Ticker

10/recent/ticker-posts

Schools to reopen for classes 1-12 from January 24

 Schools to reopen for classes 1-12 from January 24

राज्यातील इ.१ ली ते १२ वी च्या शाळा स्थानिक परिस्थितीचा विचार करुन दि. २४ जानेवारी २०२२ पासून शाळा पुन्हा सुरु


१.

परिपत्रक :शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन परिपत्रक, दि.७ जुलै २०२१ अन्वये ग्रामीण भागातील कोरोनामुक्त गावात इ.८ ते इ.१२ वीचे व दि.१० ऑगस्ट २०२१ रोजीच्या परिपत्रकान्वये ग्रामीण भागात इ.५ वी ते इ.७ वी व शहरी भागातील इ. ८ वी ते इ. १२ वी तसेच दि.२४ सप्टेंबर, २०२१ रोजीच्या परिपत्रकान्वये शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ मध्ये राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते इयत्ता बारावी व शहरी भागातील इयत्ता आठवी ते बारावीच्या शाळा दि.०४ ऑक्टोबर, २०२१ पासून सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. एकूणच राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत असल्याने राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता १ ली ते इयत्ता ४ थी व महापालिका हद्दीतील इयत्ता १ ली ते ७ वी चे वर्ग दि.०१ डिसेंबर, २०२१ रोजी पासून सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

२. दरम्यान राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेऊन संदर्भ क्र.११ येथील आदेशान्वये राज्यातील सर्वच शाळा दि.१५ फेब्रुवारी, २०२२ पर्यंत बंद करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले. तथापि, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव राज्याच्या सर्व भागात सारख्या प्रमाणात नसल्याने व राज्यातील ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे अशा भागातून शाळा सुरु करण्याबाबत सातत्याने मागणी करण्यात येत असल्याने राज्यातील इ.१ ली ते १२ वी च्या शाळा स्थानिक परिस्थितीचा विचार करुन दि. २४ जानेवारी २०२२ पासून शाळा पुन्हा सुरु करण्याचे अधिकार महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिका आयुक्त व राज्यातील इतर भागात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना शाळा सुरु करण्याचे अधिकार प्रदान करण्यात येत आहेत.

३. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण (दोन्ही मात्रा) झालेले असावे.

४. शाळेतील १५ ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण संबंधित शाळेत करणेबाबत सर्व शिक्षणाधिकारी यांनी स्थानिक प्राधिकाऱ्यांशी संपर्क साधून नियोजन करावे.

५. दि. २४ जानेवारी,२०२२ पासून सुरु होत असलेल्या शाळांबाबत शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी यांनी नियमित शाळांना भेटी देऊन आढावा घेऊन आवश्यक तेथे मार्गदर्शन करावे व भेटीचा अहवाल विभागीय शिक्षण उपसंचालक यांना सादर करावा. विभागीय उपसंचालकांनी एकत्रित अहवाल शिक्षण संचालकांना सादर करावा.

वरीलप्रमाणे शाळा सुरु करण्यासाठी शासनाने वेळोवेळी संदर्भाधीन परिपत्रकान्वये दिलेल्या मागदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. तसेच सदर मार्गदर्शक सुचनांव्यतिरिक्त स्थानिक परिस्थितीनुसार कोविड-१९ संदर्भात संबंधित शाळांनी मार्गदर्शक सूचना निश्चित कराव्यात.

सुलभ संदर्भासाठी यापुर्वी दि. २९ नोव्हेंबर, २०२१ रोजीच्या परिपत्रकान्वये देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना सोबत जोडल्या आहेत.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक २०२२०१२०१९१४००२९२१ असा आहे.

सदर शासन परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,


Post a Comment

0 Comments

Total Pageviews