Ticker

10/recent/ticker-posts

World Soil Day| जागतिक मृदा दिन | सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा

 World Soil Day| जागतिक मृदा दिन | सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा 


  1. निकाल पाहण्यासाठी  खालील चित्रावर स्पर्श करा.


सूचना

  1. .

World Soil Day General Knowledge Competition
जागतिक मृदा दिनानिमित्त सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा

जागतिक मृदा दिवस कधी साजरा करतात?
4 डिसेंबर
5 डिसेंबर
6 डिसेंबर
3 डिसेंबर

Correct answer
5 डिसेंबर

कुथित मृदा संदर्भात चुकीचे विधान ओळखा
मृत वनस्पती व प्राणी यांचे सूक्ष्मजीवामर्फत विघटन होऊन म्हणजे ते कुजून जो थर तयार होतो त्यास कृथित मृदा किंवा ह्युमस म्हणतात.
चांगल्या सुपीक मृदेत वरच्या थरात कुथित मृदेचे प्रमाण सुमारे 33 टक्के ते 50 टक्के असते.
कुथित मृदा जमिनीसाठी हानिकारक असते.
मृदेत हवा खेळती ठेवणे, पाणी धरून ठेवणे यासाठी उपयुक्त आहे.

Correct answer
कुथित मृदा जमिनीसाठी हानिकारक असते.

पृथ्वीवर ----------पाणी व ---------जमीन आहे.
*
0/2
29 टक्के व 71 टक्के
25 टक्के व 75 टक्के
71 टक्के व 29 टक्के
90 टक्के व 10 टक्के

Correct answer
71 टक्के व 29 टक्के

पृथ्वीवरील सजीव सृष्टी टिकून राहण्यासाठी व त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी खालील कोणती संसाधने महत्वाची आहे?
हवा
पाणी
जमीन

वरील सर्व
Correct answer
वरील सर्व

पिण्यासाठी उपलब्ध पाणी किंवा गोडे पाणी किती आहे?
21%
10 टक्के
0.3%
30 टक्के

Correct answer
0.3%

महाराष्ट्रातील दख्खनच्या पठारावर असलेल्या...... या मूळ खडकांचे विदारण होऊन काळी मृदा तयार होते त्यामुळे त्याला रेगूर मृदा असे म्हणतात.
ग्रॅनाईट
बेसाल्ट
ह्युमस
यापैकी नाही

Correct answer
बेसाल्ट

दक्षिण भारतातील ग्रॅनाईट व..... या मुळ खडकापासून तांबडी मृदा तयार होते
बेसाल्ट
खडक
नीस
यापैकी नाही

Correct answer
नीस

1. मुळ खडकांचे विदारण होणे हा मृदा निर्मितीतील पहिला टप्पा असतो.2. विदारण प्रक्रिया ही प्रदेशाच्या हवामानावर ठरते.
दोन्ही विधाने सत्य आहेत
दोन्ही विधाने असत्य आहेत
फक्त विधान क्रमांक एक असत्य आहे
फक्त विधान क्रमांक असत्य आहे

Correct answer
दोन्ही विधाने सत्य आहेत

मृदेमध्ये .......चे प्रमाण अधिक असेल तर मृदा सुपीक असते.
खडकाचे
मातीचे
ह्युमसचे
यापैकी नाही

Correct answer
ह्युमसचे

1. जास्त तापमान व जास्त पाऊस असलेल्या प्रदेशात मृदा निर्मितीची प्रक्रिया जलद होत असते  .2. कमी तापमान व कमी पाऊस असलेल्या प्रदेशात मृदा निर्मितीची प्रक्रिया कालावधी जास्त लागतो.
दोन्ही विधाने सत्य आहेत
दोन्ही विधाने असत्य आहेत
फक्त विधान क्रमांक एक असत्य आहे
यापैकी नाही

Correct answer
दोन्ही विधाने सत्य आहेत

चुकीचा पर्याय निवडा.
जाडी भरडी मृदा -पश्चिम भागात घाटमाथ्यावर आढळते
काळी मृदा -दख्खन पठारावर पश्चिम भागात आढळते
जांभी मृदा -कोकण किनारपट्टी व पूर्व विदर्भात आढळते
पिवळसर तपकिरी मृदा -दख्खन पठारावर आढळतात.
Correct answer
पिवळसर तपकिरी मृदा -दख्खन पठारावर आढळतात


वारा व पाणी यामुळे मृदेचा थर वाहून जातो म्हणजे....... होते.
वारा वाहतो
मृदेची धूप
यापैकी नाही
Correct answer
मृदेची धूप

1. मृदेची अवनती  थांबविण्यासाठी रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा अतिरिक्त टाळावा.2. काही कारणांमुळे मृदेचे आरोग्य बिघडते यास मृदेची अवनती होणे असे म्हणतात.
दोन्ही विधाने असत्य आहेत
दोन्ही विधाने सत्य आहेत
फक्त विधान क्रमांक दोन असत्य आहे
यापैकी नाही

Correct answer
दोन्ही विधाने सत्य आहेत

मृदेतील कणांच्या रचनेनुसार प्रकार कोणता आहे?
स्तरीय
स्तंभाकार
कणस्वरूप

वरीलपैकी सर्व
Correct answer
वरीलपैकी सर्व

सर्वात जलद पाण्याचा निचरा होणारी मृदा कोणती आहे?
रेताड मृदा
चिकन मृदा
पिवळी मृदा
पोयटा मृदा
Correct answer
रेताड मृदा

Post a Comment

0 Comments

Total Pageviews