NMMS Result | एन एम एम एस निकाल
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS ) २०२२-२३ इ.८ वी साठी परीक्षा दिनांक २१ डिसेंबर २०२२ गुणयादीबाबत.
सन २००७-०८ पासून राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS)
ही मानव संसाधन विकास मंत्रालय नवी दिल्ली यांचे मार्फत राबविली जात आहे. आर्थिक मागास विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या प्रज्ञेची जोपासना, तसेच त्यांचे १२ वी पर्यंत शिक्षण पूर्ण व्हावे हा या योजनेचा गाभा आहे. प्रज्ञावान विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवृत्तीच्या स्वरुपात आर्थिक मदत करण्यात येते. सदर शिष्यवृत्ती १२ वी पर्यंत मिळते. सन २०१७-१८ पासून शिष्यवृत्तीचा दर दरमहा रु.१,०००/- (वार्षिक रु. १२,०००/- ) आहे.
इ. ८ वी तील आर्थिक दुर्बल घटकातील ज्या पालकांचे उपन्न रु. ३,५०,०००/- पेक्षा कमी आहे व जे विद्यार्थी अनुदानित शाळेत शिकत असतात त्या विद्यार्थ्यांना परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे सदर शिष्यवृत्तीचे वाटप होते.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचे मार्फत दिनांक २१ डिसेंबर २०२२ रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षेची विद्यार्थ्यांना प्राप्त गुणांची
यादी परिषदेच्या www.mscepune.in व https://nmmsmsce.in/ या संकेतस्थळावर दि. १०/०२/२०२३ रोजी पासून पाहता येईल.
सदर यादीमध्ये विद्यार्थ्याचे नाव, वडीलांचे नाव, आडनाव, आईचे नाव यामधील स्पेलिंग दुरुस्ती असल्यास (कोणत्याही परिस्थितीत पूर्ण नावात बदल केला जाणार नाही.) तसेच जन्मतारीख, जात, आधारकार्ड इत्यादीमध्ये दुरुस्ती असल्यास सदर दुरुस्ती करण्यासाठी दि. १७/०२/२०२३ पर्यंत संबंधित शाळेच्या लॉगिनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. ऑनलाईन आलेल्या अर्जा व्यतिरिक्त कोणत्याही पद्धतीने पाठविलेल्या दुरुस्त्या (टपाल, समक्ष अथवा ईमेलद्वारे) तसेच विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या दुरुस्त्या / अर्जांचा विचार केला जाणार नाही. प्राप्त सर्व दुरुस्त्यांचा विचार करुन शिष्यवृत्तीस पात्र
झालेल्या विद्यार्थ्यांची निवडयादी परिषदेच्या www.mscepune.in व https://nmmsmsce.in/ या
संकेतस्थळावर यथावकाश जाहीर करण्यात येईल.
सदर परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना कार्बनलेस उत्तरपत्रिका देण्यात आली असल्याने गुणपडताळणी केली जात नाही.
- विद्यार्थी निकाल पाहण्यासाठी खालील चित्रावर स्पर्श करा.
शाळेचा निकाल पाहण्यासाठी शाळेचा यु डायस नंबर आणि शाळेचा पासवर्ड नोंदवा. आपणास शाळेचा निकाल पाहण्यास मिळेल.
- शाळेचा निकाल पाहण्यासाठी खालील चित्रावर स्पर्श करा.
0 Comments