Ticker

10/recent/ticker-posts

 सर्व शाळेसाठी महत्वाचे

  2020-21 ची शाळासिद्धी  माहिती 26 एप्रिल 2021 पर्यंत पूर्ण करणेबाबत


शाळा सिद्धी माहिती  26 एप्रिल 2021 पर्यंत पूर्ण करणे


विषय :- शाळासिध्दी कार्यक्रमांतर्गत शाळांचे सन २०२०-२१ स्वयंमूल्यमापन पूर्ण करणेबाबत
संदर्भ :- १. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र.शैगुवि/२०१६/(१२/२०१६) एस.डी.६,
दि.३०/०३/२०१६
२. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र.शैगुवि/२०१६/(१८९/२०१६) एस.डी.६,
दि.०७/०१/२०१६
३.या कार्यालयाचे पत्र जाक्र/मराशैसंप्रप/शाळासिद्धी/२०१९-२०/४७८४ दि.०६/१२/२०१९
४.निपा,नवी दिल्ली (शाळासिद्धी कक्ष ) यांचा दि.१५/०३/२०२१ रोजीचा ई मेल
उपरोक्त संदर्भिय पत्र क्र. १ व २ नुसार राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे मूल्यांकन व प्रमाणिकरण करून घेणे व शाळांची गुणवत्ता आश्वासित करणे महत्त्वाचेअसून शैक्षणिक,भौतिक तसेच संस्थात्मक गुणवत्ता वाढीच्या उद्देशाने राज्य शासनाने राष्ट्रीय पातळीवरील शाळासिध्दी हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. त्यानुसार राज्यातील १००% शाळांचे स्वयंमूल्यमापन निपा,नवी दिल्ली यांच्या शाळासिद्धी वेबपोर्टलवर करणे आवश्यक आहे.संदर्भिय शासन निर्णयानुसार दरवर्षी राज्यातील १००% शाळांचे स्वयंमूल्यमापन करावयाचे आहे. संदर्भ क्रं ३ अन्वये आपण आपल्या जिल्हयातील शाळासिध्दी संपर्क अधिकारी (NodalOfficer) व तालुकास्तरीय शाळासिध्दी संपर्क अधिकारी यांची निवड केली आहे.संदर्भ क्र. ४ अन्वये शाळासिध्दी कार्यक्रमासाठी निपा, नवी दिल्ली यांच्याwww.shalasiddhi.niepa.ac.in या वेबपोर्टलवरील सन २०२०-२१ च्या शाळांच्या स्वयंमूल्यमापनाची
टॅब सुरु झाली आहे. सर्व शाळांनी या आपल्या शाळेचे सन २०२०-२१ मधील स्वयंमूल्यमापन पूर्ण
करून त्याची माहिती दि.२६एप्रिल,२०२१ पर्यंत शाळासिद्धी वेबपोर्टलवर भरावयाची आहे. शाळासिध्दी
कार्यक्रमाची संपूर्ण माहिती www.shalasiddhi.niepa.ac.in वेबपोर्टलवर आहे .वेबपोर्टलचा वापर कसा करावा यासाठी वेबपोर्टलवर माहिती ( USERMANUAL) देण्यात आली आहे .यासोबत मराठी
माध्यमाची शाळासिद्धी पुस्तिका देखील उपलब्ध आहे.तसेच दि.२५/०३/२०२१ रोजी झालेले
शाळासिद्धी स्वयंमूल्यमापन वेबिनार https://youtu.be/B1XpcivTU0c या युट्यूबच्या लिंकवर उपलब्ध
आहे. सर्व शाळांनी सन २०२०-२१ मधील स्वयंमूल्यमापन सदर वेबिनार मधील निपा, नवी दिल्ली यांनी
दिलेल्या सूचनांनुसार पूर्ण करावे.
सन २०२०-२१ चे शाळांचे स्वयंमूल्यमापन करतांना मुख्याध्यापकांनी शाळासिध्दीची
स्वतंत्र संचिका करून त्यात USERNAME आणि PASSWORD स्वत:च्या ताब्यात ठेवावे.
मुख्याध्यापकांची बदली झाल्यास कार्यभार हस्तांतरणाच्यावेळी सदर संचिका पुढील मुख्याध्यापकाकडे
हस्तांतरीत करावी.सन २०२०-२१ चे स्वयंमूल्यमापनपूर्ण केलेल्या शाळांनी त्याची हार्ड कॉपी सदर
संचिकेत लावावी व असे दरवर्षी करावे.
तरी सर्व शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक/मनपा), शिक्षण निरीक्षक, प्रशासन अधिकारी
यांनी आपल्या अधीनस्त अधिका-यांमार्फत १००% शाळांचे स्वयंमूल्यमापन पूर्ण करून घेण्याबाबत
कार्यवाही करावी.
अशा प्रकारे 30/03/2021 रोजीचा वरील G.R.आहे.


शाळासिद्धी

 शाळासिद्धी माहिती भरण्यासाठी व लॉगिन करण्यासाठीं खालील लिंकवर स्पर्श करा

मागील सर्व सर्व G.R.साठी व माहितीसाठी

खालील लिंकवर स्पर्श करा


CLICK HERE

CLICK HERE 




शाळासिद्धी गुण

एकून सात क्षेत्र व 46 गाभामानके आहेत.46 गाभामानकांसाठी 

गुणनिश्चिती

स्तर 1 असल्यास 1 गुण 

स्तर 2 असल्यास 2 गुण 

स्तर 3 असल्यास 3 गुण 

स्वयंमूल्यमापण झालेल्या प्रत्येक शाळेला कमित कमी 46 व जास्तीत जास्त 138 गुण मिळतात. 


 टक्केवारी 

81 % ते 100 % ए ग्रेड

50 % ते 80 % बी ग्रेड

50 % पेक्षा कमी सी ग्रेड


आपल्या शाळेचा ग्रेड असा काढा

शाळासिध्दी ए ग्रेड शाळांना 138 पैकी मिळालेले गुण दर्शविले आहे. या गुणाला / पाॅईंटला 1.38 ने भाग दिल्यास टक्केवारी समजते.

उदा.

112 ÷ 1.38 = 81.15 %

Post a Comment

9 Comments

  1. शाळा बंद विद्यार्थी हजेरी कशी भरावी

    ReplyDelete
    Replies
    1. क्षेत्र क्रमांक. ३ विद्यार्थ्यांची प्रगती, संपादणूक आणि विकास हे क्षेत्र कसे भरावे

      Delete
  2. विद्यार्थी उपस्थिती १००% भरावी

    ReplyDelete

Total Pageviews