Infosys Springboard App
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण Infosys Springboard App या ॲप व्दारे होणार आहे.
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र
मार्फत
राज्यातील शिक्षक/ मुख्याध्यापक /अध्यापकाचार्य / प्राचार्य यांच्यासाठी वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचेमार्फत ऑनलाईन
स्वरूपामध्ये दिनांक १ जून २०२२ पासून सुरू होत आहे.
सदरचे प्रशिक्षण हे ऑनलाईन स्वरूपामध्ये Infosys Springboard App या ॲप व्दारे होणार आहे.
यामध्ये राज्यातील प्राथमिक, माध्यमिक,
उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील नोंदणीकृत प्रशिक्षणार्थी सहभागी होऊन ऑनलाईन प्रशिक्षण प्रणालीच्या माध्यमातून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र यंचे मार्फत विकसित प्रशिक्षण (ई- कोर्स) पूर्ण करून त्यावरील स्वाध्याय, चाचणी सोडवून वरिष्ठ वेतन श्रेणी / निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण करू शकणार आहेत.
सदर ऑनलाईन प्रशिक्षण हे एकूण ५० ते ६० तासांचे असणार असून सदर प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी एकूण ३० दिवसांचा कालावधी देण्यात येईल. त्यामुळे प्रशिक्षणासाठी पात्र शिक्षक आपले प्रशिक्षण ऑनलाईन स्वरूपामध्ये एकूण ३० दिवसांच्या कालावधीमध्ये त्यांच्या उपलश्थ वेळेनुसार, पूर्ण करू शकणार आहेत. सदरके ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर पात्र प्रशिक्षणाथ्यांस त्यच ऑनलाईन प्रशिक्षण प्रणालीच्या गाध्यमातून प्रशिक्षण प्रमाणप्त्र उपलब्ध होणार आहे.
सदर प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी खालील ॲप डाऊनलोड करा.
Infosys Springboard App
0 Comments