Ticker

10/recent/ticker-posts

10th Class result

 इयत्ता 10 वी निकाल दिनांक १६/०७/२०२१ रोजी दुपारी ०१.०० वाजता ऑनलाईन जाहीर होणार


इयत्ता दहावीचा निकाल  आपण खालील लिंक वर पाहू शकता.






महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे ४११ ००४.
प्रकटन
विषय : सुधारित मूल्यमापन कार्यपध्दतीनुसार माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षा सन
२०२१ चा निकाल व विविध तपशील जाहीर करणेबाबत.
शासन निर्णय क्र.परीक्षा ०५२१/प्र.क्र.४३/एसडी-२ दि.२८/०५/२०२१ मध्ये निश्चित केलेल्या मूल्यमापन कार्यपध्दती तसेच मंडळाचे दि.०९/०६/२०२१ रोजीच्या परिपत्रकामधील सूचनानुसार माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षा सन २०२१ चा निकाल मंडळामार्फत तयार करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत सन २०२१ मध्ये माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा उपरोक्त निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर शुक्रवार, दिनांक १६/०७/२०२१ रोजी दुपारी ०१.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे. माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षा सन २०२१ साठी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण खालील संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट)घेता येईल. मंडळाचे अधिकृत संकेतस्थळ पुढीलप्रमाणे आहे.
तसेच


 या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.सदर निकालाबाबतचा अन्य तपशील पुढीलप्रमाणे• सन २०२१ माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षा शासन निर्णयानुसार रद्द करण्यातआल्यामुळे शासन निर्णयातील मूल्यमापन कार्यपध्द्तीनुसार इ.९ वीचा अंतिम निकाल, इ.१०वीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन व इ.१० वीचे अंतिम तोंडी/प्रात्यक्षिक/अंतर्गत मूल्यमापन इत्यादींच्या आधारे माध्यमिक शाळांमार्फत विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुणदान करण्यात आले आहे. त्याप्रमाणे मंडळाने विहित कार्यपध्द्तीनुसार सदर परीक्षेचा निकाल तयार करण्याची प्रक्रिया केलेली आहे.• दि.२८ मे,२०२१ रोजीच्या शासन निर्णयातील तरतूदीनुसार सन २०२१ माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षेस श्रेणीसुधार योजनेतंर्गत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्यात आलेला नाही. सदर विद्यार्थ्यांसाठी असलेल्या दोन संधीमध्ये या परीक्षेची गणना करण्यात येणार नाही. त्यामुळे सदर विद्यार्थ्यांना पुढील एक /दोन संधी उपलब्ध राहतील.

दिनांक-१५/७/२०२१
(डॉ अशोक भोसले
)
सचिव,
राज्यमंडळ, पुणे - ०४.

Post a Comment

10 Comments

Total Pageviews