Ticker

10/recent/ticker-posts

Passage Reading उतारा वाचन क्रमांक 4

 Passage Reading उतारा वाचन क्रमांक 4

          तामिळनाडूच्या पश्चिमेस समुद्रकिनारी रामेश्वरम् नावाचे छोटे गाव तेथील शिवमंदिरामुळे प्रसिद्ध होते. प्रभू श्रीरामचंद्रांनी या भूमीत पाय ठेवले, अशी इथल्या लोकांची धारणा होती.

           येथेच १५ ऑक्टोबर १९३१ रोजी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे उत्पन्नाचे मुख्य साधन रामेश्वरम् ते धनुष्कोडीपर्यंत यात्रेकरूंना ने-आण करणे हे होते. संपूर्ण कुटुंबाचा चरितार्थ त्यावर अवलंबून होता;परंतु एका मोठ्या वादळामुळे रामेश्वरम्च्या किनाऱ्याला जबरदस्त तडाखा बसला. त्यात होडीचे पूर्ण नुकसान झाले.

       अशा बिकट प्रसंगी अब्दुल कलाम यांनी चिंचोक्याच्या बिया दुकानदाराला विकून, तसेच चुलतभावाला वर्तमानपत्र विकण्यास मदत करून पहिली कमाई केली. यातून कुटुंबाचा भार उचलण्यास समर्थ असल्याचा आनंद मिळवला.

Pdf स्वरूपात पेपर डाऊनलोड करण्यासाठी खालील चित्रावर स्पर्श करा


 
नवोदय अभ्यास  साठी खालील चित्रावर स्पर्श करा

Post a Comment

0 Comments

Total Pageviews