Ticker

10/recent/ticker-posts

सरळव्याज मराठी | saral vyaj in marathi | simple interest in marathi |

 सरळव्याज मराठी | saral vyaj in marathi | Simple interest in Marathi | 
 मुद्दल : कर्ज म्हणून घेतलेल्या किंवा बँकेत काही कालावधीसाठी ठेवलेल्या रकमेला मुद्दल असे म्हणतात. 

दर : प्रत्येक वर्षासाठी (दर साल) प्रत्येक 100 रुपये मुद्दलावर (दर शेकडा) किती रक्कम व्याज म्हणून दयावी लागेल हे सांगतात. त्यालाच व्याजाचा दर म्हणतात. 

मुदत : मुद्दल ज्या कालावधीसाठी वापरले जाते. त्या कालावधीला मुदत म्हणतात.


सरळव्याज : आपण बँकेकडून घेतलेले कर्ज परत करताना घेतलेल्या रकमेपेक्षा काही जास्त रक्कम दयावी लागते किंवा आपण बँकेत काही कालावधीसाठी रक्कम ठेवल्यास बँक आपल्याला काही जास्त रक्कम देते. त्या रक्कमेस सरळव्याज म्हणतात.

 सरळ व्याज काढण्याचे सूत्र - 

सरळव्याज = 


मुद्दल x दर x मुदत 

----------------------

      100

यामध्ये सरळव्याज = ‘स', 

मुद्दल = 'म', 

दर = 'द' व 

मुदत = 'क' 

या पद्धतीने अक्षरे वापरावीत.   

    मx दxक 

   ------------

      100

           

 गणित बँक व सरळव्याज


Post a Comment

0 Comments

Total Pageviews