Ticker

10/recent/ticker-posts

राज्यस्तरीय अध्ययन संपादणूक सर्वेक्षण | State Level Achievement Survey

 

राज्यस्तरीय अध्ययन संपादणूक सर्वेक्षण | State Level Achievement Survey

State Level Achievement Survey


विषय: राज्यस्तरीय अध्ययन संपादणूक सर्वेक्षण (SLAS) २०२२-२३ च्या आयोजनाबाबत....

संदर्भ: १. शासन निर्णय क्र. राप्रधो-२२१५/प्र.क्र..६९/२०१५/प्रशिक्षण, दि. १० जुलै २०१५

२. मा. संचालक, प्रस्तुत कार्यालय यांची मान्य टिपणी, दि. ३० डिसेंबर २०२२

३. शासनाचे पत्र जा.क्र. संकीर्ण-२०२२/प्र.क्र.१३४/एस.डी.-६, दि. २३ जानेवारी २०२३

४. मा. संचालक, प्रस्तुत कार्यालय यांची मान्य टिपणी, दि. ०८ फेब्रुवारी २०२३

५. या कार्यालयाचे पत्र जा.क्र. राशैसंप्रपम / मूल्यमापन/SLAS/२०२२-२३/१०९०,

दि. ०२ मार्च २०२३

६. या कार्यालयाचे पत्र जा.क्र. राशैसंप्रपम / मूल्यमापन / SLAS अग्रिम निधी/ २०२२-२३/११९०

दि. १० मार्च २०२३

७. या कार्यालयाचे पत्र जा.क्र. राशैसंप्रपम / मूल्यमापन / SLAS अग्रिम निधी लिमिट / २०२२-२३

/ ११८९, दि. १० मार्च २०२३

८. या कार्यालयाचे पत्र जा.क्र. राशैसंप्रपम / मूल्यमापन / २०२२-२३ / १३२४, दि. १६ मार्च २०२३

संदर्भीय पत्र क्र. ५ अन्वये राज्यातील इयत्ता तिसरी, पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय अध्ययन संपादणूक सर्वेक्षणा (SLAS) चे आयोजन दिनांक १७ मार्च २०२३ रोजी करण्याबाबत कळविण्यात आलेले होते. मात्र संदर्भ क्र. ८ अन्वये सदर सर्वेक्षण हे जुनी पेन्शन योजनेबाबत शासकीय व निमशासकीय कर्मचारी यांच्या बेमुदत संपामुळे दि. १७ मार्च २०२३ रोजी न घेणेबाबत कळविण्यात आलेले होते. मात्र जुन्या पेन्शन योजनेबाबत शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप दिनांक २० मार्च २०२३ रोजी मिटलेला आहे. तरी राज्यस्तरीय अध्ययन

संपादणूक सर्वेक्षणा (SLAS) चे आयोजन दिनांक २४ मार्च २०२३ रोजी करण्यात यावे.सर्वेक्षण पूर्वतयारी म्हणून दिनांक २३ मार्च २०२३ रोजी क्षेत्रीय अन्वेषक यांच्या ताब्यात सर्वेक्षण साहित्य द्यावे. दिनांक २४ मार्च २०२३ रोजी प्रत्यक्ष सर्वेक्षण करणेबाबत सूचना द्याव्यात. सर्वेक्षणाच्या दिवशी अथवा दुसऱ्या दिवशी तालुकास्तरावर सर्वेक्षण साहित्य संकलन करण्यात यावे. जिल्हास्तरावर

दिनांक २६ मार्च २०२३ रोजी सर्वेक्षण साहित्य संकलन करण्यात यावे. दिनांक २७ किंवा २८ मार्च २०२३

रोजी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे येथे जिल्हा समन्वयक यांचेमार्फत इयत्तानिहाय व शाळानिहाय वापरण्यात आलेल्या OMR शीटची पाकिटे जमा करणेबाबत अवगत करण्यात यावे. SLAS प्रश्नपत्रिका व न वापरलेल्या OMR शीट DIET स्तरावर जपून ठेवाव्यात.

इयत्तानिहाय व शाळानिहाय वापरण्यात आलेल्या OMR शीटची पाकिटे आणण्याचा वाहतूक खर्च व जिल्हा समन्वयक यांचा राज्यस्तरावर साहित्य पोहोच करण्यासाठीचा T. A. व D. A. हा कार्यालयीन

खर्चातून काढण्यात यावा.

तरी दिनांक २४ मार्च २०२३ रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय अध्ययन संपादणूक सर्वेक्षण (SLAS) बाबत जिल्हा समन्वयक, तालुका समन्वयक, क्षेत्रीय अन्वेषक, संबधित शाळा मुख्याध्यापक व शिक्षक यांना याबाबत सूचित करण्यात यावे. आपल्या जिल्ह्यामध्ये सर्वेक्षणाची यशस्वीरित्या अंमलबजावणी होईल यादृष्टीने प्रयत्न करण्यात यावे. सर्वेक्षण पूर्ण होताच जिल्हा समन्वयक यांचेमार्फत दिनांक २८ मार्च २०२३ रोजी विहित नमुन्यातील मूळ उपयोगिता प्रमाणपत्र व खर्च अहवाल परिषदेस विनाविलंबसादर करण्यात यावे.


संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण

महाराष्ट्र, पुणे.
Post a Comment

0 Comments

Total Pageviews