Ticker

10/recent/ticker-posts

शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी आठवी अंतरिम निकाल | Scholarship Exam Interim Result 2022

शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी आठवी अंतरिम निकाल | Scholarship Exam Interim Result 2022 

Scholarship Exam 5th and 8th    प्रसिद्धीपत्रक 
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी)
दि. ३१ जुलै, २०२२.
अंतरिम निकाल
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक ३१ जुलै, २०२२ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी), शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी चा अंतरिम
(तात्पुरता) निकाल सोमवार ०७ नोव्हेंबर २०२२ रोजी सायं. ०६.०० वाजता www.mscepune.in या https://www.mscepuppss.in या परिषदेच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात येत आहे. शाळांना आपल्या विद्यार्थ्यांचा निकाल त्यांच्या लॉगीनमधून तसेच पालकांना आपल्या पाल्यांचा निकाल संकेतस्थळावर पाहता येईल.

विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करून घ्यावयाची असल्यास संबंधित शाळांच्या लॉगीनमध्ये दि. ०७/११/२०२२ ते २७/११/२०२२ या कालावधीत ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. गुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक पेपरकरीता रु. ५०/- याप्रमाणे शुल्काची रक्कम ऑनलाईन पेमेंटद्वारे भरणे आवश्यक आहे.

विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, शहरी ग्रामीण अभ्यासक्रम इत्यादीमध्ये दुरुस्तीसाठी दि. १७/११/२०२२ पर्यंत संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. सदर अर्ज ऑनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पध्दतीने पाठविल्यास स्वीकारले जाणार नाहीत. विहित
मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
विहित मुदतीत आवश्यक शुल्कासह ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जानुसार गुणपडताळणीचा निर्णय संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये अर्ज प्राप्त झाल्यानंतर ३० दिवसांपर्यंत कळविण्यात येईल. विहित मुदतीत ऑनलाईन आलेले गुणपडताळणी अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल,

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 5 वी / Pre Upper Primary Scholarship Examination Std 5th (PUP) - 2022

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 8 वी / Pre Secondary Scholarship Examination Std 8th (PSS) - 2022

विद्यार्थ्यांचा निकाल

शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी आठवी विद्यार्थ्यांचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांचा बैठक क्रमांक नोंदवा. आपणास निकाल पाहण्यास मिळेल.

Interim Result 2022

Enter Candidate's Seat Number (11 Digits)   1. निकाल पाहण्यासाठी  खालील चित्रावर स्पर्श करा.


शाळेचा निकाल

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 5 वी / पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 8 वी - २०२२

Pre Upper Primary Scholarship Examination Std 5th (PUP) / Pre Secondary Scholarship Examination Std 8th (PSS) - 2022शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी आठवी शाळेचा निकाल पाहण्यासाठी शाळेचा यु डायस नंबर आणि शाळेचा पासवर्ड नोंदवा. आपणास शाळेचा निकाल पाहण्यास मिळेल.

  1. शाळेचा निकाल पाहण्यासाठी  खालील चित्रावर स्पर्श करा.

Post a Comment

1 Comments

Total Pageviews