School Uniform scheme | समग्र शिक्षा अंतर्गत गणवेश योजना
विषय :- समग्र शिक्षा अंतर्गत गणवेश योजना २०२३-२४ अंमलबजावणी बाबत.
उपरोक्त विषयान्वये सन २०२३-२४ अंतर्गत मोफत गणवेश योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात सन २०२१-२२ च्या U-DISE नुसार शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील लाभार्थी संख्येच्या आधारे सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश वितरण होणे आवश्यक आहे. करिता आपल्या जिल्हा परिषद / महानगरपालिका अंतर्गत शाळांमधील गणवेश पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांची मापे स्थानिक शिलाई कारागीर यांचेकडून घेण्यात यावीत.
सदरची कार्यवाही शाळांना उन्हाळी सुट्टी मिळण्यापूर्वी करण्यात यावी. ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या मापाचे गणवेश पुरविणे सोयीचे होईल.
- मोफत गणवेश बाबत शासनाचे अधिकृत पत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील चित्रावर स्पर्श करा.
(डॉ. वैशाली वीर)
उपसंचालक (प्रकल्प/प्रशासन)
मप्राशि
प, मुंबई
0 Comments