Ticker

10/recent/ticker-posts

About starting school classes safely

 About starting school classes safelyविषय :- राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता ५ वी ते १२ वी व शहरी भागातील इयत्ता ८ वी ते १२ वी च्या शाळांचे वर्ग सुरक्षितपणे .०४/१०/२०२१ पासुन सुरु करणेबाबत.

संदर्भ :- १. शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण: २०२१/प्र.क्र.९४/एसडी-६, दि.०७/०७/२०२१.

२. सार्वजनिक आरोग्य विभागाचे Break the Chain-Modified Guidelines आदेश,

दि.०२/०८/२०२१.

३.शासन परिपत्रक क्र. संकीर्ण २०२१/प्र.क्र.११३/एसडी-६, दि. १०/०८/२०२१.

४. शासन परिपत्रक क्र. संकीर्ण :२०२१/प्र.क्र.११३/एसडी-६ दि. २४/०९/२०२१.

५. मा. मंत्री, शालेय शिक्षण यांच्या दि.०२ ऑक्टोबर २०२१ रोजीच्या व्हिडीओ कॉन्फरन्स मधील सूचना कोविड-१९ च्या परिस्थितीचा आढावा घेऊन शैक्षणिक वर्ष सन २०२१-२२ मध्ये राज्यातील ग्रामीण भागातील इ. ५ वी ते १२ वी व शहरी भागातील इ. ८ वी ते १२ वी च्या शाळांचे वर्ग दि. ०४/१०/२०२१ पासून सुरु करण्यास राज्य शासनाने दि. २४/०९/२०२१ च्या शासन परिपत्रकाद्वारे मान्यता दिलेली आहे. संदर्भादिन शासन परिपत्रक दि. ०७/०७/२०२१, दि. १०/०८/२०२१ व दि. २४/०९/२०२१ मध्ये दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन शाळा सुरु करावयाच्या आहेत. शाळा सुरु करण्याकरीता करावयाची पुर्वतयारी याबाबत दि.२६/०९/२०२१ व दि. ३०/०९/२०२१ रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित केलेल्या बैठकांमध्ये विस्तृत सुचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच दि.०२ ऑक्टोंबर, २०२१ रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित केलेल्या बैठकीमध्ये मा.मंत्री शालेय शिक्षण यांनी दिलेल्या सूचनांचे ही काटेकोरपणे पालन करण्यात यावे. यानुषंगाने आपणास खालील प्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत.

१. दि. ०७/०७/२०२१, दि. १०/०८/२०२१ व दि. २४/०९/२०२१ च्या शासन परिपत्रकामध्ये दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करुन ग्रामीण भागातील ५ वी ते १२ व शहरी भागातील ८ वी ते १२ चे वर्ग सुरु करण्यात यावेत.

२. शाळा सुरु करण्याकरीता जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व महानगरपालिकांचे आयुक्त यांना शाळा सुरु करण्याबाबत करण्यात आलेली पुर्वतयारी व शाळा सुरु करण्याकरीता केलेल्या नियोजनाची माहिती अवगत करुन देऊन शाळा सुरु करण्याकरीता मान्यता घेण्यात यावी.

३. दि. ०४/१०/२०२१ रोजी शाळा सुरु करतेवेळी प्रत्येक शाळेमध्ये शिक्षणोत्सव साजरा करावा. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे अनौपचारीक स्वागत करावे जेणेकरुन शाळा स्तरावर शैक्षणिक वातावरण

निर्मिती होईल.

दि. ०४/१०/२०२१ रोजी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या ( विभागीय शिक्षण

उपसंचालक, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, शिक्षणाधिकारी, वरिष्ठ अधिव्याख्याता,उपशिक्षणाधिकारी , गटशिक्षणाधिकारी, अधिव्याख्याता, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, विषय सहाय्यक इ.) शाळा भेटींचे नियोजन करण्यात यावे व करण्यात आलेल्या नियोजनाची एक प्रत

प्राथमिक/माध्यमिक शिक्षण संचालनालयास सादर करावी.

सदर अधिकारी व कर्मचारी यांनी दिलेल्या शाळा भेटीचे फोटो, व्हिडीओ आपल्या अथवा आपल्या सहकाऱ्याच्या फेसबुक/ इन्स्टाग्राम/ ट्विटर या पैकी एका अथवा सर्व समाजमाध्यमावर पोस्ट करावेत. पोस्ट सोबत आपले नाव, पद, जिल्हा, तालुका, भेट दिलेल्या शाळेचे नाव, यु डायस

क्रमांक, भेटीचा दिनांक व वेळ यांचा लिखित (टेक्स्ट) तपशील देखील अपलोड करावा.

सदर पोस्ट वरील प्रमाणे फेसबुक/ इन्स्टाग्राम/ ट्विटर या समाज माध्यमावर पोस्ट करताना ती

Public असावी. तसेच फेसबुक वर पोस्ट करत असताना ती Story मध्ये शेअर न करता Wall वर शेअर करण्यात यावी.

भेटीच्या फोटोसोबत आपण आपल्या भेटीचा / शाळेतील कार्यक्रमाचा व्हिडीओ पोस्ट करत असल्यास तो जास्तीत जास्त २ ते ३ मिनिटांपर्यंतचा असावा तसेच फोटो व व्हिडीओ सुस्पष्ट असेल याची काळजी घ्यावी.

उपरोक्त प्रमाणे समाजमाध्यमावर पोस्ट करत असताना दिलेल्या #MVMJ२०२१, #शिक्षणोत्सव

या #HASHTAG चा वापर करावा.

तसेच समाजमाध्यमांवर पोस्ट करत असताना सदर पोस्ट खालीलप्रमाणे टॅग करून अपलोड

करण्यात यावेत

१) फेसबुक- @SCERT,Maharashtra , @thxteacher ,

२) ट्विटर वर- @scertmaha , @thxteacher

३) इंस्टाग्राम वर- @scertmaha , @thankuteacher

समाजमाध्यमांवर पोस्ट शेअर करत असताना आपण लिहिलेला तपशील, सर्व # व टॅग पूर्ण केले आहेत व आपण अपलोड करत असलेले फोटो सुस्पष्ट आहेत याची तपासणी करून व पोस्ट Public असावी याची काळजी घेऊन पोस्ट करावेत.

आपली पोस्ट उपरोक्त नमूद ३.२ ते ३.६ मध्ये देण्यात आलेल्या सूचनांप्रमाणे अपलोड करण्यात यावेत.

शाळेमध्ये विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात यावे व त्याचे देखील फोटो ३.२ ते ३.६ मध्ये देण्यात आलेल्या सूचनांप्रमाणे अपलोड करण्यात यावेत.

३.९ आपण पोस्ट केलेली समाजमाध्यमावरील पोस्टची लिंक कॉपी करून घ्यावी व

https://scertmaha.ac.in/mmj या प्रणालीवर जाऊन आवश्यक तपशील भरून सदर लिंक सबमिट करण्यात यावी.

३.१० उपरोक्त प्रमाणे ३.२ ते ३.९ मधील सूचनांप्रमाणे कार्यवाही केल्यावरच आपल्या भेटीची नोंद राज्यस्तर प्रणालीवर नोंदविण्यात येईल.

३.११ उपरोक्त प्रमाणे शाळा, शिक्षक, मुख्याध्यापक देखील आपल्या शाळेतील शिक्षणोत्सवाचे फोटो, व्हिडीओ पोस्ट करू शकतील.

३.१२ विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे लवकरात लवकर वाटप करण्यात यावे.

४. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या स्तरावर जिल्हास्तरीय आरोग्य अधिकाऱ्यांच्या समवेत बैठक घेण्यात यावी. उक्त बैठकीमध्ये सर्व शाळा नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी संलग्नित करण्यात

याव्यात आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या बाबतीत घ्यावयाच्या काळजीबाबत संबंधितांना योग्य त्या सूचना निर्गमित करण्याची कार्यवाही करण्यात यावी.

४.१ सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे कोविड-१९ प्रतिबंधात्मक लसीकरण प्रथम प्राधान्याने करुन घ्यावे व ज्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे लसीकरण झालेले नाही, त्यांना

लसीकरणासाठी प्रवृत्त करावे.

४.२ कोविड-१९ प्रतिबंधात्मक लसीकरण केलेलं नाही या कारणास्तव कोणत्याही शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना अनुपस्थित राहता येणार नाही.

४.३ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सर्व शाळांमधील शिक्षकांची उपस्थिती १०० टक्के ठेवण्यात यावी.

४.४ ज्या शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कोविड-१९ प्रतिबंधात्मक लस घेतलेली आहे अशा शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना RTPCR चाचणी सक्तीची करू नये.

५. मा.मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन हे दि.०४ ऑक्टोंबर, २०२१ रोजी १२.०० नंतर “माझे विद्यार्थी माझी जबाबदारी या कार्यक्रमा अंतर्गत सर्व शाळा, मुख्याध्यापक व शिक्षक यांना संबोधित करणार आहेत. तरी

उक्त कार्यक्रम सर्वांनी Youtube वरती पहावा व शक्य झाल्यास विद्यार्थ्यांना देखील सदर कार्यक्रम दाखविण्यात यावा. सदर कार्यक्रमाची लिंक सर्वांना समाजमाध्यमांद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल.

६. कोविड-१९ च्या प्रतिबंधात्मक कामकाजाकरीता शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. शाळा सुरु झाल्या असल्यामुळे शिक्षकांना शाळेवरती रुजु होणकरीता कोविड-१९ च्या कामकाजामधून

कार्यमुक्त करणेबाबत संबंधित प्रशासकीय यंत्रणेस कळवून उक्त शिक्षक शाळा स्तरावर लवकरात लवकर रुजु होतील याची दक्षता घ्यावी.

७. कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पालकांबरोबर मुलांचेही स्थलांतर झालेले आहे. सबब, शाळाबाह्य झालेल्या मुलांचा शोध घेऊन अशा मुलांना शाळेमध्ये प्रवेशीत करुन घ्यावेत.

एकही मुल शाळाबाह्य राहणार नाही याकरीता गृहभेटी द्याव्यात.

७.१ ग्रामीण भागातील इ.१ ली ते ४ थी व शहरी भागातील इ.१ ली ते ७ वी च्या शाळा सुरु होईपर्यंत उक्त वर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षकांनी ऑनलाईन शिक्षण देवून आवश्यकतेनुसार विद्यार्थ्याच्या घरी शिक्षकांनी भेटी देवून विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन करावे.

८. शाळा व्यवस्थापन समिती व पालक यांच्या बैठका आयोजित करून विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती वाढविण्याचे प्रयत्न करावेत.

८.१ शाळा व शाळेचा परिसर स्वच्छ करण्यात यावा तसेच निर्जंतुकीकरण करण्यात यावे व त्यासाठी येणारा खर्च समग्र शिक्षा कार्यक्रमा अंतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधीमधून करण्यात यावा.

८.२ शालेय कामकाजाचे तास वाढविण्याकरीता स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यात यावा.

८.३ कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्याचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्याकरीता विद्यार्थ्यांना उपचारात्मक अध्यापन करण्यात यावे.

९. विभागीय शिक्षण उपलसंचालक यांनी आपल्या स्तरावरुन शाळा सुरु करण्याकरीता करण्यात आलेल्या पुर्वतयारीचा आढावा घेऊन दि.०४/१०/२०२१ पासून सुरु होणाऱ्या शाळांची संख्या व त्यामधील पटसंख्या याची माहिती संकलीत करावी. तसेच दि. ०४/१०/२०२१ पासून दररोज प्रत्येक तारखेला सुरु असलेल्या शाळांची संख्या व त्यामधील उपस्थित विद्यार्थ्यांची संख्या, शिक्षकांची संख्या यांची जिल्हानिहाय माहिती

संकलीत करुन एकत्रित अहवाल दररोज सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत सादर करण्याची दक्षता घ्यावी.

९.१

विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सुरु झालेल्या शाळा व शाळेमधील उपस्थित विद्यार्थी संख्या याची माहिती संकलीत करणे आणि शाळा स्तरावर येणाऱ्या अडीअडचणी याचा दररोज आढावा घेऊन त्याचा अहवाल सादर करण्याकरीता कार्यालयातील सहाय्यक संचालक यांचेवर जबाबदारी निश्चित करावी.

विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील सहाय्यक संचालक यांनी उक्त प्रमाणे कामकाज करुन प्राथमिक/माध्यमिक शिक्षण संचालनालय व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,

महाराष्ट्र, पुणे. यांच्याशी समन्वय ठेऊन आवश्यक ते सर्व कामकाज पार पाडावेत.

९.२

वरीलप्रमाणे दिलेल्या सुचनांचे पालन करुन दि.०४/१०/२०२१ पासून ग्रामीण भागातील इ.५ वी ते १२ वी व शहरी भागातील इ. ८ वी ते १२ वी च्या शाळांचे वर्ग सुरक्षितपणे सुरु करण्याची कार्यवाही करण्यात यावी.
(विशाल सोळंकी भा.प्र.से.)

आयुक्त शिक्षण

महाराष्ट्र राज्य पुणे.

प्रत माहितीस्तव सविनय सादर :मा. अपर मुख्य सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई.

प्रत आवश्यक त्या कार्यवाहीस्तव

१. राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई

२. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.

३. शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.

४. शिक्षण संचालक (प्राथमिक), शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.

५. संचालक, बालभारती, पुणे.

६. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सर्व.
Post a Comment

0 Comments

Total Pageviews