी यांच्या व्यक्तिमत्वाचे गुणवैशिष्ट्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठीचे उपक्रम
1. जनजागृती उपक्रम :
खालीलपैकी कोणत्याही एका उपक्रमाद्वारे साहिबजादा यांच्या बलिदान आणि साहसाबद्दल जागरूकता निर्माण
करता येईल.
a) 'चार साहिबजादे या ॲनिमेटेड चित्रपटाचे प्रदर्शन भरवता येईल जो पंजाबी, हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये
उपलब्ध आहे.
b) बलिदान, साहस, आदर आणि जबाबदारी या विषयांवर आधारित साहिबजादा जोरावर सिंग जी आणि
साहिबजादा फतेह सिंग जी यांच्या गोष्टी विद्यार्थ्यांना सांगता येईल.
c) साहिबजादा जोरावर सिंग जी आणि साहिबजादा फतेह सिंग जी यांच्या जीवांनाविषयीचे रंजक कथांच्या
पुस्तकांचे वाचन.
d) साहिबजादा जोरावर सिंग जी आणि साहिबजादा फतेह सिंग जी यांच्याबाबत अधिकची माहिती असणाऱ्या तज्ञ व्यक्तींच्या व्याख्यानमालेचे आयोजन करता येईल.
e) साहिबजादा जोरावर सिंग जी आणि साहिबजादा फतेह सिंग जी यांच्या जीवनपटाबाबत विद्यार्थ्यांना
माहिती देणाऱ्या विशेष परिपाठाचे आयोजन करता येईल.
2. साहित्यिक उपक्रम :
विद्यार्थ्यांना साहिबजादा जोरावर सिंग जी आणि साहिबजादा फतेह सिंग जी यांच्या बलिदान आणि साहसाबद्दल जाणीव झाल्यानंतर विद्यार्थ्यांना खालील कृती करण्यासाठी सांगता येईल.
a) निबंध लेखन.
(b) साहिबजादा जोरावर सिंग जी आणि साहिबजादा फतेह सिंग जी यांचे बलिदान, साहस आणि त्यांच्या
जीवनपटावरून शिकलेली इतर मूल्ये याबाबत कवितांचे वाचन किंवा लेखन.
c) तत्सम साहसी कृत्ये यांच्याबाबत माहिती करून घेणे आणि त्याचे वर्गातील इतर विद्यार्थ्यांसमोर कथन करणे.
d) साहिबजादा जोरावर सिंग जी आणि साहिबजादा फतेह सिंग जी यांच्या जीवनपटातील मुख्य घटनांचा
नकाशा तयार करणे.
e) साहिबजादा जोरावर सिंग जी आणि साहिबजादा फतेह सिंग जी यांच्या जीवनपटातील मुख्य घटनांवर
आधारित गोष्ट तयार करणे.
f) काल्पनिक पात्रावर आधारित ज्याने साहसी वृत्तीने सर्व आव्हाने आणि संकटांचा सामना केला आहे
त्याविषयक प्रेरित करणारी लघुकथा लिहिणे.
g) एका मिनिटाच्या भाषणाद्वारे साहिबजादा जोरावर सिंग जी आणि साहिबजादा फतेह सिंग जी यांच्याबद्दल
कृतज्ञता व्यक्त करणे.
h) प्रेरणादायी शब्द खेळ खेळणे.
i)
साहिबजादा जोरावर सिंग जी आणि साहिबजादा फतेह सिंग जी यांच्या जीवनपटावरून शिकलेली मूल्ये
याबाबत माहिती घेऊन लिहिणे आणि ती मूल्ये त्यांच्या स्वतःच्या जीवनात अंगीकृत करण्याकरिता काय
करता येईल ते लिहिणे.
j)
विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनात आलेल्या कठीण परिस्थितींचा त्यांनी कसा सामना केला? त्यातून यशस्वीरित्या
बाहेर येण्यासाठी काय केले आणि तेच का केले याबाबत बोलणे किंवा लिहिणे.
k) प्रश्नमंजुषाही घेता येईल.
3. कलाधारित उपक्रम :
साहिबजादा जोरावर सिंग जी आणि साहिबजादा फतेह सिंग जी यांच्या संदर्भात जाणीव जागृती निर्माण
झाली की, विद्यार्थ्यांसाठी कला आधारित उपक्रम आयोजित करण्यात यावेत. यासाठी खालील प्रमाणे विद्यार्थ्यांना
मार्गदर्शन करावे.
a) साहिबजादा जोरावर सिंग जी आणि साहिबजादा फतेह सिंग जी यांच्या बलिदानावर आधारित त्यांचे
उत्तरदायी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी थँक्यू कार्ड्स तयार करून भिंतीवर लटकवावेत. हे कार्डस् साहिबजादा
जोरावर सिंग जी आणि साहिबजादा फतेह सिंग जी त्यांना उद्देशून तयार केलेली असावीत.
b)
साहिबजादा जोरावर सिंग जी आणि साहिबजादा फतेह सिंग जी यांना वचन देण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रॉमिस
कार्ड तयार करावेत.
c) नवीन वर्ष जवळ आल्याने साहिबजादा जोरावर सिंग जी आणि साहिबजादा फतेह सिंग जी यांच्या
जीवनावर आधारित नवीन वर्षासाठी दिनदर्शिका तयार करावी.
4. साहिबजादा जोरावर सिंग जी आणि साहिबजादा फतेह सिंग जी यांच्या व्यक्तिमत्वाचे गुणवैशिष्ट्ये
विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठीचे उपक्रम :
साहिबजादा जोरावर सिंग जी आणि साहिबजादा फतेह सिंग जी यांनी जुलूमजबरदस्तीच्या विरुद्ध दृढ आत्मविश्वास आणि साहस दाखवले होते. ते सर्व अडीअडचणींच्या विरुद्ध ठाम विश्वासाने बोलण्यास आणि त्याविरुद्ध उभे राहण्यास सक्षम होते. आपल्या मुलांमध्ये देखील आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी ज्यायोगे ते स्वतःला व्यक्त करू शकतील आणि इतर व्यक्ती/ जनसमुदाय यांच्यासमोर उभे राहून त्यांना प्रश्न करू शकतील,निर्भयतेने बोलू शकतील याकरिता त्यांच्या आवडीच्या आणि त्यांना आत्मविश्वास देणाऱ्या कृती/गोष्टी करण्यासाठी प्रेरित करायला हवे.वरील गुणवैशिष्ट्याव्यतिरिक्त साहिबजादा जोरावर सिंग जी आणि साहिबजादा फतेह सिंग जी यांनी पालकांचा आदर करणे, आपल्या विश्वासावर ठाम असणे, धैर्यवान आणि निर्भय असणे या गुणवैशिष्ट्याचे प्रदर्शन केले. शाळा मुलांच्यासाठी इतर सहशालेय उपक्रमांबरोबर अशा उपक्रमांचा/कृतींचा समावेश करू शकते ज्यामुळे वरीलप्रमाणे गुणवैशिष्ट्य त्यांच्या अंगी रुजविता येतील.
0 Comments