NMMS Exam Merit List 2023 | एन एम एम एस परीक्षा गुणवत्ता यादी
NMMS परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्यासाठी ११,६८२ शिष्यवृत्ती कोटा MHRD नवी दिल्ली यांचेकडून निश्चित केला आहे.
२) महाराष्ट्र राज्याच्या आरक्षणानुसार संबंधित संवर्गातील विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. तसेच संबंधित संवर्गात दिव्यांगांसाठीचे ४% आरक्षण समाविष्ट आहे.
३) सर्व जिल्ह्यांसाठी स्वतंत्रपणे इ. ७ वी व इ. ८ वी ची विद्यार्थी संख्या व १२ ते १४ वयोगटातील संख्या यांच्या आधारे जिल्हानिहाय कोटा निश्चित करण्यात आलेला आहे.
४) पात्रता गुण : MAT व SAT दोन्ही विषयात एकत्रित GEN , VJ , NTB , NTC , NTD , OBC , SBC , EWS साठी ४०% गुण व SC , ST व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ३२% गुण मिळणे आवश्यक आहेत.
५) प्रत्येक जिल्ह्यासाठीचा कोटा खालील प्रमाणे निश्चित करण्यात आलेला आहे.
१. प्रथम गुणानुक्रमे सर्वसाधारण संवर्गातील (General) पात्र विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते.
२. त्यानंतर उर्वरित ९ मागासवर्गीय संवर्गातील पात्र विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते.
३. प्रत्येक संवर्गात दिव्यांगांसाठी ४% आरक्षण देण्यात यावे. (a), (b) व (c) प्रत्येकी १% आरक्षण व (d), (e) यासाठी १% आरक्षण प्रत्येक संवर्गात स्वतंत्रपणे देण्यात आले आहे.
(a) Blindness and low vision : (BLV)
(b) Deaf and hard of hearing : (DH)
(c) Locomorors disability including cerebral palsy, leprosy cured, dwarfism, acid attack victims and muscular dystrophy : (LD)
(d) Autism, intellectual disability, specific learning disability and mental illness : (AID)
(e) Multiple disabilities from amongst persons under clauses (a) to (d) including deaf blindness in the posts identified for each disabilities : (DH)
४. दिव्यांगांसाठीचे आरक्षण निश्चित करताना त्या संवर्गात अगोदर उपलब्ध विद्यार्थी संख्येचा विचार करण्यात येतो. ४% आरक्षण पूर्तता होत नसेल तर गुणवत्ता यादीतील आवश्यक तेवढ्या शेवटच्या क्रमांकाऐवजी पुढील दिव्यांग आरक्षण संधी गुणानुक्रमे देण्यात येते.
५. सर्वसाधारण वर्गामध्ये समान दिव्यांग प्रवर्गातील विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. तसेच उर्वरित विद्यार्थी जास्तीत जास्त गुण असलेला पुढचा गुणाक्रमे दिव्यांग विद्यार्थीची निवड केली जाते.
६. एकूण २ दिव्यांग विद्यार्थ्यांची निवड करताना वेगवेगळ्या ४ प्रवर्ग गटातील गुणानुक्रमे दोन आलेल्या विद्यार्थ्यांची निवड यासाठी करण्यात येते.
७. एका दिव्यांग विद्यार्थ्यांची त्या प्रवर्गातून निवड करताना गुणानुक्रमे येणाऱ्या कोणत्याही एका विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते.
८. शेवटच्या दोन किंवा अधिक विद्यार्थ्यांना सारखे गुण असल्यास खालील क्रमाने प्राधान्यक्रम निश्चित करण्यात येतो.
a) ज्याचे गुण MAT पेपर मध्ये जास्त आहेत अशा विद्यार्थ्यास प्रथम प्राधान्य देण्यात येते.
b) MAT पेपर मध्ये समान गुण असल्यास ज्याचे गुण SAT पेपर मधील गणित विषयात जास्त आहेत अशा विद्यार्थ्यास प्राधान्य देण्यात येते.
c) SAT पेपर मधील गणित विषयात समान गुण असल्यास ज्याचे गुण विज्ञान विषयात जास्त आहेत अशा विद्यार्थ्यास प्राधान्य देण्यात येते.
d) SAT पेपर मधील गणित व विज्ञान विषयात समान गुण असल्यास ज्याचे वय जास्त आहे अशा विद्यार्थ्यास प्राधान्य देण्यात येते.
e) वय समान असल्यास आडनावाच्या इंग्रजी अद्याक्षरानुसार विद्यार्थ्यास प्राधान्य देण्यात येते.
९. शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती वितरणाचे काम शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी (माध्य.) व मा. शिक्षण संचालक (माध्य. व उच्च माध्य) यांचेमार्फत केले जाते.
गुणयादी बाबत सूचना…..
१) राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेची गुणयादी दि. १०/०८/२०२२ रोजी परिषदेच्या www.mscepune.in व https://nmmsmsce.in/ या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे.
२) सदर यादीमध्ये विद्यार्थ्यांच्या नावातील स्पेलिंग, जातीत, दिव्यंगत्वाचे व इतर काही दुरुस्ती / हरकती असल्यास शाळेमार्फत परिषदेच्या nmms.msce@gmail.com या इमेलवर दि. २२/०८/२०२२ पर्यंत कळविण्यात यावे. विहित मुदतीनंतर आलेल्या दुरुस्त्यांचा विचार करण्यात येणार नाही. विद्यार्थ्यांच्या नुकसानीस संबंधित शाळेचे मुख्याध्यापक जबाबदार राहतील.
३) प्राप्त झालेल्या सर्व दुरुस्त्यांचा विचार करून शिष्यवृत्तीसाठीची निवडयादी परिषदेच्या संकेतस्थळावर यथावकाश जाहीर करण्यात येईल.
४) सदर विद्यार्थ्यांना कार्बनलेस उत्तरपत्रिका देण्यात आली असल्याने पेपरची गुणपडताळणी केली जात नाही.
५) शिष्यवृत्तीसाठीची निवडयादी जाहीर झाल्यानंतर निवडयादीत कोणताही बदल करण्यात येणार नाही.
६) सदर परीक्षेसाठी उत्तीर्ण होण्यासाठी दोन्ही विषयात एकत्रित खाली नमूद केल्याप्रमाणे गूण मिळणे आवश्यक आहेत.
- NMMS परीक्षा गुणवत्ता यादी पाहण्यासाठी खालील चित्रावर स्पर्श करा.
0 Comments