Ticker

10/recent/ticker-posts

Learn with Fun शिकू आनंदे

 

शिकू  आनंदे (Learn with Fun)  या उपक्रमाबाबत      



 विषय: " शिकू  आनंदे "(Learn with Fun)  या उपक्रमाबाबत .....                                                   
       उपरोक्त विषयानुसार, मार्च २०२० पासून कोविडच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्व  शाळा बंद होत्या.टप्याटप्याने शाळा सुरू होत आहेत. अशा परिस्थितीत मुलांचे शिकणे सुरु रहावे, या हेतूने  राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषेदे मार्फत online पद्धतीने विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत.  शाळा बंद व लॉकडाऊन मुळे शहरी भागात बहुतांश मुले ही घरातच बंदिस्त होती. खेळण्याच्या वयात मुले घरात बंदिस्त झाल्याने अनेक प्रकारच्या  शारीरिक व मानसिक समस्या मुलांमध्ये  निर्माण होऊ शकतात, या बाबीचा विचार करून परिषेदेच्या सामाजिक शास्र व कला क्रीडा विभागामार्फत  इ.१ ली ते ८ वीच्या वर्गात अध्ययन करणाऱ्या राज्यातील सर्व मुलांसाठी कला, शारीरिक शिक्षण व कार्यानुभव या विषयाबाबत दर शनिवारी दि.3 जुलै 2021 पासून  online पद्धतीने “शिकू  आनंदे (Learn with Fun) हा उपक्रम  सुरू करण्यात आला आहे. 

दि. 31जुलै 2021रोजीच्या सत्रात मा. प्रा. वर्षाताई गायकवाड, मंत्री,शालेय शिक्षण विभाग उपस्थित राहून विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत .

या सत्रात वर्कआउट,नृत्य, नाट्य व आपत्ती व्यवस्थापन*  या विषयाबाबत  तज्ञ शिक्षकाकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. 

स.९ ते १० या वेळेत इ.१ ली ते ५ वी साठी हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

 पुढील यु ट्यूब लिंकद्वारे आपणाला या कार्यक्रमात सहभागी होता येईल. 


 स.१० ते ११ या वेळेत
 इ. ६ वी ते ८ वीच्या मुलांसाठी कार्यक्रम संपन्न होणार असून पुढील यु-ट्यूब लिंकद्वारे सहभागी होता येईल.



   
दिनकर टेमकर
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र पुणे

Post a Comment

1 Comments

Total Pageviews