Ticker

10/recent/ticker-posts

Scholarship Exam 5th and 8th

 पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा(इ. ८ वी) दि. ०८/०८/२०२१ ऐवजी दि. ०९/०८/२०२१ घेण्यात येणार आहे. 




प्रसिध्दीपत्रक

संदर्भ - १. श्री. राजेंद्र पवार, उपसचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय यांचे पत्र क्रमांक एफईडी२०२०/प्र.क्र.४/एसडी-५, दि. ११/०९/२०२१.

२. शिष्यवृत्ती परीक्षा २०२१ अधिसूचना जा.क्र.मरापप/शिष्यवृत्ती/२०२०-२१/८९१, दि. ०९/०३/२०२१

३. या कार्यालयाचे प्रसिध्दीपत्रक दि. २१/०३/२०२१.

४. श्री. राजेंद्र पवार, उपसचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय यांचे पत्र क्रमांक एफईडी -

२०२०/प्र.क्र.४१/एसडी-५, दि. ३०/०३/२०२१.

५. या कार्यालयाचे प्रसिध्दीपत्रक दि. ३०/०३/२०२१.

६. या कार्यालयाचे प्रसिध्दीपत्रक दि. १०/०५/२०२१.

७. श्री. राजेंद्र पवार, सह सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय यांचे पत्र क्रमांक एफईडी२०२०/प्र.क्र.४/एसडी-५, दि. २०/०७/२०२१.

उपरोक्त संदर्भ क्र. ४ च्या पत्रान्वये परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) ही दि. २३/०५/२०२१ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार असलेबाबत संदर्भ क्र. ५ च्या प्रसिध्दीपत्रकान्वये जाहिर करण्यात आले होते. तद्नंतर राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता विद्यार्थी हितास प्राधान्य देऊन सदर परीक्षा तूर्त पुढे ढकलण्यात आली होती.तथापि संदर्भ क्र. ६ च्या शासनपत्रानुसार पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) ही दि. ०८/०८/२०२१ रोजी घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. परंतु दि. ०८/०८/२०२१ रोजी काही जिल्ह्यांत केंद्र शासनामार्फत सेंट्रल आर्म पोलीस फोर्स या पदासाठीची लेखी परीक्षा घेण्यात येणार असल्याने पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा(इ. ८ वी) दि. ०८/०८/२०२१ ऐवजी दि. ०९/०८/२०२१ घेण्यात येणार आहे. तसेच सदर परीक्षेचे प्रवेशपत्र दि.२७/०७/२०२१ रोजी संबंधित शाळांच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. उपरोक्त बदलाबाबत सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

आपल्या शाळेचा यु डायस नंबर व पासवर्डद्वारे आपण हॉल तिकीट डाउनलोड करू शकता.

शिष्यवृत्ती पाचवी आठवी हॉल तिकीट डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. 

स्कॉलरशिप परीक्षा पाचवी व आठवी भरपूर सराव व्हावा म्हणून व्हिडिओ पहा आणि ऑनलाईन सराव पेपर सोडवा.

व्हिडीओ पाहण्यासाठी व ऑनलाईन सराव पेपर  सोडवण्यासाठी खालील लिंकवर स्पर्श करा.



ठिकाण - पुणे

दि.- २७1०७/20२१

(तुकाराम सुपे)

आयुक्त तथा अध्यक्ष,

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,

पुणे - ०१.




Post a Comment

1 Comments

Total Pageviews