Ticker

10/recent/ticker-posts

राज्यस्तरीय अध्ययन संपादणूक सर्वेक्षण | State Level Achievement Survey

 राज्यस्तरीय अध्ययन संपादणूक सर्वेक्षण | State Level Achievement Survey

State Level Achievement Survey


विषय: राज्यस्तरीय अध्ययन संपादणूक सर्वेक्षण (SLAS ) २०२२-२३ च्या आयोजनाबाबत....

संदर्भ: १. शासन निर्णय क्र. राप्रधो-२२१५/प्र.क्र..६९/२०१५/प्रशिक्षण, दि. १० जुलै २०१५

२. शासनाचे पत्र जा.क्र. संकीर्ण-२०२२/प्र.क्र.१३४/एस.डी.-६, दि. २३ जानेवारी २०२३

३. या कार्यालयाचा ईमेल, दिनांक १६ फेब्रुवारी २०२३

उपरोक्त संदर्भीय विषयांन्वये राज्यातील इयत्ता तिसरी, पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची अध्ययन स्थिती जाणून घेण्यासाठी राज्यस्तरीय संपादणूक सर्वेक्षण (SLAS) चे आयोजन दि. १७ मार्च २०२३ रोजी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे, यांचेमार्फत करण्यात येणार आहे. सदर सर्वेक्षण चाचणीचे स्वरूप, दिनांक व वेळ पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आलेली आहे.









सदर सर्वेक्षण हे मराठी माध्यमासाठीच्या शाळांमध्ये होणार असून प्रथम भाषा मराठी व गणित या दोन विषयामधील अध्ययन निष्पत्तीवर आधारित असणार आहे.

संदर्भ क्र. ५ नुसार सदर सर्वेक्षणाची पूर्वतयारी म्हणून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई (मुंबई शहर व मुंबई उपनगर प्रत्येकी २ अधिकारी) या कार्यालयातील प्रत्येकी दोन अधिकारी (वरिष्ठ अधिव्याख्याता, अधिव्याख्याता) यांची जिल्हा समन्वयक (SLAS) म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. तसेच प्रत्येक तालुक्यासाठी एका तालुका समन्वयकाची नेमणूक करण्यात आलेली आहे. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व जिल्हे) व प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई यांना

जिल्हानिहाय इयत्ता तिसरी, पाचवी व आठवीच्या शाळांची यादृच्छिकपणे निवड करून यादी कळविण्यात आलेली आहे. यादीतील प्रत्येक शाळेसाठी १ याप्रमाणे क्षेत्रीय अन्वेषक (FI) यांची निवड करण्याबाबाबत कळविण्यात आलेले आहे. जिल्ह्यासाठी एकूण निवडण्यात आलेल्या क्षेत्रीय अन्वेषकांच्या संख्येनुसार ५ टक्के क्षेत्रीय अन्वेषक राखीव ठेवण्यात यावे. राज्य स्तरावरून जिल्हा समन्वयक यांना ऑनलाईन प्रशिक्षण दि. ०३ मार्च २०२३ रोजी देण्यात येईल. याबाबतची झूम लिंक जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या कार्यालयाच्या मेलवर एक दिवस अगोदर कळविण्यात येईल.

राज्यस्तरीय प्रशिक्षणानंतर जिल्हा समन्वयक यांनी तालुका समन्वयक व क्षेत्रीय अन्वेषक यांचे सर्वेक्षण विषयक प्रशिक्षण ऑनलाईन स्वरूपात द्यावे.

क्षेत्रीय अन्वेषक निवड करताना खालील व्यक्तींची निवड करण्यात यावी.

१. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील अधिकारी

२. विस्तार अधिकारी (शिक्षण)

३. केंद्र प्रमुख

४. BRC/URC साधन व्यक्ती, विशेष तज्ञ, विशेष शिक्षक

५. अध्यापक विद्यालय अध्यापाकाचार्य व छात्राध्यापक

६. आवश्यकता भासल्यास प्राथमिक शाळा मुख्याध्यापक व शिक्षक

मुख्याध्यापक व शिक्षक यांना त्यांची स्वत:ची शाळा सर्वेक्षणासाठी मिळणार नाही याची दक्षता घ्यावी. क्षेत्रीय अन्वेषक यांना मराठी भाषा अवगत असावी. त्याचबरोबर ज्या शाळा सर्वेक्षणासाठी निवडण्यात आलेल्या त्या शाळेचा पट, माध्यम याची पडताळणी करण्यात यावी. निवड झालेल्या शाळेतील संबधित वर्गाचा पट ५ किंवा ५ पेक्षा कमी असल्यास किंवा माध्यम दुसरे असल्यास तसे परिषदेस कळवावे, परिषदेकडून सर्वेक्षणासाठी शाळा बदलून दिली जाईल.

सदर सर्वेक्षणाच्या अनुषंगाने प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई यांनी जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), गट शिक्षणाधिकारी,जिल्हा समन्वयक (SLAS), प्रशासनाधिकारी, तालुका समन्वयक (SLAS) यांच्या आवश्यकतेनुसार बैठका घेऊन नियोजन व आवश्यक ती कार्यवाही परिषदेच्या सूचनेनुसार करावी. सर्वेक्षणासाठी

निवड करण्यात आलेल्या शाळांना याबाबत अवगत करावे. प्रत्यक्ष सर्वेक्षणाच्या दिवशी निवड झालेल्या इयत्तेचे सर्व विद्यार्थी हजर राहतील याची दक्षता घ्यावी. सर्वेक्षणाच्या दिवशी सर्वेक्षणासाठी निवड करण्यात आलेल्या शाळेत दहावी अथवा बारावी परीक्षा केंद्र असले तरी त्याठिकाणी सर्वेक्षण करण्यात यावे, मात्र दहावी अथवा बारावी परीक्षार्थीना डिस्टर्ब होणार नाही याची काळजी घ्यावी. किंवा सकाळ सत्रामध्ये सर्वेक्षण करण्यात यावे.

सर्वेक्षणाचे साहित्य वितरण व संकलन याबाबत जिल्हा समन्वयक ( SLAS) यांना whatsaap ग्रुपवर व मेलद्वारे कळविण्यात येईल.

अ) राज्य अध्ययन संपादणूक सर्वेक्षण (SLAS) च्या अनुषंगाने शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक यांना

द्यावयाच्या सूचना.

१. दि. १७ मार्च २०२३ रोजी राज्य अध्ययन संपादणूक सर्वेक्षण (SLAS) करण्यात येणार आहे.

२. सदर सर्वेक्षण इयता ३ री, ५ वी व ८ वी च्या वर्गांचे करण्यात येणार आहे.

३. सदर सर्वेक्षण हे तणावमुक्त वातावरणात घेण्यात येईल याची काळजी घ्यावी.

४. सदर सर्वेक्षण म्हणजे परीक्षा नाही. यातून विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्तीमधील संपादणूक

स्थिती जाणून घेतली जाणार आहे. तसेच विद्यार्थीनिहाय गुण कुठेही प्रसिद्ध केले जाणार

नाहीत.

५. यासाठी इयता ३ री, ५ वी, ८ वी चे वर्ग असलेल्या शाळा यादृच्छिक नमुना निवड पद्धतीने (Randam Sampling) राज्यस्तरावरून निवडण्यात आलेल्या आहेत.

६. कोणती शाळा व त्या शाळेतील कोणती इयत्ता निवडली गेली आहे, हे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था / प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई यांचेकडून कळविण्यात येईल.

७.यामध्ये जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका/ नगरपरिषद/ नगरपंचायत, खाजगी अनुदानित, आदिवासी विभाग, समाजकल्याण, कटक मंडळ या व्यवस्थापनाच्या शाळांचा समावेश असणार आहे.

८. शाळा प्रमुखांनी सर्वेक्षणाच्या दिवशी सकाळी आपल्या सर्व स्टाफसह शाळेच्या वेळेत शाळेत शाळेमध्ये उपस्थित राहणे अनिवार्य असेल.

९. विद्यार्थी सर्वेक्षणासाठी एका बाकावर एकच विद्यार्थी बसेल, अशी बैठकीची व्यवस्था करावी.

१०. चाचणीसाठी निवड केलेल्या व शाळेचे मूळ माध्यम असलेल्या वर्गाच्या एकापेक्षा जास्त

तुकड्या असतील तर त्यापैकी एक तुकडी यादृच्छिक नमुना निवड पद्धतीने (Random Sampling) निवडली जाईल.

११. चाचणीसाठी जास्तीत जास्त ३० विद्यार्थी यादृच्छिक नमुना निवड पद्धतीने (Random Sampling) सर्वेक्षणाच्या दिवशी निवडले जातील.

१२. निवडलेल्या वर्गात चाचणीसाठी ३० विद्यार्थी संख्येपेक्षा कमी विद्यार्थी असतील तर नमुना निवड करण्याची आवश्यकता नाही.

१३. सर्वेक्षणासाठी निवड केलेल्या शाळांमध्ये निवड केलेल्या वर्गाचे सर्व विद्यार्थी सर्वेक्षणाच्या

दिवशी १०० टक्के उपस्थित राहतील, याबाबत सूचना द्याव्यात.

१४.क्षेत्रीय अन्वेषक यांना आवश्यक ती माहिती वेळीच उपलब्ध करून द्यावी व वेळोवेळी सहकार्य करावे.

१५. सर्वेक्षण दिवशी सर्वेक्षणासाठी निवड करण्यात आलेल्या शाळेत क्षेत्रीय अन्वेषक उपस्थित राहून नमुना निवडीची प्रक्रिया संपवून विहित वेळेत सर्वेक्षण कार्य पार पाडतील. निवडलेल्या विद्यार्थ्यांना SLAS ID देऊन बैठक व्यवस्था करतील.

१६. विद्यार्थी राज्यस्तरीय अध्ययन संपादणूक चाचणीच्या उत्तराचे प्रतिसाद OMR शीटवर नोंदविणार आहेत.

१७. सर्वेक्षणासाठी पुर्वतयारीचा भाग म्हणून सर्व शाळांनी खालील माहिती तयार ठेवावी.

१) शाळा UDISE क्रमांक

२) विद्यार्थी हजेरी पत्रक

३) इयत्तानिहाय पट (मुले+ मुली)

४) मुख्याध्यापक पूर्ण नाव व भ्रमणध्वनी

५) कार्यरत शिक्षक यादी व भ्रमणध्वनी, इमेल आय. डी.

६) शाळा माध्यमः७) इयत्ता व तुकडी संख्या :८) शाळा व्यवस्थापन प्रकार

९) ग्रामीण / शहरी :१८.विद्यार्थी माहिती खालील नमुन्यात तयार ठेवावी.

इयत्ता: ३री / ५ वी / ८ वी







वर्ग शिक्षक नाव 

व स्वाक्षरी                     मुख्याध्यापक नाव

                                      व स्वाक्षरी

ब) क्षेत्रीय अन्वेषक (FI) यांचेसाठी द्यावयाच्या सूचना :

क्षेत्रीय अन्वेषक प्रस्तुत सर्वेक्षणासाठी एक जबाबदार घटक असेल ज्याने संपूर्ण सतर्कता आणि वैयक्तिक लक्ष देऊन सर्वेक्षण संबंधित खालील कार्ये व जबाबदाऱ्या पार पाडावयाची आहेत.

१. प्रत्येक क्षेत्रीय अन्वेषक (FI) सर्वेक्षणाच्या दिनी पूर्णवेळ उपस्थित असेल.

२. प्रत्येक क्षेत्रीय अन्वेषक चाचणीच्या दिवशी तसेच अगोदरच्या दिवशी तालुका व जिल्हा स्तरावरील यंत्रणेच्या संपर्कात राहील. वेळोवेळी दिलेल्या सूचनानुसार सर्वेक्षण, प्रशिक्षण व इतर अनुषंगिक कार्यवाही यशस्वीरीत्या पूर्ण करेल.

३. सर्वेक्षणासाठी कोणती शाळा दिलेली आहे, याची माहिती जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था किंवा प्रादेशिक विद्या प्राधिकरण यांचेकडून प्रशिक्षण, प्रशिक्षण साहित्य, नियुक्ती आदेश व सर्व सूचनांबाबत अद्ययावत राहतील.

४. क्षेत्रीय अन्वेषक (FI) नेमून दिलेल्या शाळेवर वेळेत हजर राहून मुख्याध्यापकास रिपोर्टिंग करतील.

व सर्वेक्षण विषयक कामकाजास सुरुवात करतील.

५. सर्वेक्षण अंमलबजावणीसाठी दिलेल्या वेळापत्रकानुसार नियुक्त नमुना शाळेत वेळेपूर्वी एक तास अगोदर उपस्थित राहतील.

६. पूर्वनिर्धारित प्रक्रियेनुसार आवश्यकता भासल्यास Randam Sampling पद्धतीने वर्गाच्या तुकडीची निवड करतील.

७. पूर्वनिर्धारित सुचनेनुसार वर्गातील विद्यार्थी ३० पेक्षा अधिक असतील तर नमुना निवड करतील.

८. निवड केलेल्या वर्गाच्या पटावरील एकूण विद्यार्थ्यांची संख्या आणि प्रत्यक्ष चाचणीच्या दिवशी उपस्थित विद्यार्थी संख्या याबाबत पडताळणी करतील.

९. क्षेत्रीय अन्वेषक OMR शीट भरणेबाबतचे प्रात्यक्षिक करून दाखवतील. OMR वरील प्राथमिक माहिती भरण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत करतील. अथवा भरण्यासाठी आवश्यक सूचना देतील. जसे की OMR खराब न करणे, घडी न पडू देणे, इ.

१०. दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार गोपनीय साहित्य उघडतील.

११. निवडलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक सूचनानुसार व विहित पद्धतीनुसार चाचणी पुस्तिका क्रमाने

वितरित करतील.

१२. अनुचित प्रकार निर्माण होणार नाही, याबाबतची खबरदारी घेतील.

१३. इयत्ता तिसरी OMR शीटवरील प्राथमिक माहिती शिक्षकांनी भरावी मात्र उत्तराचे पर्याय

विद्यार्थ्यांना भरण्यास सांगावे. आवश्यक तेथे मदत करावी मात्र उत्तराचे पर्याय सांगू नयेत.

१४. सूचनांबाबत काही प्रश्न असल्यास विद्यार्थ्यांना हात वर करण्यास सांगतील.

१५. परीक्षा कक्षात शांतता राखतील.

१६. क्षेत्रीय अन्वेषक OMR SHEET गोळा करून त्यांची अचूक मोजणी करतील. उत्तरपत्रिका (OMR)

पॅकिंग, व अन्य साहित्य मार्गदर्शक सूचनानुसार सीलबंद करतील. कोणतेही साहित्य विद्यार्थ्याकडे/वर्गात राहणार नाही याची काळजी घेतील.

१७. कागदपत्रे, साहित्याचे पॅकिंग आणि सीलिंग करताना पाकिटावरील संबंधित माहिती काळजीपूर्वक भरतील. जसे की, UDISE क्रमांक, पाकिटावर सर्वेक्षणासाठी सर्व आवश्यक नोंदी, इ. बाबी नोंदवतील.


१८. सर्वेक्षणाचे कोणतेही साहित्य सर्वेक्षणानंतर विद्यार्थी, शिक्षक किंवा मुख्याध्यापक यांचेकडे राहणार नाही याची खात्री करून सर्व साहित्य जमा करतील. चाचणी पूर्ण झाल्यानंतर सर्व सर्वेक्षण साहित्य पुरविण्यात आलेल्या पाकिटामध्ये तालुका समन्वयक / जिल्हा समन्वयक यांचेकडे सोपवतील.

१९. या सर्व कामी तालुका व जिल्हा स्तरावरील समन्वयक यांचेशी योग्य तो समन्वय राखून सर्वेक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करावे

२०.क्षेत्रीय अन्वेषक तालुका समन्वयक यांना सर्वेक्षणासाठी निवडलेल्या शाळेच्या वर्गाचा प्रत्यक्ष पट व सर्वेक्षणासाठी निवडलेले विद्यार्थी संख्या यांची माहिती तालुका समन्वयक यांना सर्वेक्षणाच्या दिवशी देतील.

क) जिल्हा / तालुका समन्वयक भूमिका

१) आपल्या जिल्हा / तालुक्यातील सर्वेक्षणासाठी निवडण्यात आलेल्या शाळांचा UDISE क्रमांक.माध्यम, पट, व्यवस्थापन प्रकार इत्यादी बाबी अचूक असल्याची खात्री करतील.

२) वर्गाची एकूण पटसंख्या ५ किंवा ५ पेक्षा कमी असल्यास वरिष्ठ कार्यालयास तसे कळवून शाळा बदलून घेतील.

३) जिल्हा / तालुका समन्वयक यांनी सर्वेक्षणाच्या दिवशी किंवा सर्वेक्षणाच्या अगोदरच्या एक दिवस आधी क्षेत्रीय अन्वेषक यांना सर्वेक्षण साहित्य ताब्यात देतील. सर्वेक्षण झालेल्या दिवशी सर्वेक्षण साहित्य जमा करून घेतील. तालुका समन्वयक यांनी शक्य असल्यास त्याच दिवशी अथवा अपवादात्मक परिस्थितीत दुसऱ्या दिवशी जिल्हा समन्वयक यांच्याकडे सर्वेक्षण साहित्य जमा करतील.

४) जिल्हा / तालुका समन्वयक / क्षेत्रीय अन्वेषक यांचेकडून सर्वेक्षण साहित्याबाबत गोपनीयता राखण्यात येईल.

५) तालुका समन्वयक सर्वेक्षणासाठी निवडलेले विद्यार्थी संख्या यांची माहिती जिल्हा समन्वयक यांना सर्वेक्षणाच्या दिवशी सकाळी वेळेत देतील.

६)जिल्हा समन्वयक हे सर्वेक्षणासाठी निवड करण्यात आलेल्या शाळेच्या सर्वेक्षणासाठीचा आवश्यक तपशीलरा ज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेस

https://docs.google.com/spreadsheets/d/1Ap8fK6Yd1NljkN1DXcay72jYGUJ2P

VN3Ubh-ECSUj6Y/edit?usp=sharing या लिंकवर दुपारी १२:०० ते १२:३० या कालावधीत भरतील.


तरी जिल्हास्तरीय कार्यालयांनी सदर सर्वेक्षण यशस्वीरित्या पार पडण्याच्या दृष्टीने आवश्यकतेनुसार बैठकांचे आयोजन व क्षेत्रीय अधिकारी यांच्या शाळाभेटीचे नियोजन करतील. याबाबत संबंधित शाळांना सर्वेक्षणाबाबत अवगत करण्यासाठी आवश्यक सूचना आपले स्तरावरून द्याव्यात.

NAS सराव पेपर

सराव पेपर

लिंक

NAS इयत्ता तिसरी पेपर 1

CLICK HERE

NAS इयत्ता तिसरी पेपर 2

CLICK HERE

NAS इयत्ता पाचवी पेपर 1

CLICK HERE

NAS इयत्ता पाचवी पेपर 2

CLICK HERE

NAS इयत्ता आठवी पेपर 1

CLICK HERE

NAS इयत्ता आठवी पेपर 2

CLICK HERE

 








Post a Comment

2 Comments

Total Pageviews