Ticker

10/recent/ticker-posts

शाळा पूर्वतयारी अभियान" - शाळेतील पहिले पाऊल | उद्घाटन समारंभ

    शाळा पूर्वतयारी अभियान |शाळा पूर्वतयारी अभियान" - शाळेतील पहिले पाऊल - उद्घाटन समारंभ


"शाळा पूर्वतयारी अभियान" - शाळेतील पहिले पाऊल - उद्घाटन समारंभ

राज्यात सन २०२०-२१ पासून 'स्टार्स' प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू  असून त्या अंतर्गत 'शाळापूर्व तयारी अभियान' उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

 जून २०२२ मध्ये इयत्ता पहिलीला दाखलपात्र बालकांची शिक्षक, अंगणवाडी सेविका, पालक तसेच स्वयंसेवक यांचे मदतीने शाळापूर्व तयारी करून घेण्यात येत आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष
मा. ना. वर्षाताई गायकवाड, शालेय शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य

*स्थळ -*
जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सातारा, ता. जि. औरंगाबाद

*दिनांक -* 
*दि. १८ एप्रिल २०२२*
 
वेळ -
दुपारी ४:१५ वाजता*
----------------------------------



या लिंक द्वारे शाळापूर्व तयारी मेळावा - उद्घाटन समारंभाचे लाइव्ह प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

तरी सदरील शाळापूर्व मेळावा - लाईव्ह समारंभास शिक्षक, मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, पालक तसेच शिक्षण व ICDS विभागातील पर्यवेक्षीय अधिकारी या सर्वांनी उपस्थित राहावे.

*--------------------------*
*(एम. डी. सिंह)*
*संचालक,*
*राज्य शैक्षणिक संशोधन व*
*प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे*





     COVID19   मुळे मार्च 2020 पासून शाळा अचानक बंद झाल्या... आता हळू-हळू शाळा पुन्हा सुरु होत आहेत. या पार्श्वभूमीवर आपण शाळा पुन्हा नव्याने सुरु करताना विशेष काहीतरी केले पाहिजे, म्हणून प्रथम संस्था, MSCERT, समग्र शिक्षा आणि शिक्षण विभाग यांनी एकत्र येऊन मार्च ते जून २०२२ या दरम्यान शाळापूर्व तयारी अभियान चालविण्याचे योजिले आहे.
मुलांच्या शालेय शिक्षणाची सुरूवात चांगली झाली तर पुढील शिक्षण प्राप्त करणे त्यांना सहज होऊ शकेल. अनेक अहवालातून आणि अनुभवातून असे आढळले आहे कि मुलं शाळापूर्व तयारी अभावी इयत्ता पहिलीत येतात आणि त्यांना औपचारिक शिक्षण प्राप्त करताना अनेक अडचणी येतात. परिणामतः पुढे वाचन-गणिताच्या पायभूत क्षमता देखील पूर्णपणे विकसित होत नाहीत. अशी मुलं पुढे जाऊन अभ्यासात मागेच पडतात. शिवाय यंदा इयत्ता १-२ री मधील मुलांनी नीट अंगणवाडी आणि शाळा सुद्धा अनुभवलेली नाहीय.शाळा पुन्हा सुरु होत असताना गावस्तरावर पालक, शिक्षक, अंगणवाडी, तरुण स्वयंसेवक, ग्रामस्थ व शासन यांच्या संयुक्त प्रयत्नांनी इयत्ता पहिलीत आलेल्या मुलांच्या ‘शाळापूर्व तयारी’साठी राज्यव्यापी मोहिम घेण्याचे आखले आहे.
जागतिक बँकेद्वारे अर्थसहाय्य केल्या जाणाऱ्या राज्यातील शिक्षण पध्दतीतील अध्यापन,अध्ययन व परिणाम याचे बळकटीकरण (Strengthening Teaching- Learning and Results for States) (STARS) या प्रकल्पासाठी महाराष्ट्रासह एकुण सहा राज्यांची (हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र,ओदीशा, राजस्थान, मध्यप्रदेश आणि केरळ) Performance Grading Index मधील कामगिरीच्या आधारे निवड करण्यात आली आहे. समग्र शिक्षा अभियान कार्यक्रमाखाली पूर्व प्राथमिक ते इ.१२ वी या वर्गामध्ये दर्जेदार शिक्षण देणे आणि अध्ययन निष्पत्तीमध्ये वाढ करणे, शिक्षकांच्या प्रशिक्षणाच्या पध्दतीत सुधारणा, मूल्यमापन पध्दतीत सुधारणा या बाबींचा समावेश सर्व पातळीवर करुन शिक्षण क्षेत्रात मूलभूत सुधारणा करणे हे STARS प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. इयत्ता ६ वी वर्गापासून व्यवसाय शिक्षणाचे Strengthening and Upgradation करणे यांचा अंतर्भाव या योजनेखाली करण्यात आला आहे. सदर प्रकल्पाची राज्यात अंमलबजावणी करण्यास मा. मंत्रीमंडळाने मान्यता दिली असून या अनुषंगाने शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
जागतिक बँकेद्वारे अर्थसहाय्य केले जाणारा “राज्यातील शिक्षण पध्दतीचे अध्यापन, अध्ययन व परिणाम यांचे बळकटीकरण (Strengthening Teaching- Learnming And Results for States) STARS हा प्रकल्प राज्यात राबविण्यास शासन मान्यता देत आहे.
STARS प्रकल्पाची उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत:
अ) पूर्व प्राथमिक विद्यार्थ्यांना दर्जेदार व आनंददायी शिक्षण देणे आणि नियमित व गतीशील प्रयत्नाने अध्ययन निष्पत्ती सुधारण्यावर भर देणे.
आ) शिक्षकांचे प्रशिक्षण व शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यावर भर देणे, शैक्षणिक प्रशासकीय व्यवस्था पारदर्शक बनविण्यासाठी सर्वसमावेशक धोरण निश्चित करणे.
इ) राज्यातील विद्यार्थ्यांची मूल्यांकन व्यवस्था सुधारणे.
ई) शाळाबाह्य मुले, विशेष गरजा असणारी बालके, मुली आणि वंचीत समुदायातील विद्यार्थी यांच्यावर विशेष लक्ष देणे व त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे.



1.   गावस्तरावर सर्वजणांनी मिळून इयत्ता पहिलीत जून २०२२ मध्ये प्रवेश घेणाऱ्या मुलांच्या ‘शाळापूर्व तयारी’साठी मेळाव्याचे मार्च २०२२ च्या अंतीम आठवडयात आयोजन करावे.
2.   या मेळाव्यात (गाव स्तरावर) इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या गावातील सर्व मुलांना आणि त्यांच्या पालकांना विशेषत: मातांना आमंत्रीत करावे.
3.   मेळाव्याचा योग्य प्रचार गावात आधीच करावा. यासाठी पोस्टर, दवंडी, प्रभातफेरी, लाउड स्पीकर आणि विविध माध्यमांचा उपयोग करावा. या प्रक्रियेत गावातील तरुण स्वयंसेवकांचे व ग्राम पंचायतचे सहकार्य घ्यावे.
4.   या संदर्भात गावातील तरुण स्वयंसेवकांचे अभिमुखीकरण (Orientation) आधीच करावे. मेळाव्यामधील प्रत्येक काउंटरवर कोण स्वयंसेवक बसणार आणि कोणकोणत्या एक्टिविटीज़ घेणार याबद्दल आधीच त्यांच्यासोबत चर्चा करावी.     
    

    विकासपत्र  डाऊनलोड करण्यासाठी खालील चित्रावर स्पर्श करा.


   शाळा पूर्व तयारी अभियान आयोजकासाठी  डाऊनलोड करण्यासाठी खालील चित्रावर स्पर्श करा.


   बालकासाठी कृतिपत्रिका शाळा पूर्व तयारी कार्ड डाऊनलोड करण्यासाठी खालील चित्रावर स्पर्श करा.



पालक समूहासाठी आयडिया कार्ड डाऊनलोड करण्यासाठी खालील चित्रावर स्पर्श करा.

सौजन्य
  प्रथम संस्था, MSCERT, समग्र शिक्षा आणि शिक्षण विभाग






वी 
 

Post a Comment

0 Comments

Total Pageviews