Ticker

10/recent/ticker-posts

NISHTHA Teacher Training | निष्ठा प्रशिक्षण | निष्ठा कोर्स लिंक |

  NISHTHA Teacher Training |निष्ठा प्रशिक्षण








  निष्ठा 3.0 प्रशिक्षण


माहे जानेवारी 2022 ते एप्रिल 2022 दरम्यान निष्ठा प्रशिक्षण 3.0 यापूर्वी  ज्या शिक्षकांनी 12 मोडूल पैकी काही मोडूल करू शकले नाहीत त्या सर्वांसाठी  दीक्षा ॲपवर  1 ते 12 कोर्स कालावधी वाढवला आहे.


मागील प्रशिक्षण कालावधीत जे कोर्स पूर्ण केलेले आहेत ते  पुन्हा करण्याची गरज नाही जे कोर्स पूर्ण केलेले नाहीत तेच कोर्स पूर्ण करावे

ज्या शिक्षकांनी अद्यापही निष्ठा 3.0  प्रशिक्षणात नोंदणी केलेली नाही त्यांना पुन्हा 9  मे 2022 ते 25 जून 2022 दरम्यान नोंदणी करून प्रशिक्षण पूर्ण करता येईल.


निष्ठा 3.0 प्रशिक्षण 30 जून 2022 पर्यंतच करता येणार. 

 निष्ठा 3.0 प्रशिक्षण सर्व कोर्स ला 25 जून 2022 पर्यंत सुरुवात करणे गरजेचे आहे.


निष्ठा कोर्स क्रमांक 1 ते 4


मराठी माध्यमातील शिक्षकांसाठी 



इंग्रजी माध्यमातील शिक्षकांसाठी 


हिंदी माध्यमातील शिक्षकांसाठी 


उर्दू माध्यमातील शिक्षकांसाठी 





निष्ठा कोर्स क्रमांक 5 ते 8 पूर्ण करावयाचे कोर्स 



मराठी माध्यमातील शिक्षकांसाठी 


इंग्रजी माध्यमातील शिक्षकांसाठी 



हिंदी माध्यमातील शिक्षकांसाठी 


उर्दू माध्यमातील शिक्षकांसाठी 




कोर्स क्रमांक 11

कोर्स लिं

मराठी माध्य

CLICK HERE

English Medium

CLICK HERE

हिंदी माध्य

CLICK HERE

उर्दू  माध्य

CLICK HERE




कोर्स क्रमांक 12

कोर्स लिं

मराठी माध्य

CLICK HERE

English Medium

CLICK HERE

हिंदी माध्य

CLICK HERE

उर्दू  माध्य

CLICK HERE



कोर्स क्रमांक 9 

कोर्स लिंक

मराठी माध्यम

CLICK HERE

English Medium

CLICK HERE

हिंदी माध्यम

CLICK HERE

उर्दू  माध्यम

CLICK HERE







कोर्स क्रमांक 10

कोर्स लिंक

मराठी माध्यम

CLICK HERE

English Medium

CLICK HERE

हिंदी माध्यम

CLICK HERE

उर्दू  माध्यम

CLICK HERE




NISHTHA 2.0
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र
NISHTHA 2.0 all courses
are open once again for teachers of standard 9 to 12 from 8 April 2022 to 8 May 2022
(निष्ठा 2.0 मधील सर्व 12 कोर्सेस इंग्रजी, हिन्दी, उर्दू व मराठी माध्यमातून इयत्ता 9 वी ते 12 वीच्या सर्व शिक्षकांसाठी पुन्हा उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. ज्यांनी हे कोर्सेस पूर्ण केले नाहीत किंवा कमी गुण पडल्यामुळे प्रमाणपत्र मिळाले नाही अशा सर्व शिक्षकांना 8 एप्रिल ते 8 मे 2022 दरम्यान हे कोर्सेस पूर्ण
करता येतील.)





 महत्वाची सूचना 

  कोर्स पूर्ण करण्यासाठी टप्पा 3 बाबत

 

 मोड्यूलची लिंक खाली देण्यात आलेल्या आहेत. लिंकवर क्लिक करुन दिक्षा अॕपमधून ओपन करा  व मोड्यूल सुरू करा.



विषय :- राज्यातील सर्व शासकीय व अनुदानित शाळांतील इयत्ता १ ली ते ५ वी च्या शिक्षक व मुख्याध्यापक यांचेसाठी ऑनलाईन निष्ठा ३.० (FLN)
प्रशिक्षणाच्या आयोजनाबाबत...
संदर्भ :१. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ,नवी दिल्ली यांचे प्रशिक्षण आयोजनाबाबतचे पत्र दि. १३ जुलै ,२०२१
२. या कार्यालयाचे दीक्षा अॅप वर नोंदणी करणेबाबतचे पत्र दि.२१ सप्टेंबर प्रशिक्षण, २०२१ व २७ सप्टेंबर २०२१.
३. या कार्यालयाचे पत्र जा.क्र. राशैसंप्रपम / आय.टी./ NISHTHA प्रशिक्षण /२०२१/३१४३ दि. २७.०९.२०२१
४. शासन निर्णय क्रमांक : संकीर्ण २०२१/प्र.क्र.१७९/एसडी-६ दि.२७.१०.२०२१
५. शिक्षा मंत्रालय, भारत सरकार यांचे पत्र दि. २२ डिसेंबर, २०२१
उपरोक्त संदर्भीय विषयान्वये शिक्षा मंत्रालय, नवी दिल्ली यांचेमार्फत निष्ठा (National Initiatives for School Heads and Teachers Holistic Advancement) या एकात्मिक प्रशिक्षणाची सुरुवात दिनांक २१ ऑगस्ट, २०१९ रोजी करण्यात आली. यानुसार प्राथमिक स्तरावरील ऑनलाईन स्वरूपामध्ये प्रशिक्षण सन २०२० -२०२१ मध्ये पूर्ण करण्यात आले. सद्यस्थितीमध्ये ऑनलाईन निष्ठा २.० प्रशिक्षण हे राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक व मुख्याध्यापक यांचेसाठी सुरु आहे. सद्यस्थितीमध्ये दिनांक १ जानेवारी, २०२२ पासून निष्ठा ३.० (FLN) प्रशिक्षणास सुरुवात करण्यात येत आहे.
सद्यस्थितीमध्ये देशातील कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर देशामधील प्राथमिक शाळांमधील इयत्ता १ ली ते ५ वी च्या वर्गांना अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी व मुख्याध्यापकांसाठी NISHTHA ३.० FLN (National Initiative For School Heads and Teachers Holistic Advancement ) प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येत आहे. सदरचे प्रशिक्षण हे राष्ट्रीय स्तरावरून DIKSHA प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून ऑनलाईन स्वरूपामध्ये आयोजित करण्यात येत आहे. सदरच्या प्रशिक्षणामध्ये एकूण १२ घटकसंचांचा (मोड्यूल्स) चा समावेश असणार आहे. ते खालील प्रमाणे,सामान्य अभ्यासक्रमावर आधारित
१. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानाची ओळख.
२. क्षमताधिष्ठीत शिक्षणाकडे वाटचाल.
३. अध्ययनार्थ्यांचे आकलन : मुल कसे शिकते?
४. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानात पालकांचा व समाजाचा सहभाग
५. विद्याप्रवेश आणि बालवाटीकेचे आकलन
६. पायाभूत भाषा आणि साक्षरता.
७. प्राथमिक स्तरावर बहुभाषिक शिक्षण
८. अध्ययन मुल्यांकन.
९. पायाभूत संख्याज्ञान
१०. अध्ययन अध्यापन व मुल्यांकनामध्ये माहिती व तंत्रज्ञाचा वापर
११. शालेय शिक्षणातील पुढाकार
१२. खेळणीधारित अध्यापनशास्त्र
उक्त नमूद तपशीलवार माहितीनुसार एकूण १२ सामान्य अभ्यासक्रमावर आधारित घटकसंचाचे (मोड्यूल्स) चे प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने दिले जाणार आहे . यामध्ये सदरचे सामान्य अभ्यासक्रमावरील प्रत्येक घटकसंच (मोड्यूल) हे ३ ते ४ तासाचे असणार आहे.
सदरचे प्रशिक्षण हे ऑनलाईन स्वरूपामध्ये दीक्षा प्लॅटफॉर्म वर होणार असल्याने यासाठी आवश्यक सुचना खालीलप्रमाणे,
सदरचे ऑनलाईन प्रशिक्षण हे DIKSHA प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून घेतले जाणार असल्याने सर्व शिक्षकांनी DIKSHA अॅपवर आपली नोंदणी करणे आवश्यक आहे.
DIKSHA अॅपवर नोंदणी करणेसाठी 









 




 
 


 
मार्गदर्शनपर व्हिडीओ पाहू शकता.
सदरच्या प्रशिक्षणामध्ये प्रत्येक ३० दिवसांच्या कालावधीमध्ये एकूण सामान्य अभ्यासक्रमवार आधारित ४ व दिनांक ०१ एप्रिल, २०२२ पासून सदरचे सर्व १२ कोर्सेस (मोड्यूल्स) पुन्हा उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
शिक्षकांसाठी सदरचा प्रशिक्षण कार्यक्रम हा मराठी, इंग्रजी,हिंदी व उर्दू भाषेमध्ये उपलब्ध होणार आहे.
सदरच्या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये DIKSHA अॅपवर दर ३० दिवसांसाठी एकूण ४ मोड्यूल्स उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याचे सविस्तर वेळापत्रक सोबत जोडण्यात आलेले आहे.
शिक्षक आपल्या पसंतीनुसार एका वेळी एक किंवा एका पेक्षा जास्त मोड्यूल्स चे ऑनलाईन प्रशिक्षण घेऊ शकतात.उपलब्ध करून देण्यात आलेले मोड्यूल्स हे विहित मुदतीमध्ये शिक्षकांनी पूर्ण करणे आवश्यक आहेत.
याचे सविस्तर वेळापत्रक सोबत जोडण्यात येत आहे.
ऑनलाईन नोंदणी व लॉगीन तसेच इतर शंका दूर करण्यासाठी आवश्यक सर्व व्हिडीओ देखील पत्रासोबत देण्यात आलेले आहे. तसेच सदरच्या प्रशिक्षणासाठीची ऑनलाईन नोंदणी असणे आवश्यक आहे. तसेच दिनांक ०१ जानेवारी, २०२२ पासून सदरच्या प्रशिक्षणास सोबतच्या वेळापत्रकानुसार सुरुवात होत आहे.

 



सदर प्रशिक्षणासाठी प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात येत असून ज्यांनी यापूर्वी प्रत्यक्षामधील निष्ठा प्रशिक्षण तसेच ऑनलाईन स्वरुपामधील प्रशिक्षण यामध्ये काम केले आहे. अशा प्रती जिल्हा २ SRP यांची जिल्हा समन्वयक म्हणून नियुक्ती
संदर्भ क्रमांक ३ नुसार करण्यात आलेली आहे.
तसेच कार्यरत आय.टी.विषय सहायक यांना तांत्रिक कामाची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे.
याकरिता आवश्यक सविस्तर उद्बोधन आयोजित करण्यात येईल.
याचबरोबर सदरच्या ऑनलाईन प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र हे जो प्रशिक्षणार्थी कोर्स वर आधारित मुल्यांकनामध्ये किमान ७०% गुणांकन प्राप्त करेल अशाच प्रशिक्षणार्थ्यास प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र ऑनलाईन स्वरूपामध्ये प्राप्त होणार आहे, याची नोंद घ्यावी.
तसेच वेळापत्रकानुसार उपलब्ध करून देण्यात आलेला कोर्सेस (मोड्यूल्स) ला सर्व प्रशिक्षणार्थी यांनी जॉईन करून ठेवणे गरजेचे आहे. विहित ३० दिवसांच्या मुदतीच्या ५ दिवस पूर्वीस प्रशिक्षणार्थी कोर्स
(मोड्यूल) जॉईन करू शकणार नाही याची नोंद घ्यावी.
तरी उपरोक्त मुद्यांच्या अनुषंगाने ऑनलाईन स्वरूपामध्ये निष्ठा प्रशिक्षण DIKSHA अॅपच्या माध्यमातून प्राथमिक शाळांतील इयत्ता १ ली ते ५ वी च्या वर्गाना अध्यापन करणाऱ्या शिक्षक व मुख्याध्यापक यांनी पूर्ण करावे
यासाठी सर्व शाळा व शिक्षकांना याबाबत अवगत करण्यात यावे, तसेच आवश्यक कार्यवाही आपल्या स्तरावरून करण्यात यावी, जेणेकरून राष्ट्रीय स्तरावरील सूचनांप्रमाणे निर्धारित वेळेमध्ये सदरचे ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण करणे शक्य होईल.  
ही माहिती इंग्रजीत पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.


 









. क्र.

कालावधी

कोर्स क्रमांक नाव

1 जानेवारी ते 30 जानेवारी 2022

१.      पायाभूत साक्षरता संख्याज्ञान

अभियानाची ओळख

. क्षमताधिष्ठीत शिक्षणाकडे वाटचाल.

. अध्ययनार्थ्यांचे आकलन :

 मुल कसे शिकते?

. पायाभूत साक्षरता संख्याज्ञान

अभियानात

पालकांचा समाजाचा सहभाग

31 जानेवारी ते 1 मार्च 2022

. विद्याप्रवेश आणि बालवाटीकेचे

 आकलन

. पायाभूत भाषा आणि साक्षरता.

. प्राथमिक स्तरावर बहुभाषिक शिक्षण

. अध्ययन मुल्यांकन.

2 मार्च ते  31 मार्च 2022

१०. पायाभूत संख्या ज्ञान

११.अध्ययन अध्यापन मुल्यांकनामध्ये

माहिती तंत्रज्ञाचा वापर

१२. शालेय शिक्षणातील पुढाकार

१३. खेळणीधारित अध्यापनशास्त्र

1 एप्रिल ते 30 एप्रिल 2022

सर्व कोर्स उपलब्ध करून देण्यात येतील या

कालावधीमध्ये उर्वरित प्रशिक्षणार्थी यांनी

 सदरचे कोर्स पूर्ण करावेत.




(एम.डी. सिंह)
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,
सोबत :- प्रशिक्षण वेळापत्रक
महाराष्ट्र, पुणे.
प्रत माहितीस्तव सविनय सादर
मा. अपर मुख्य सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई.
मा. आयुक्त (शिक्षण), आयुक्त कार्यालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.
मा. राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई.
x
x

Post a Comment

1 Comments

Total Pageviews