National Mathematics Day
विषय :-"निपुण भारत अभियान अंतर्गत राष्ट्रीय गणित दिनानिमित्त “गणितोत्सवाचे आयोजन करणेबाबत...
Rashtriy ganit din
संदर्भ :- १) भारत सरकारच्या National Initiative For Proficiency In Reading with Understanding
and Numeracy (NIPUN BHARAT) अंतर्गत मार्गदर्शक सूचना.
२ शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण -२०२१/प्र.क्र.१७९/एसडी-६.दिनांक २७ ऑक्टोबर,२०२१.
भारतीय गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा २२ डिसेंबर जन्मदिन प्रत्येक वर्षी राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो. शालेय स्तरापासून विद्यार्थ्यांना गणित विषयाची गोडी लागावी तसेच गणितीय दृष्टीकोन विकसित व्हावा यासाठी गणित दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सन २०२० नुसार, प्राथमिक स्तरावर प्रत्येक विद्यार्थ्याने मूलभूत भाषिक व गणितीय कौशल्य प्राप्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. त्यानुसार राष्ट्रीय व राज्य पातळीवर "निपुण भारत अभियान सुरु करण्यात आले आहे. या अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांचे पायाभूत साक्षरता व प्रारंभिक संख्याज्ञान (FLN) विकसित व्हावे याकरिता उपक्रम राबविण्यात येत आहेत.
“निपुण भारत अभियान” अंतर्गत राष्ट्रीय गणित दिनानिमित्त “गणितोत्सवाचे” आयोजन दिनांक २० डिसेंबर ते २२ डिसेंबर, २०२१ या कालावधीत राज्यातील पूर्व प्राथमिक ते माध्यमिक स्तरावरील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये करण्यात यावे. या वर्षीच्या गणितोत्सव”ची प्रमुख संकल्पना (Theme) “पायाभूत संख्याज्ञान" (FLN-foundational Numeracy) ही निश्चित करण्यात येत आहे.
पायाभूत संख्याज्ञान आणि गणितीय क्षमता पायाभूत संख्याज्ञान म्हणजे साध्या संख्यात्मक संकल्पना आणि त्यांच्यातील कार्यकारणभाव समजून घेऊन त्यांचा दैनंदिन जीवनातील समस्या सोडवण्यासाठी वापर करणे. गणनपूर्व संकल्पना,संख्यांची संकल्पना तसेच तुलना करणे, क्रमवार लावणे,वर्गीकरण करणे, आकृतिबंध ओळखणे यांचे ज्ञान शाळापूर्व काळात होणे महत्वाचे आहे. पूर्व प्राथमिक वर्गात मूलभूत गणित शास्त्राचा पाया पक्का होण्यासाठी वरील बाबी महत्त्वाच्या आहेत.
“ गणितोत्सव "अंतर्गत खालील शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे.
सदर नियोजन करत असताना विद्यार्थी,शाळा,शिक्षक, पालक व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांचा सक्रीय व उत्स्फूर्त सहभाग घेण्यात यावा.दिवस निहाय खालीप्रमाणे उपक्रमांचे आयोजन करण्यात
यावे.
अ) शालेय स्तरावर विद्यार्थ्यांसाठी आयोजित करावयाचे उपक्रम
उपक्रमाचे
ब) पोस्टर निर्मिती उपक्रम विद्यार्थ्यांना गणितीय संबोध तसेच गणिताची गोडी विकसित व्हावी याकरिता चालना देण्यासाठी पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान (FLN) संकल्पनेवर आधारित सर्जनशील व नाविन्यपूर्ण पोस्टर निर्मिती करणे अपेक्षित आहे.सदर पोस्टर मधून उत्कृष्ट पोस्टर/संकल्पना शाळेमध्ये छपाई समृद्ध वातावरण (Print Rich Environment) निर्मिती करण्याकरिता निवडले जाणार आहेत.याकरिता पोस्टर निर्मितीकर्त्याची
सहमती असणे आवश्यक आहे.निवडण्यात आलेल्या उत्कृष्ट पोस्टर निर्मितीकर्त्यास राज्यस्तरावरून प्रमाणपत्र देण्यात येईल.राज्यातील शिक्षक,अधिकारी,गणित प्रेमी व शिक्षण तज्ञ यांनी पोस्टर निर्मिती
उपक्रमांतर्गत सक्रीय सहभाग घ्यावा.
पोस्टर निर्मिती |
पोस्टर निर्मितीसाठी मूलभूत
संकल्पना (Theme)-पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान
(FLN) > पोस्टर निर्मितीसाठी निकष.
राज्यातील सर्व शिक्षक,अधिकारी,गणित प्रेमी
व शिक्षण तज्ञ पोस्टर निर्मिती मध्ये
सहभागी होऊ शकतात. • डिजीटल अथवा पेपरवर
पोस्टर निर्मिती करता येईल. पोस्टर निर्मिती करत
असताना बौद्धिक संपदा (CopyRight) चे उल्लंघन
होऊ नये याची
खबरदारी घ्यावी. • पोस्टरवर विषय/घोषवाक्य/संदेशTagline) लिहिलेली असावी. • पोस्टर हे पायाभूत
साक्षरता व संख्याज्ञान
(FLN) या संकल्पनेवर आधारित असावे. आपण निर्मिती
केलेले पोस्टर सुस्पष्ट समाज
संपर्क माध्यमांवर इंस्टाग्राम,फेसबुक इत्यादी वर
पोस्ट करून आपण
अपलोड केलेल्या पोस्ट ची लिंक https://scertmaha.ac.in/mathematicsday
या लिंकवरनोंदविण्यात यावी. |
उपरोक्त प्रमाणे विद्यार्थी आणि शिक्षकांनी कार्यक्रमांचे आयोजन करून आपल्या उपक्रमाचा/कार्यक्रमाचा २ ते ३ मिनिटांपर्यंतचा सुस्पष्ट व्हिडीओ,फोटो व इतर साहित्य समाज संपर्क माध्यमांवर इंस्टाग्राम,फेसबुक, #Mathematicsday2021, #Ganitotsav2021, #Nipunbharatabhiyan
#FLN या HASHTAG (#)चा वापर करून आपल्या व्हिडीओ,फोटो व इतर साहित्याची पोस्ट अपलोड करण्यात यावी.
आपण अपलोड केलेल्या पोस्ट ची लिंक https://scertmaha.ac.in/mathematicsday या
लिंकवर नोंदविण्यात यावी. उत्कृष्ट उपक्रमास राज्यस्तरावरून प्रसिद्धी देण्यात येईल.सदर कार्यक्रमांचे आयोजन करत असताना कोविड-१९ च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या सामाजिक अंतर राखणे व स्वच्छतेच्या आवश्यक त्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी.
(मा.संचालक यांचे मान्यतेने.)
0 Comments