Ticker

10/recent/ticker-posts

Successful exam preparation for SSC students परीक्षेची यशस्वी तयारी

 

“परीक्षेची यशस्वी तयारी”

विषय :- इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यासाठी “परीक्षेची यशस्वी तयारी” या ऑनलाईन मार्गदर्शन सत्राबाबत.........

विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक वेबिनार

गुरुवार  दिनांक 24 फेब्रुवारी 2022 दुपारी 3 ते 4.30


उपरोक्त विषयांन्वये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्यामार्फत राज्यातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षा अंतर्गत लेखी परीक्षा दि. १५/०३/२०२२ ते ०४/०४/२०२२ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. कोविड- १९ या विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीसह शाळा उशिराने सुरु होणे तसेच शाळा बंद असताना शाळांमध्ये ऑनलाईन शिक्षण सुरु ठेवण्यात आले होते. कोविड- १९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या अनेक

समस्यांमुळे विद्यार्थ्यांना माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षा आत्मविश्वासाने देता यावी यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान विषयासंदर्भात “परीक्षेची यशस्वी तयारी” या ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन दि. २३/०२/२०२२ ते ०१/०३/२०२२ या कालावधीत करण्यात येत आहे. सदर ऑनलाईन मार्गदर्शन सत्रामध्ये इयत्ता दहावीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग १ व २ या विषयातील कठीण संकल्पनांची उजळणी, प्रश्न प्रकारानुसार आणि प्रश्नपेढीबाबत मार्गदर्शन,यशस्वी परीक्षेची तयारी (सर्वसाधारण सूचना, वेळेचे नियोजन, प्रश्नपत्रिका आराखडा) याविषयी

मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

इयत्ता दहावी प्रश्नपेढी Prashnpedhi

या संकेतस्थळावर विषय व माध्यमनिहाय प्रश्नपेढी अपलोड करण्यात आलेल्या आहेत.


Post a Comment

1 Comments

Total Pageviews