Ticker

10/recent/ticker-posts

राज्यस्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा 15 ऑगस्ट 2020 उत्तरपत्रिका

 1)अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्यसमर हा ग्रंथ ---------- यांनी लिहिला. *


यापैकी नाही

लोकमान्य टिळक

स्वा. विनायक दामोदर सावरकर

गोपाळ कृष्ण गोखले


उत्तर-

स्वा. विनायक दामोदर सावरकर



2)राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन-------- येथे भरवण्यात आले. *


पुणे

कोलकत्ता

लखनौ

मुंबई


उत्तर- मुंबई


3)जालियनवाला बाग हत्याकांड याचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोर यांनी सरकारने दिलेल्या--------- या किताबाचा त्याग केला *

सर

रावसाहेब

लॉर्ड

राव बहादुर


उत्तर - सर


4)वैयक्तिक सत्याग्रहाचे -------- हे पहिले सत्याग्रही होते. 

यापैकी नाही

सरदार वल्लभाई पटेल

विनोबा भावे

महात्मा गांधी


उत्तर -विनोबा भावे


5)इंडिया हाउस ची स्थापना --------- यांनी केली. 

पंडित श्यामजी कृष्ण वर्मा

कल्पना दत्त

यापैकी नाही

सुभाष चंद्र बोस


उत्तर -पंडित श्यामजी कृष्ण वर्मा


6)हंगामी सरकारचे --------- प्रमुख होते. 

पंडित जवाहरलाल नेहरू

महात्मा गांधी

लालबहादूर शास्त्री

सरदार वल्लभाई पटेल


उत्तर -पंडित जवाहरलाल नेहरू


7)दुसऱ्या गोलमेज परिषदेला राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून--------- उपस्थित होते. *


यापैकी नाही

महात्मा गांधी

गोपाळ कृष्ण गोखले

पंडित नेहरू


उत्तर - महात्मा गांधी


8)धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व --------- यांनी केले. 


महात्मा गांधी

सुभाष चंद्र बोस

सरोजिनी नायडू

लोकमान्य टिळक


उत्तर - सरोजिनी नायडू


9) 1904 साली नाशिक येथे मित्रमेळा या क्रांतिकारी गुप्त संघटनेची स्थापना कोणी केली? *


चाफेकर बंधू

विनायक दामोदर सावरकर

अनंत कान्हेरे

यापैकी नाही


उत्तर -विनायक दामोदर सावरकर


10) 1906 च्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात सर्वप्रथम स्वराज्य या शब्दाचा उच्चार झाला या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? 

लोकमान्य टिळक

राजेंद्र प्रसाद

दादाभाई नौरोजी

गोपाळ कृष्ण गोखले


उत्तर _  दादाभाई नौरोजी


11) 31 डिसेंबर 1929 रोजी रवी नदीच्या किनाऱ्यावर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तिरंगा ध्वज फडकावला व ---------- हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात यावा असे ठरले. 


26 नोव्हेंबर

26 जानेवारी

9 ऑगस्ट

15 ऑगस्ट


उत्तर - 26जानेवारी


12)चलेजाव चळवळ कोणत्या वर्षी झाली? *


1942

1935

1940

1947


उत्तर 1942


13)प्रांतिक स्वायत्तता कोणत्या कायद्याने प्रस्थापित करण्यात आली? 


1935

1919

1947

1909

उत्तर 1935


14)महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात पुणे करार केव्हा झाला? 


24 सप्टेंबर 1931

24 सप्टेंबर 1932

24 सप्टेंबर 1935

24 सप्टेंबर 1938


उत्तर  

24 सप्टेंबर 1932


15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा महात्मा गांधीजी कोठे उपस्थित होते? *


पुणे

कलकत्ता

दिल्ली

मुंबई


उत्तर कलकत्ता


16)स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? *


पंडित जवाहरलाल नेहरू

लॉर्ड माउंटबॅटन

महात्मा गांधी

यापैकी नाही


उत्तर 

लॉर्ड माउंटबॅटन


15 ऑगस्ट 2020 रोजीचा स्वातंत्र्य दिन कितवा आहे? *

73 वा

76 वा

75 वा

74 वा

उत्तर 74 वा

18)खालीलपैकी जहाल नसलेले नेते कोण आहे? *


बिपिन चंद्र पाल

सुरेंद्रनाथ बॅनर्जी

लोकमान्य टिळक

लाला लजपत राय

उत्तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी

19)चुकीचा पर्याय निवडा. 

चले जाव 1942

दुसरे महायुद्ध 1935

सविनय कायदेभंग चळवळ 1930

असहकार चळवळ 1920


उत्तर 

दुसरे महायुद्ध 1935


20)मोर्ले मिंटो सुधारणा कायदा------- मध्ये करण्यात आला. *


1909


21)चुकीचा पर्याय निवडा. *


1920 मध्ये राष्ट्रीय सभेचे अधिवेशन पुणे येथे भरले होते.


या ठरावानुसार शासकीय कार्यालय न्यायालय परदेशी वस्तू सरकारी शाळा यावर बहिष्कार घालण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला.


या अधिवेशनात चित्तरंजन दास यांनी मांडलेल्या असहकाराच्या ठरावाला मंजुरी मिळाली.


असहकाराच्या चळवळीची सर्व सूत्रे गांधीजीकडे होती .


उत्तर -1920 मध्ये राष्ट्रीय सभेचे अधिवेशन पुणे येथे भरले होते.


22)गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात -------- या देशातून केली. *


दक्षिण आफ्रिका


23)जनगणमन हे राष्ट्रगीत कोणी लिहिले? *


रवींद्रनाथ टागोर


24)भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? *


यापैकी नाही

डॉ. राजेंद्र प्रसाद

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

शंकर दयाळ शर्मा


उत्तर ( डॉ. राजेंद्र प्रसाद)


25)योग्य पर्याय ओळखा.

 A) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक बहिष्कृत भारत जनता समता अशी वृत्तपत्रे सुरू केली.

 B) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला. 

C) 1942 साली शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनच्या स्थापना केली. *

A व B बरोबर

B बरोबर

A बरोबर

सर्व पर्याय बरोबर


उत्तर ( सर्व पर्याय बरोबर)



Post a Comment

0 Comments

Total Pageviews