Themb aaj ha panyacha | थेंब आज हा पाण्याचा कविता इयत्ता सातवी मराठी
शब्द जाऊ दे, अर्थ राहू दे, विषय आहे गाण्याचा
आभाळातिल बहुमोलाचा, थेंब आज हा पाण्याचा ।।धृ.।।
मोती बनुनी सरसर येती, वर्षेमधल्या सरीतुनी
माळ ओवते, निसटुन जाते, बावरते जणू परी कुणी
या मोत्यांचा संचय कर तू, प्रश्न तुझ्या रे जीण्याचा
आभाळातिल बहुमोलाचा, थेंब आज हा पाण्याचा ।।१।।
आभाळातिल या मोत्याने, मातीमधुनी पिकती मोती
निसर्ग जाणी मोल तयाचे, तुम्ही माणसे का मग कोती?
संचय करता तिजोरीतल्या, खणखणत्या त्या नाण्यांचा
आभाळातिल बहुमोलाचा, थेंब आज हा पाण्याचा ।।२।।
कशास ऐसा वेडाचाळा, स्वत: होऊनी ठगण्याचा
दृष्टिकोन तू बदल आता रे, निसर्गास या बघण्याचा
तहानेसाठी सांग पुरे का घोट तुला रे सोन्याचा?
आभाळातिल बहुमोलाचा, थेंब आज हा पाण्याचा ।।३।।
कवयित्री - सुनंदा भावसार
वरील कविता वाचा आणि प्रश्नांची उत्तरे द्या.
0 Comments