Ticker

10/recent/ticker-posts

SEAS PARAKH | राज्य शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण

 State Education Achievement Survey |राज्य शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण (SEAS) PARAKH २०२३







इयत्ता तिसरी सराव पेपर CLICK HERE

इयत्ता सहावी सराव पेपर CLICK HERE

इयत्ता नववी सराव पेपर CLICK HERE



विषय :- राज्य शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण (SEAS) - PARAKH २०२३ कार्यवाहीबाबत...

संदर्भ : १. राष्ट्रीय शैक्षणीक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांचे ई-मेल पत्र क्र. फा. सं ३१-६/

परख (रा.मू.के./२०२३-२४/४९ दि. ०९ ऑगस्ट २०२३

२. राष्ट्रीय शैक्षणीक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांचे ई - मेल पत्र क्र.फा. सं ३१-६

/ परख / रा.मू. के / २०२३-२४/४९ दि. २९ ऑगस्ट २०२३

३. राष्ट्रीय शैक्षणीक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांचे ई - मेल पत्र क्र.फा. सं ३१-६

/ परख / ESD / २०२३-२४ दि. २० सप्टेंबर २०२३

४. राष्ट्रीय शैक्षणीक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांचे ई-मेल पत्र क्र. फा से ३१-६/

परख / ESD / २०२३-२४ दि. २० सप्टेंबर २०२३

५. प्रस्तुत कार्यालयाचे पत्र क्र. राशैसंप्रपम/ मूल्यमापन/ SEAS / २०२३-२४/४५८१ दि. २७.०९.२०२३

६. राष्ट्रीय शैक्षणीक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांचे ई-मेल पत्र क्र. फा से ३१-६/

परख / ESD / २०२३-२४ दि. ०४ ऑक्टोबर २०२३

७. राष्ट्रीय शैक्षणीक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांचे ई-मेल पत्र दिनांक ११/१०/२०२३

८. भारत सरकार, शिक्षण मंत्रालय, शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, यांचे पत्र D.O. No.१७/०४/२०२३-IS.८ दि.२०/१०/२०२३


उपरोक्त संदर्भीय विषयांन्वये, दिनांक ०३ नोव्हेंबर २०२३ रोजी राज्य शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण (SEAS)

२०२३ - PARAKH राज्यातील काही निवडक शासकीय, शासकीय अनुदानित व खाजगी शाळांमध्ये इयत्ता ३री, ६ वी

व ९ वी मधील खालील तक्त्यात नमूद केलेल्या माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येणार आहे. सदर

सर्वेक्षणाच्या अनुषंगाने अंमलबजावणी करताना खालील बाबी विचारात घ्याव्यात.

: जिल्हा स्तर प्रशिक्षण :

जिल्हा समन्वयक व जिल्हा सहायक समन्वयक यांनी जिल्हास्तरावर तालुका समन्वयक व क्षेत्रीय

अन्वेषक यांचे प्रशिक्षण पूर्ण करावयाचे आहे व त्याचा अहवाल जिल्हा स्तरावर तयार करून ठेवावा.




सर्वेक्षणाचे वेळापत्रक :-

१) दिनांक ०२/११/२०२३- सर्वेक्षणासाठी निवडलेल्या शाळेत उपस्थित राहणे व खालील पूर्वतयारी करणे.

२) आवश्यकता असेल तर नमुना तुकडी व नमुना विद्यार्थी निवड करणे व त्याना ID क्रमांक देणे.

३) विद्यार्थी बैठक व्यवस्था पडताळणी व पूर्वतयारी करणे. ( हवेशीर व विद्यार्थ्याना योग्य उंची नुसार बेंच, व इतर सुविधा)

४) हजेरी पत्रकातील नोंदी यांची प्रत मिळविणे. TQ प्रश्नावली साठी शिक्षक निश्चिती करणे.

: दिनांक ०३/११/२०२३ खालील दिलेल्या वेळापत्रकानुसार शाळा स्तरावर क्षेत्रीय अन्वेषकांमार्फत कार्यवाही करावी.

वेळापत्रक


.



*शाळा पडताळणी:

शाळा पडताळणी संदर्भात आपणास दिलेल्या निकषानुसार बदलून आलेल्या शाळांचे

पुनरावलोकन करून तात्काळ अहवाल सदर कार्यालयास सादर करावा.

: शाळा भेटी:

१) मॉनिटरिंग परफॉर्मा (Monitoring Performa) हा तालुका समन्वयक यांच्याकडून भरून घ्यायचा आहे.

याबाबत प्रशिक्षणामध्ये सविस्तर सूचना दिलेली आहे. सदर मॉनिटरिंग परफॉर्मा ऑनलाइन स्वरूपात

आपणास पुरवण्यात आला आहे. तो तालुका समन्वयक याना पाठवण्यात यावा व त्यांच्याकडून भरून

त्याचे संकलन जिल्हा स्तरावर करून घ्यावे.




२) जिल्हास्तरावरील इतर क्षेत्रीय अधिकारी यांच्या शाळाभेटीचे नियोजन प्राचार्य, जिल्हा शिक्षण व

प्रशिक्षण संस्था व शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक व योजना यांनी एकत्र येऊन करावे. जेणेकरून

एकाच शाळेला अनेक अधिका-यांच्या भेटी होणार नाहीत याची दक्षता घेण्यात येईल.

३)सदर शाळा भेटी करताना विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. तसेच

शाळा भेटीचा अहवाल भरून त्याचे जिल्हा स्तरावर संकलन करून घ्यावे.

सर्वेक्षण साहित्य वितरण :

सर्वेक्षण साहित्याचे वितरण दिनांक २६/११/२०२३ पासून सुरू होत आहे. जिल्हास्तरावर इयत्ता निहाय व

शाळा संख्यानुसार ( या पत्रासोबत देण्यात आलेल्या जिल्हानिहाय /तालुकानिहाय/शाळानिहाय ) शाळांचे

गठ्ठे ताब्यात घेण्यात यावेत. इयत्ता तिसरी, इयत्ता सहावी आणि इयत्ता नववी असा इयत्तांचा प्रत्येकी एक गट्ठा

करण्यात आलेला आहे. त्याचे विवरण या पत्रासोबत देण्यात येत आहे.

२) तसेच जिल्ह्यांना पुरविण्यात आलेल्या गठ्यांमध्ये इयत्तानिहाय सर्व बुकलेट्स ( प्रश्नपत्रिका ), PQ

प्रश्नावली, SQ प्रश्नावली व TQ प्रश्नावली एकत्रच आहेत तसेच याच गठ्यांमध्ये बुकलेटच्या (प्रश्नपत्रिकाच्या) ३५ OMR, PQ च्या ३० OMR, SQ च्या ०२ OMR, TQ ची ०१ OMR आहेत. तसेच सर्वेक्षणानंतर साहित्य संकलन करणेसाठी ०२ रिकामे पाकिटे देण्यात आले आहेत.

३) साहित्य संकलनासाठी जी दोन रिकामी पाकिटे देण्यात आलेली आहेत त्यामध्ये सर्वेक्षणानंतर संकलन करावयाच्या साहित्याचा तपशील की जो जिल्हास्तरावर जमा करण्यात येणार आहे:-

रिकाम्या पॉकेटमध्ये पॉकेट क्रमांक ०१ मध्ये भरलेल्या ( Used ) OMR म्हणजेच बुकलेटच्या (प्रश्नपत्रिका)

AT OMR घालाव्यात.

• पॉकेट क्रमांक ०२ मध्ये PQ, SQ व TQ च्या भरलेल्या OMR तसेच फिल्ड नोट (Field Note घालाव्यात

→ तसेच न वापरलेल्या OMR, प्रश्नावल्या (PQ, SQ व TQ) BOOKLET व वापरलेल्या booklet व खराब OMR इत्यादी सर्व सर्वेक्षण साहित्य एका गठ्यात बांधाव्यात व त्याही जमा कराव्यात.

तालुका समन्वयक यांनी OMR मोजून घ्याव्यात व पाकिटे सीलबंद करून जिल्हा समन्वयक यांच्याकडे जमा

करावीत.

जिल्हा समन्वयकांनी सर्व तालुक्यांची साहित्य एकत्र करून फक्त OMR चे भरलेली पॉकेट फक्त स्कॅनिंग साठी आपणाला विभाग स्तरावर ( खालील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे ) ज्या डायटला ही जबाबदारी देण्यात आली आहे त्यांच्याकडे ही पाकिटे दि. ०४/११/२०२३ अखेर दुपारी ३.३० वाजता जमा करावीत.त्याचे नियोजन खालीलप्रमाणे असेल.








वापरलेल्या किंवा न वापरलेल्या प्रश्नपत्रिका, OMR तसेच खराब झालेल्या OMR ह्या जिल्हास्तरावर कस्टडीमध्येच ठेवाव्यात व त्या संबंधी पुढील सूचना प्राप्त होताच योग्य ती कार्यवाही करावी.

* उपस्थिती : संदर्भ क्र. ७ नुसार दिलेल्या निर्देशानुसार

१. सर्वेक्षण कालावधीत सर्व शाळामधील विद्यार्थी १००% उपस्थित राहतील याची दक्षता घेण्यात यावी.

२.ज्या शाळांना या कालावधीमध्ये सुट्टी आहे अशा शाळांमध्ये ज्या वर्गाची परीक्षा आहे त्या वर्गाला त्या दिवशी

उपस्थित ठेवण्यासाठी सांगावे.

३. शाळा सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रात भरत असतील तरीही संबंधित शाळेतील निवड झालेल्या इयत्तेला सर्वेक्षण कालावधीत सर्वेक्षणाच्या दिलेल्या वेळेतच उपस्थित राहण्याबाबत निर्देश देण्यात यावेत.

* सदर सर्वेक्षण संदर्भात जिल्हानिहाय संपादणूक वाढविण्याच्या दृष्टीकोणातून केलेली कार्यवाही व जिल्ह्याची

प्राप्त संपादणूक विचारात घेऊन सर्व जिल्हास्तरीय समन्वयक व जिल्हास्तरीय सहायक समन्वयक तसेच

तालुका समन्वयक, राज्यस्तरावरील संपर्क समिती सदस्य, पर्यवेक्षीय यंत्रणा व शिक्षक यांचे गोपनीय

अहवाल भरताना याची नोंद घ्यावी.



संपूर्ण माहिती 














विषय :- राज्य शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण (SEAS) PARAKH २०२३ अंमलबजावणी संदर्भात जिल्हास्तर समन्वयक व जिल्हा सहाय्यक समन्वयक यांचे प्रशिक्षण व सर्वेक्षणासाठी निवडलेल्या शाळेची पडताळणी करणेबाबत..

संदर्भ: १. राष्ट्रीय शैक्षणीक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांचे ई-मेल पत्र क्र. फा. सं ३१-६/परख (रा.मू. के./२०२३-२४/४९ दि. ०९ ऑगस्ट २०२३

२. राष्ट्रीय शैक्षणीक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांचे ई-मेल पत्र क्र. फा. सं ३१-६/ परख / रा.मू. के./२०२३-२४ / ४९ दि. २९ ऑगस्ट २०२३

३. राष्ट्रीय शैक्षणीक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांचे ई - मेल पत्र क्र. फा. सं ३१-६/ परख / ESD / २०२३-२४ दि. २० सप्टेंबर २०२३

४. राष्ट्रीय शैक्षणीक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांचे ई-मेल पत्र क्र. फा से ३१-६/परख / ESD / २०२३-२४ दि. २० सप्टेंबर २०२३

५. प्रस्तुत कार्यालयाचे पत्र क्र. राशैसंप्रपम/ मूल्यमापन / SEAS / २०२३-२४/४५८१ दि.२७.०९.२०२३

६. राष्ट्रीय शैक्षणीक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांचे ई-मेल पत्र क्र. फा से ३१-६/परख / ESD / २०२३-२४ दि. ०४ ऑक्टोबर २०२३

७. राष्ट्रीय शैक्षणीक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांचे ई-मेल पत्र दिनांक ११/१०/२०२३

उपरोक्त संदर्भीय विषयांन्वये, दिनांक ०३ नोव्हेंबर २०२३ रोजी राज्य शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण(SEAS) २०२३ PARAKH राज्यातील काही निवडक शासकीय, शासकीय अनुदानित व खाजगी शाळांमध्ये इयत्ता ३री, ६ वी व ९ वी मधील खालील तक्त्यात नमूद केलेल्या माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येणार आहे.


इयत्ता ३री बंगाली, इंग्रजी, गुजराती, हिंदी, कन्नड, मराठी, तमिळ, तेलगु, उर्दू ( एकूण ९ माध्यम)


इयत्ता ६ वी इंग्रजी, गुजराती, हिंदी, कन्नड, मराठी, उर्दू (एकूण ६ माध्यम)


इयत्ता ९ वी इंग्रजी, गुजराती, हिंदी, कन्नड, मराठी, तमिळ, तेलगु, उर्दू (एकूण ८ माध्यम)


करिता त्या अनुषंगाने संदर्भ क्र. २ व ३ अन्वये राष्ट्रीय शैक्षणीक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांनी सदर उपक्रमाचे वेळापत्रक या कार्यालयास पाठविले होते. त्यानुसार संदर्भ क्र. ५ अन्वये जिल्ह्यांना नियोजन कळविण्यात आले आहे. परंतु संदर्भ क्र. ६ नुसार NCERT नवी दिल्ली यांचेकडून प्राप्त पत्राद्वारे सदर सर्वेक्षणाबाबत काही बदल करण्यात आलेले होते ते जिल्ह्यांना कळविण्यात आलेले आहेत.सदर सर्वेक्षणाच्या अंमलबजावणी बाबत दिनांक ५ व ६ ऑक्टोबर २०२३ रोजी NCERT, नवी दिल्ली यांचेमार्फत राज्य समन्वयकांचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने जिल्हा समन्वयक व जिल्हा सहायक समन्वयक यांचे प्रशिक्षण दि. १८ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळ सत्रात १२.०० ते २.०० या वेळेत

ऑनलाईन स्वरुपात आयोजित करण्यात येणार आहे. जिल्हा समन्वयक व जिल्हा सहायक समन्वयक यांचेकरिता तयार करणेत आलेल्या Whatsapp group वर सदर प्रशिक्षणाची लिंक यथावकाश पाठविण्यात येईल. राज्यस्तर प्रशिक्षण झाल्यानंतर जिल्हा समन्वयक व जिल्हा सहायक समन्वयक यांनी जिल्हास्तरावर तालुका समन्वयक व क्षेत्रीय अन्वेषक यांचे प्रशिक्षण दिनांक १९ ते २३ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत पूर्ण करावयाचे आहे.

तसेच संदर्भ क्र. ७ अन्वये राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांचेकडून निवडक

शाळांची यादी (ज्या शाळांमध्ये सर्वेक्षण घेण्यात येणार आहे) या कार्यालयास प्राप्त झालेली आहे. त्या यादीतील

शाळांची खालील निकषांच्या आधारे पडताळणी करावी.

शाळा पडताळणीचे निकष :-

निवडलेल्या शाळेत इयत्ता ३ री, ६ वी, व ९ वी मध्ये सर्वेक्षणासाठी निवडलेल्या इयत्तेत) ५ किंवा ५ पेक्षा कमी विद्यार्थी असू नयेत.

सर्वेक्षणासाठी प्रतिवर्ग विद्यार्थी नमुना ( संख्या ३० ) असणे अपेक्षित आहे. परंतु ३० पेक्षा कमी किंवा ०५ पेक्षा जास्त विद्यार्थी असतील तरी त्या शाळेत सर्वेक्षणासाठी योग्य समजण्यात याव्यात.

उपरोक्त निकषांना अनुसरून जिल्हा समन्वयक यांनी NCERT, नवी दिल्ली यांचेकडून प्राप्त यादीतील शाळांची पडताळणीबाबत दिनांक १८/१०/२०२३ अखेर कार्यवाही खालीलप्रमाणे करावी.

१. जर नमुना शाळा निकषास पात्र नसेल तर evaluationdept@maa.ac.in या इ मेलवर लिखित

स्वरुपात मागणी करावी.

२. शाळा बदलताना कोणत्याही परिस्थितीत हे बदल १५% पेक्षा जास्त नसावे.

३. जर एखाद्या शाळेत सर्वेक्षणाच्या दिवशी क्षेत्रीय अन्वेषकस शून्य उपस्थिती आढळल्यास त्याने फिल्ड

नोट मध्ये माहिती नोंदवावी व ती जिल्हा समन्वयकाकडे सादर करावी.

४. सर्वेक्षणाच्या दिवशी कोणत्याही परिस्थितीत शाळा बदलण्याची परवानगी दिली जाणार नाही.

सदर निवडलेल्या शाळांची यादी ही फक्त पडताळणीसाठी असल्याने तिची गोपनीयता बाळगण्यात

यावी.

सदर सर्वेक्षणाच्या अनुषंगाने वेळोवेळी करण्यात येणा-या कार्यवाहीचे अपडेट्स ( प्रशिक्षणाची क्षणचित्रे,

व्हिडीओ) समाजमाध्यमांद्वारे अपलोड करावेत. अपलोड करीत असताना indranibhaduri,

@

#Maharashtra SEAS २०२३ आणि # PARAKH या हॅशटॅगचा वापर करावा.

सर्वेक्षणाची यशस्वी अंमलबजावणी होणेकरिता उपरोक्त सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे व सदर सर्वेक्षणाच्या अनुषंगाने जिल्हास्तरावर जिल्हा समन्वयक व जिल्हा सहायक समन्वयक यांना आलेल्या अडचणी व समस्या या सोडविण्यासाठी राज्यस्तरावर SEAS नियंत्रण कक्ष स्थापन करणेत आलेला आहे. तसेच जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर तालुका समन्वयक व क्षेत्रीय अन्वेषक यांना सर्वेक्षणाच्या अनुषंगाने येणा-या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा SEAS नियंत्रण कक्ष स्थापन करावा व त्यांच्या माध्यमातून सर्वेक्षणपूर्व, सर्वेषण कालावधीत व सर्वेक्षणा नंतर येणा-या समस्यांचे निराकरण करावे.


Post a Comment

0 Comments

Total Pageviews