Ticker

10/recent/ticker-posts

NMMS Exam

 National Means cum Merit Scholarship Scheme Exam 

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS)इ.८ वी साठी 







महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद

प्रसिध्दी निवेदन

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) इ. ८ वी साठी परीक्षा दि. २१ डिसेंबर २०२२ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे- १ मार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) इ. ८ वी साठी परीक्षेचे आयोजन बुधवार दि. २१ डिसेंबर २०२२ रोजी करण्यात आले आहे. ही परीक्षा महाराष्ट्रात एकूण ५६३ केंद्रावर घेण्यात येणार असून, सदर परीक्षेसाठी महाराष्ट्रातून एकूण १९३४६ शाळा व एकूण १९६७५० विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आलेली आहे. व
परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे परिषदेच्या www.mscepune.in




या संकेतस्थळावर शाळांना शाळा लॉगिनवर दि. १२ डिसेंबर २०२२ पासून उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत. सदर प्रवेशपत्रे विद्यार्थ्यांस उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांची असेल.
सदर प्रवेशपत्रात विद्यार्थ्याचे नाव, वडीलांचे नाव, आडनाव, आईचे नाव यामधील स्पेलिंग दुरुस्ती असल्यास (कोणत्याही परिस्थितीत पूर्ण नावात बदल केला जाणार नाही.) तसेच जन्मतारीख, जात, आधारकार्ड इत्यादीमध्ये दुरुस्ती असल्यास सदर दुरुस्ती करण्यासाठी दि. २०.१२.२०२२ पर्यंत संबंधित शाळेच्या लॉगिनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. ऑनलाईन आलेल्या अर्जा व्यतिरिक्त कोणत्याही पद्धतीने पाठविलेल्या दुरुस्त्या (टपाल, समक्ष अथवा ईमेलद्वारे) तसेच विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या दुरुस्त्या / अर्जाचा विचार केला जाणार नाही. सदरच्या दुरुस्त्या परीक्षा झाल्यानंतर करण्यात येणार आहेत.

(शैलजा दराडे)
दिनांक : १२/१२/२०२२

आयुक्त,
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,
पुणे-१.

NMMS Exam

मागील वर्षाचे सराव पेपर

CLICK HERE

इतिहास

CLICK HERE

भूगोल

CLICK HERE

ना. शास्त्र

CLICK HERE

मानसिक क्षमता चाचणी

CLICK HERE



Post a Comment

0 Comments

Total Pageviews