Senior Grade and Selected Grade Training | वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाबाबत
विषय :- वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण कालावधी व महत्वपूर्ण सूचनांबाबत..
उपरोक्त संदर्भ क्र. १ अन्वये वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण २०२१-२२ दिनांक ०१ जून २०२२ पासून राज्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक/माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व मुख्याध्यापक यांचेसाठी ऑनलाईन स्वरुपात यशस्वीरीत्या सुरु आहे.
राज्यात एकूण ९४,५४१ प्रशिक्षणार्थ्यांनी वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणासाठी नावनोंदणी केलेली होती. यापैकी दिनांक १४.०७.२०२२ रोजी पर्यंत ५२,५५१ प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण झाले असून उर्वरित प्रशिक्षणार्थी आपले प्रशिक्षण पूर्ण करत आहेत. अशा उर्वरित प्रशिक्षणार्थ्यांनी आपले प्रशिक्षण दि. ३१ जुलै, २०२२ पूर्वी पूर्ण करावे.
तथापि ज्या प्रशिक्षाणार्थ्यांचे प्रशिक्षण त्यांच्या ईमेल मध्ये असणाऱ्या दुरुस्ती, प्रशिक्षण गट व प्रकार या मध्ये असणाऱ्या तुटी यामुळे उशिरा सुरु झाले आहे, अशा प्रशिक्षणार्थ्याना दुरुस्तीनंतर त्यांचे प्रशिक्षण सुरु झालेल्या दिनांकापासून पुढील ४५ दिवसात आपले प्रशिक्षण पूर्ण करावे.
तसेच सर्व प्रशिक्षाणार्थ्यांना सूचित करण्यात येते की दि. २३ व २४ जुलै, २०२२ रोजी इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड मार्फत “सेवा अद्ययावतीकरण” या तांत्रिक कारणास्तव प्रशिक्षण प्रणाली बंद असणार आहे. या दोन दिवस कृपया प्रणालीचा वापर करू नये. दिनांक २५ जुलै, २०२२ पासून प्रणाली वापरासाठी नियमितपणे सुरु असेल, तरी याची नोंद घेण्यात यावी.
सदर सूचना आपल्या कार्यक्षेत्रातील वरिष्ठ व निवडश्रेणी ऑनलाईन प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थी यांच्या निदर्शनास आणून द्याव्यात. तसेच प्रशिक्षणाच्या सर्व अद्ययावत सूचना या
https://training.scertmaha.ac.in
या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.
वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण
उपरोक्त संदर्भीय क्र. २ शासन निर्णयातील परिच्छेद क्र. २ नुसार शिक्षकांचे वरिष्ठ व निवडश्रेणी
प्रशिक्षणाचे नियोजन व संनियंत्रणाची जबाबदारी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र,
पुणे कडे सोपविण्यात आलेली आहे.
सदर प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नोंदणीकरिता परिषदेमार्फत पोर्टल विकसित करण्यात आले होते. सदरील पोर्टलवर प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व अध्यापक विद्यालय या चार गटातील पात्र शिक्षक / मुख्याध्यापक/ प्राध्यापक / प्राचार्य यांनी नोंदणी केलेली असून, सद्यस्थितीमध्ये संदर्भ क्र.३ च्या पत्रान्वये सदरचे प्रशिक्षण दिनांक १ जून, २०२२ पासून सुरु करण्यात आलेले आहे.
तथापि संदर्भ क्र. ३ च्या प्रशिक्षण पत्रान्वये सदरचे प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रशिक्षणार्थी यांना ३० दिवसांचा कालावधी देण्यात आलेला होता, तथापि सद्यस्थितीमध्ये सदरच्या प्रशिक्षणासाठीचा कालावधी हा ४५ दिवसांचा करण्यात येत आहे. यानुसार प्रशिक्षणाथ्र्यांने आपल्या कोर्सला प्रथम लॉगीन झाल्यापासून ४५ दिवसांमध्ये सदरचा कोर्स / प्रशिक्षण पूर्ण करणे अपेक्षित आहे.
https://training.scertmaha.ac.in/
प्रशिक्षणार्थी यांनी आपल्याला आपल्या प्रशिक्षणामध्ये दिलेला स्वाध्याय सांगितलेल्या स्वरूपामध्ये
(PDF/ व्हडीओ/ PPT) तयार करून सदर स्वाध्यायाचा फोल्डर आपल्या स्वतः्च्या Google Drive
/ OneDrive ला अपलोड करून या फोल्डरची लंक Get Link या पर्यायावर क्लिक करून
Restrict मध्ये Anyone Wth The Link या पर्यायाची निवड करून सदरची लिंक अभिप्रायामध्ये देण्यात आलेल्या Text Box मध्ये पेस्ट करावी.
प्रशिक्षणार्थी घटकनिहाय देण्यात आलेला स्वाध्याय आपल्या भाषेतून लिहू शकतात. तसेच स्वाध्यायाबाबतच्या आवश्यक सर्व सुचना प्रशिक्षण प्रणालीवर देखील देण्यात आलेल्या आहेत.
वरिष्ठ श्रेणी वनिवड श्रेणी प्रशिक्षण अधिकृत टेलिग्राम चॅनल वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने इन्फोसिस स्परिगबोर्ड या प्रणालीवर सुरू करण्यात आले आहे. याबाबतच्या सूचना वेळोवळी ईमेल, पत्र व
https://training.scertmaha.ac.in/
या
वेबसाईटद्वारे आपणास दिल्या जातात. तथापि अधिक माध्यमांद्वारे सर्व प्रशिक्षणार्थी यांच्यापर्यत तात्काळ पोहोचता यावे, सूचना जाव्यात यासाठी सदर प्रशिक्षणाचे अधिकृत टेलिग्राम चॅनल तयार करण्यात येत आहे. प्रशिक्षणार्थी आपल्या सोयीसाठी खालील टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकतात.
https://t.me/scertmaha
दैनिक शंका समाधान सत्र मिर्टिंग तपशील
या कार्यालयामार्फत दिनांक १ जून, २०२२ पासून सकाळी ११ : ०০ ते १२ : ०० या वेळेमध्ये प्रशिक्षणार्थी यांचेसाठी ऑनलाईन सभेच्या माध्यमातून दैनिक शंका समाधान व मार्गदर्शन सत्राचे आयोजन केले जात आहे. सदरच्या ऑनलाईन सभेमध्ये कमाल १००० व्यक्ती सहभागी होण्याची क्षमता आहे. तरी ज्या प्रशिक्षणाथ्यना प्रशिक्षणाबाबत काही समस्या अथवा अडचणी असतील तर त्यांनी खालील तपशिलाचा वापर करून सदरच्या सत्रास जॉईन होऊ शकतात.
Join Zoom Meeting
दैनिक शंका समाधान व मार्गदर्शन सत्र झूम लिंक
Meeting ID: 872 9666 0474
Passcode: SCERT
0 Comments