Ticker

10/recent/ticker-posts

Learn with Fun शिकू आनंदे

 

शिकू  आनंदे (Learn with Fun)  या उपक्रमाबाबत      



 विषय: " शिकू  आनंदे "(Learn with Fun)  या उपक्रमाबाबत .....     
*महत्त्वाचे* 

                                                 

       उपरोक्त विषयानुसार, मार्च २०२० पासून कोविडच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्व  शाळा बंद होत्या.टप्याटप्याने शाळा सुरू होत आहेत. अशा परिस्थितीत मुलांचे शिकणे सुरु रहावे, या हेतूने  राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषेदे मार्फत online पद्धतीने विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत.  शाळा बंद व लॉकडाऊन मुळे शहरी भागात बहुतांश मुले ही घरातच बंदिस्त होती. 

खेळण्याच्या वयात मुले घरात बंदिस्त झाल्याने अनेक प्रकारच्या  शारीरिक व मानसिक समस्या मुलांमध्ये  निर्माण होऊ शकतात, या बाबीचा विचार करून परिषेदेच्या सामाजिक शास्र व कला क्रीडा विभागामार्फत  इ.१ ली ते ८ वीच्या वर्गात अध्ययन करणाऱ्या राज्यातील सर्व मुलांसाठी कला, शारीरिक शिक्षण व कार्यानुभव या विषयाबाबत दर शनिवारी दि.3 जुलै 2021 पासून  online पद्धतीने *“शिकू  आनंदे ”* (Learn with Fun) हा उपक्रम  सुरू करण्यात आला आहे.

 दि. 14 ऑगस्ट 2021 रोजीच्या सत्रात  *नृत्य, गायन, कागदकाम व मुलाखत*  या विषयाबाबत  तज्ञ शिक्षकाकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.


 स.९ ते १० या वेळेत इ.१ ली ते ५ वी साठी हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. पुढील यु ट्यूब लिंकद्वारे आपणाला या कार्यक्रमात सहभागी होता येईल. 


 स.१० ते ११ या वेळेत इ. ६ वी ते ८ वी 
च्या मुलांसाठी कार्यक्रम संपन्न होणार असून पुढील यु-ट्यूब लिंकद्वारे सहभागी होता येईल.


 

   -
एम.देवेंदर सिंह (भा.प्र.से.)
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र पुणे
                                             

Post a Comment

0 Comments

Total Pageviews