Ticker

10/recent/ticker-posts

U dise plus form

विषयः सर्व मान्यता प्राप्त शाळांची माहिती सन २०२१-२२ यु-डायस प्लस ऑनलाईन प्रणालीद्वारे संगणकीकृत करणेबाबत मार्गदर्शक सूचना.
(https://udiseplus.gov.in/)
संदर्भ: स्कूल शिक्षा और साक्षरता विभाग शिक्षा मंत्रालय, भारत सरकार यांचे पत्र क्र.D.O.No.२३-४/२०२२-Stats दि.२१ मार्च, २०२२.
संदर्भिय पत्रान्वये राज्याची सर्व शाळांची माहिती ऑनलाईन यु-डायस प्लस प्रणालीमध्ये राज्य/जिल्हा/महानगरपालिका/तालुक/शाळास्तरावरुन ३० सप्टेंबर, २०२१ या संदर्भिय दिनांकानुसार संगणकीकृत करण्याकरिता कळविले आहे.
देशामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सन २०२० ची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. त्यानुसार यु-डायस प्लसचे प्रपत्र व ऑनलाईन सॉफ्टवेअर अद्ययावत करण्यात आलेले असून ते सर्वांसाठी ऑनलाईन पोर्टलवरून उपलब्ध करून दिलेले आहे. दरवर्षीप्रमाणे यु-डायस प्लस प्रणालीमध्ये सर्व शाळांची माहिती संकलित व संगणकीकृत करून अंतिम माहिती दि. ३१ मे, २०२२ पर्यंत पूर्ण करण्याकरिता
कळविले आहे.
यु-डायस प्रणालीमध्ये झालेले बदल व वस्तुनिष्ठ माहिती प्राप्त होण्याच्या अनुषंगाने यु-डायस प्लस प्रणालीचे काम करण्याऱ्या अधिकारी/कर्मचारी यांचे राज्य/जिल्हा/महानगरपालिका/तालुक/केंद्र प्रमुख/शाळेचे मुख्याध्यापक यांचे प्रशिक्षण घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्यात यावे. त्या अनुषंगाने राज्य स्तरावरून दि. १८ एप्रिल, २०२२ रोजी जिल्हा स्तरावरील संबंधित अधिकाऱ्यांचे ऑनलाईनद्वारे प्रशिक्षण/चर्चा/मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे आपल्या स्तरावरून तालुका/केंद्र/शाळा स्तरावरील संबंधितांचे प्रशिक्षण घेऊन मार्गदर्शन करण्यात यावे.
भारत सरकारकडून प्राप्त झालेल्या पत्रानुसार सर्वांना कळविण्यात येते की, सन २०२१-२२ या वर्षातील सर्व शाळांची माहिती दि. २५ मे, २०२२ पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अंतिम करून भारत सरकारला वेळेत सादर करण्याकरिता आपल्या स्तरावरून संबंधितांना आदेशति करावे. माहिती संकलनासाठी आवश्यक संदर्भिय पत्र, सन २०२१-२२ चे यु-डायस प्रपत्र, मार्गदर्शक सूचना, यु-डायस 


Udise Form कोरा. फॉर्म मराठी मध्ये डाऊनलोड करण्यासाठी येथे स्पर्श करा.


Post a Comment

0 Comments