Ticker

10/recent/ticker-posts

Zuluk mi Vhave झुळूक मी व्हावे इयत्ता चौथी मराठी

 Zuluk mi Vhave झुळूक मी व्हावे इयत्ता चौथी मराठी 



खालील कविता वाचा आणि प्रश्नांची उत्तरे द्या.

वाटते सानुली मंद झुळुक मी व्हावे,
घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे.
कधि बाजारी तर कधी नदीच्या काठी,
राईत कधी वा पडक्या वाड्यापाठी.
हळु थबकत जावे कधि कानोसा घेत,
कधि रमत गमत वा कधी भरारी थेट.
लावून अंगुली कलिकेला हळुवार,
ती फुलुनि बघे तो व्हावे पार पसार.
परि जाता जाता सुगंध संगे न्यावा,
तो दिशादिशांतुनि फिरता उधळुनि दयावा.
गाण्याची चुकलीमुकली गोड लकेर,
झुळझूळ झऱ्याची पसरावी चौफेर.
शेतांत पाचुच्या, निळ्या नदीवर शांत,
खुलवीत मखमली तरंग जावे गात.

'दा. अ. कारे



Post a Comment

0 Comments

Total Pageviews