Teacher transfer Timetable।जिल्हांतर्गत शिक्षक बदली
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबतचे वेळापत्रक उपरोक्त संदर्भ क्र.४ नुसार निर्गमीत करण्यात आले होते. परंतु, दरम्यानच्या कालावधीत दिपावली सण तसेच क्षेत्रिय स्तरावर जिल्हांतर्गत बदलीच्या अनुषंगाने करावयाच्या कामाचे स्वरुप विचारात घेता त्यासाठी काही अधिकचा वेळ लागणार असल्यामुळे उपरोक्त संदर्भ क्र. ४ येथील दिनांक २०.१०.२०२२ चे पत्र रद्द करण्यात येत असून शिक्षकांच्या बदल्यांबाबत सुधारित वेळापत्रक निश्चित करण्यात येत आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे
करण्याबाबतचे सुधारित धोरण संदर्भ क्र.१ येथील दिनांक ०७.०४.२०२१ च्या शासन निर्णयान्वये विहित करण्यात आले आहे.
सन २०२२ मध्ये होणाऱ्या बदल्यांकरिता पदावधीची परिगणना दिनांक ३१ मे ऐवजी दिनांक ३० जून,२०२२ पर्यंत करण्यास संदर्भ क्र. २ येथील दिनांक ४.५.२०२२ च्या शासन निर्णयान्वये तरतुद करण्यात आली आहे. तसेच सन २०२२ मध्ये होणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी संदर्भ क्र.३ येथील दिनांक २९.६.२०२२ च्या शासन निर्णयात विहित केलेल्या कालावधीनुसार बदल्यांबाबतची कार्यवाही संगणक प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे. उक्त दिनांक ४.५.२०२२ व दिनांक २९.६.२०२२ च्या शासन निर्णयानुसार होणारी कार्यवाही फक्त सन २०२२ मध्ये होणाऱ्या बदल्यांकरिताच लागू राहील.
आता ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत
बदल्यांबाबत खालीलप्रमाणे सुधारित वेळापत्रकानुसार बदल्यांबाबतची कार्यवाही निश्चित करण्यात आलेली आहे.
0 Comments