Ticker

10/recent/ticker-posts

Senior Grade and Selected Grade Training | वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाबाबत

 Senior Grade and Selected Grade Training | वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाबाबत 
वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण

सर्व प्रशिक्षणार्थी शिक्षक बंधू भगिनी,

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद , महाराष्ट्र , पुणे , तर्फे आयोजित वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षणासाठीची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे.

सदर प्रशिक्षणासाठी आवश्यक तपशील, प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी केलेल्या शिक्षकांची यादी आपणास  https://training.scertmaha.ac.in/ 
या वेबसाईटवर पाहायला मिळेल. सोबत इतर महत्त्वाची माहिती आपल्याला वैयक्तिक ईमेल द्वारे व मोबाईल मेसेजद्वारे लवकरच कळविण्यात येईल.

सदर ऑनलाईन प्रशिक्षण हे आपल्या सोयीने पूर्ण करण्याची सुविधा असल्याने व हे प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी  स्थळ, ठराविक वेळ,  प्रत्यक्ष उपस्थिती यांची  मर्यादा असणार नाही.

यामुळे सुट्टीच्या कालावधीमध्ये शिक्षकांना त्यांच्या प्रवासाचे व इतर कोणतेही नियोजन पूर्ण करण्यासाठी कोणतीही अडचण येण्याची शक्यता नाही.


अवैध ईमेल यादी


कृपया आपला ई मेल आय. डी तपासावा. आपला इमेल आय. डी योग्य असल्यास कोणतीही कार्यवाही करण्याची आवश्यकता नाही. मात्र आपला ई मेल आय.डी चुकला असल्यास तो पोर्टल वरून तात्काळ बदलण्याची प्रक्रिया करून घ्यावी.

अवैध ईमेल यादी पाहण्यासाठी खालील चित्रावर स्पर्श करा.

दुबार ईमेल यादी

एकच ईमेल आय.डी एका पेक्षा जास्त वेळा वापरण्यात आलेल्या प्रशिक्षणार्थी यांची यादी ( प्रत्येक प्रशिक्षणार्थी यास त्याचा ईमेल आय.डी हाच लॉगिन आय.डी म्हणून दिला जाणार असल्याने प्रशिक्षणार्थी यांनी केवळ स्वतःचाच ईमेल आय.डी नोंदविणे अत्यावश्यक आहे. अन्यथा अशा प्रशिक्षणार्थी यांना प्रशिक्षणाचे पुढील तपशील प्राप्त होणार नाहीत.)

 दुबार ईमेल यादी पाहण्यासाठी खालील चित्रावर स्पर्श करा.
वरीष्ठ / निवड वेतनश्रेणी Update                                    प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी केलेल्या शिक्षकांची यादी पाहण्यासाठी खालील चित्रावर स्पर्श करा.
 प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी केलेल्या शिक्षकांना काही दुरुस्ती करायची असल्यास वरील  यादीत आपले नाव शोधून रजिस्टर क्रमांक पहावा . सदर रजिस्टर नंबर द्वारे आपण आपल्या माहिती मध्ये बदल करू शकता.

दुरुस्ती करण्यासाठी खालील चित्रावर स्पर्श करा.
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे, महाराष्ट्र
वरिष्ठ /निवड श्रेणी प्रशिक्षण याविषयी महाराष्ट्र शासनाने वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाचे नियोजन व संनियंत्रणची जबाबदारी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे सोपवली आहे. सदर प्रशिक्षणासाठी ऑनलाइन नोंदणी करिता हे पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे. सदरील पोर्टलवर प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय अध्यापकाचार्य या चार गटातील शिक्षकांनी नोंदणी करावयाची आहे.

शासन निर्णय दिनांक : २० जुलै, २०२१

वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण


हे प्रशिक्षण १२ वर्षे सेवा पूर्ण केलेल्या शिक्षकांसाठी आहे

प्रशिक्षणाची उद्दिष्ट्ये
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० बाबत जाणीव जागृती करणे.
जागतिकीकरण, आधुनिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्रात करावयाचे बदल व त्याचा शैक्षणिक गुणवत्तेवर होणारा परिणाम.
शिक्षक शिक्षण प्रक्रियेमध्ये सुधार करण्यासाठी आवश्यक ज्ञान, कौशल्य, वृत्ती बदल आत्मसात होण्यासाठी सक्षम करणे.
नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून स्व विकास, छात्राध्यापक विकास, संस्था विकास होण्यासाठी त्याचा उपयोग करण्यास आत्मनिर्भर करणे.
एकविसाव्या शतकातील कौशल्य छात्राध्यापक/ विद्यार्थी यांमध्ये रुजविण्यासाठी सक्षम करणे.
शारीरिक व मानसिक स्वास्थ संवर्धनाचे मार्ग समजून घेऊन त्यानुसार कृती करण्यास सक्षम करणे.
मानवी हक्क सजगता, बहुसांस्कृतिकत्व व घटनात्मक मूल्यांची बांधिलकी जपण्यासाठी सबळ करणे.

पात्रता निकष

उमेदवाराला खालील अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.
१२ वर्षाची अर्हताकारी सेवा
या कामासाठी नियुक्त केलेल्या समितीला उमेदवारांचे कामकाज समाधानकारक वाटणे.
अ) त्याने/तिने विभागाने विहित केलेले किमान तीन आठवड्याचे सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे अथवा त्याने/तिने विभागाने विहित केलेले किमान दहा दिवसांचे अथवा घड्याळी ५० तासांचे ऑनलाईन सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे.
ब) शासन विहित करील असे सेवांतर्गत प्रशिक्षण त्याने/तिने पूर्ण केले असले पाहिजे अथवा त्याने/तिने विभागाने विहित केलेले किमान दहा दिवसांचे सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे.

निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण

हे प्रशिक्षण २४ वर्षे सेवा पूर्ण केलेल्या शिक्षकांसाठी आहे

प्रशिक्षणाची उद्दिष्ट्ये

बदलत्या शैक्षणिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नवविचार प्रवाहाच्या अंमल बजावणीसाठी सक्षम करणे.
मूल्यमापन पध्दती आणि साधन तंत्रे यांच्या प्रभावी अंमल बजावणीसाठी शिक्षकांना सक्षम करणे.
शिक्षकांमध्ये प्रभावी शालेय व्यवस्थापन संघटन आणि प्रशासकीय कौशल्यासाठी आवश्यक शैक्षणिक कार्य संस्कृती विकसित करणे.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार शालेय अभ्यासक्रम व शिक्षक शिक्षण अभ्यासक्रमात होत असलेल्या बदलांना सामोरे जाण्यासाठी सक्षम करणे.
मानवी हक्क सजगता, बहुसांस्कृतिकत्व व घटनात्मक मूल्यांची बांधिलकी जपण्यासाठी सबळ करणे.
शिक्षक शिक्षण प्रक्रियेमध्ये सुधार करण्यासाठी आवश्यक ज्ञान, कौशल्य, वृत्ती बदल आत्मसात होण्यासाठी सक्षम करणे.
जागतिकीकरण, आधुनिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्रात करावयाचे बदल व त्याचा शैक्षणिक गुणवत्तेवर होणारा परिणाम

पात्रता निकष

उमेदवाराला खालील अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.
२४ वर्षाची अर्हताकारी सेवा
अ) त्याने/तिने विभागाने विहित केलेले किमान तीन आठवड्याचे सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे अथवा त्याने/तिने विभागाने विहित केलेले किमान दहा दिवसांचे अथवा घड्याळी ५० तासांचे ऑनलाईन सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे.
ब) शासन विहित करील असे सेवांतर्गत प्रशिक्षण त्याने/तिने पूर्ण केले असले पाहजे अथवा त्याने/तिने विभागाने विहित केलेले किमान दहा दिवसांचे सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे.
क)
प्राथमिक शिक्षकांसाठी – प्रशिक्षित पदवीधराची अर्हता मिळविली असली पाहिजे.
प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकांसाठी – पदव्युत्तर प्रशिक्षित शिक्षकांची अर्हता प्राप्त केली असली पाहिजे.
माध्यमिक शाळेतील प्रशिक्षित – अपदवीधर शिक्षकांसाठी पदवी व पदवीधर शिक्षकांसाठी पदव्युत्तर प्रशिक्षित शिक्षकांची अर्हता प्राप्त केलेली असली पाहिजे.


इतर महत्त्वाची माहिती आपल्याला वैयक्तिक ईमेल द्वारे व मोबाईल मेसेजद्वारे लवकरच कळविण्यात येईल.


 अधिकृत माहितीसाठी आपण परिषदेच्या खालील संकेत स्थळ आणि परिषदेच्या समाजमाध्यमांवर असणाऱ्या चॅनल/पेज वर आपण भेट देऊ शकता.

वेबसाईट : www.maa.ac.in

वरिष्ठ वेतन श्रेणी, निवड श्रेणी प्रशिक्षण वेबसाईट : https://training.scertmaha.ac.in/

ट्विटर : https://twitter.com/scertmaha

फेसबुक : 
https://www.facebook.com/MahaSCERT

 युट्यूब:
https://youtube.com/channel/UCvAkeNF0s3p-mQDHsBvZvVwएम डी सिंह,
संचालक,
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.


शैक्षणिक माहितीसाठी खालील ग्रुप ला जॉईन व्हा.पुढील स्पर्धेची सूचना मिळण्यासाठी आणि निकाल लिंक त्वरित मिळण्यासाठी  खालील लिंकवर स्पर्श करून व्हॉट्स ग्रुपला जॉईन व्हा

Post a Comment

1 Comments

  1. Please change my training group varishth sreni to nivad sreni 2002238

    ReplyDelete

Total Pageviews