2020-21 ची शाळासिद्धी माहिती पूर्ण करणेबाबत
शाळासिद्धी पासवर्ड संदर्भात माहिती
पर्याय क्रमांक 1
USERNAME शाळेचा यू डायस नंबर
PASSWORD आपणास मिळालेला पासवर्ड टाकणे.
आपल्याकडे शाळेचा पासवर्ड उपलब्ध नसल्यास खालील पर्याय अवलंबावा
पर्याय क्रमांक 2
USERNAME शाळेचा यू डायस नंबर
PASSWORD मुख्याध्यापकाचा जो मोबाईल क्रमांक शाळा सिद्धी ला रजिस्टर असेल. जर आपण Forget password हा ऑप्शन निवडला तर आपल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल.
जर शाळासिध्दी ला मोबाईल क्रमांक कोणता रजिस्टर आहे हे माहीत नसल्यास खालील पर्याय अवलंबावा
पर्याय क्रमांक 3
USERNAME शाळेचा यू डायस नंबर
PASSWORD आपण ज्या तालुक्यात असाल या तालुक्यातील गट साधन केंद्राशी संपर्क साधून आपल्या शाळेचा पासवर्ड मिळवायचा आहे. प्रत्येक तालुक्याला शाळासिध्दी चे लॉगिन आहे. सदर लॉगीन वरून प्रत्येक शाळेला पासवर्ड उपलब्ध होईल.
गट साधन केंद्राकडून नवीन मोबाईल क्रमांक अपडेट करूनआपल्या शाळेचा OTP प्राप्त करून घेणे. व हा OTP टाकून आपल्या शाळेचा नवीन पासवर्ड तयार करावा.
व लॉगिन करून शाळासिध्दी माहिती भरावी.
माहिती भरण्यासाठी वेबसाईट
http://shaalasiddhi.niepa.ac.in/shaalasiddhi/Account/ShaalaSiddhiLogin
मागील वर्षाचा शाळासिद्धीचा रिपोर्ट


विषय :- शाळासिध्दी कार्यक्रमांतर्गत शाळांचे सन २०२०-२१ स्वयंमूल्यमापन पूर्ण करणेबाबत
संदर्भ :- १. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र.शैगुवि/२०१६/(१२/२०१६) एस.डी.६,
दि.३०/०३/२०१६
२. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र.शैगुवि/२०१६/(१८९/२०१६) एस.डी.६,
दि.०७/०१/२०१६
३.या कार्यालयाचे पत्र जाक्र/मराशैसंप्रप/शाळासिद्धी/२०१९-२०/४७८४ दि.०६/१२/२०१९
४.निपा,नवी दिल्ली (शाळासिद्धी कक्ष ) यांचा दि.१५/०३/२०२१ रोजीचा ई मेल
उपरोक्त संदर्भिय पत्र क्र. १ व २ नुसार राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे मूल्यांकन व प्रमाणिकरण करून घेणे व शाळांची गुणवत्ता आश्वासित करणे महत्त्वाचेअसून शैक्षणिक,भौतिक तसेच संस्थात्मक गुणवत्ता वाढीच्या उद्देशाने राज्य शासनाने राष्ट्रीय पातळीवरील शाळासिध्दी हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. त्यानुसार राज्यातील १००% शाळांचे स्वयंमूल्यमापन निपा,नवी दिल्ली यांच्या शाळासिद्धी वेबपोर्टलवर करणे आवश्यक आहे.संदर्भिय शासन निर्णयानुसार दरवर्षी राज्यातील १००% शाळांचे स्वयंमूल्यमापन करावयाचे आहे. संदर्भ क्रं ३ अन्वये आपण आपल्या जिल्हयातील शाळासिध्दी संपर्क अधिकारी (NodalOfficer) व तालुकास्तरीय शाळासिध्दी संपर्क अधिकारी यांची निवड केली आहे.संदर्भ क्र. ४ अन्वये शाळासिध्दी कार्यक्रमासाठी निपा, नवी दिल्ली यांच्याwww.shalasiddhi.niepa.ac.in या वेबपोर्टलवरील सन २०२०-२१ च्या शाळांच्या स्वयंमूल्यमापनाची
टॅब सुरु झाली आहे. सर्व शाळांनी या आपल्या शाळेचे सन २०२०-२१ मधील स्वयंमूल्यमापन पूर्ण
करून त्याची माहिती दि.२६एप्रिल,२०२१ पर्यंत शाळासिद्धी वेबपोर्टलवर भरावयाची आहे. शाळासिध्दी
कार्यक्रमाची संपूर्ण माहिती
www.shalasiddhi.niepa.ac.in वेबपोर्टलवर आहे .वेबपोर्टलचा वापर कसा करावा यासाठी वेबपोर्टलवर माहिती ( USERMANUAL) देण्यात आली आहे .यासोबत मराठी
माध्यमाची शाळासिद्धी पुस्तिका देखील उपलब्ध आहे.तसेच दि.२५/०३/२०२१ रोजी झालेले
आहे. सर्व शाळांनी सन २०२०-२१ मधील स्वयंमूल्यमापन सदर वेबिनार मधील निपा, नवी दिल्ली यांनी
दिलेल्या सूचनांनुसार पूर्ण करावे.
सन २०२०-२१ चे शाळांचे स्वयंमूल्यमापन करतांना मुख्याध्यापकांनी शाळासिध्दीची
स्वतंत्र संचिका करून त्यात USERNAME आणि PASSWORD स्वत:च्या ताब्यात ठेवावे.
मुख्याध्यापकांची बदली झाल्यास कार्यभार हस्तांतरणाच्यावेळी सदर संचिका पुढील मुख्याध्यापकाकडे
हस्तांतरीत करावी.सन २०२०-२१ चे स्वयंमूल्यमापनपूर्ण केलेल्या शाळांनी त्याची हार्ड कॉपी सदर
संचिकेत लावावी व असे दरवर्षी करावे.
तरी सर्व शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक/मनपा), शिक्षण निरीक्षक, प्रशासन अधिकारी
यांनी आपल्या अधीनस्त अधिका-यांमार्फत १००% शाळांचे स्वयंमूल्यमापन पूर्ण करून घेण्याबाबत
कार्यवाही करावी.
अशा प्रकारे 30/03/2021 रोजीचा वरील G.R.आहे.
शाळासिद्धी | शाळासिद्धी माहिती भरण्यासाठी व लॉगिन करण्यासाठीं खालील लिंकवर स्पर्श करा | मागील सर्व G.R. आणि माहितीसाठी खालील लिंकवर स्पर्श करा |
| CLICK HERE
| CLICK HERE
|
शाळासिद्धी गुण
एकून सात क्षेत्र व 46 गाभामानके आहेत.46 गाभामानकांसाठी
गुणनिश्चिती
स्तर 1 असल्यास 1 गुण
स्तर 2 असल्यास 2 गुण
स्तर 3 असल्यास 3 गुण
स्तर 3 म्हणजे चांगली स्थिती
स्तर 2 म्हणजे मध्यम स्थिती
स्तर 1 म्हणजे साधारण स्थिती
आपण जर स्तर 3 निवडला असल्यास L लिहावे
आपण जर स्तर 2 निवडला असल्यास M लिहावे
आपण जर स्तर 1 निवडला असल्यास H लिहावे
स्वयंमूल्यमापण झालेल्या प्रत्येक शाळेला कमित कमी 46 व जास्तीत जास्त 138 गुण मिळतात.
टक्केवारी
81 % ते 100 % ए ग्रेड
50 % ते 80 % बी ग्रेड
50 % पेक्षा कमी सी ग्रेड
आपल्या शाळेचा ग्रेड असा काढा
शाळासिध्दी ए ग्रेड शाळांना 138 पैकी मिळालेले गुण दर्शविले आहे. या गुणाला / पाॅईंटला 1.38 ने भाग दिल्यास टक्केवारी समजते.
उदा.
0 Comments