Ticker

10/recent/ticker-posts

Science Webinar Sound 6th to 8th

  Science Webinar Sound 6th to 8th



विषय :- विज्ञान विषयाच्या ऑनलाईन कार्यशाळाबाबत...

संदर्भ:- १.शालेय शिक्षण विभाग,मंत्रालय मुंबई आणि अगस्त्या इंटरनॅशनल फौडेशन सामंजस्य करार दि.१२/१०/२०१८

२. अगस्त्या इंटरनॅशनल फौडेशन यांचे पत्र दि.१६/१२/२०२१

उपरोक्त संदर्भिय विषयांन्वये राज्यातील शिक्षकांना सहज उपलब्ध असलेल्या सामग्रीमधून विज्ञान विविध प्रयोग प्रतिकृती बनवून त्याचे प्रात्यक्षिक दाखवणे आणि वर्गामध्ये हे उपक्रम करण्यास प्रोत्साहित करण्याच्या हेतूने विज्ञान विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे व अगस्त्या इंटरनॅशनल फौडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान विषयाच्या शिक्षकांसाठी ऑनलाईन कार्यशाळा घेण्यात येणार आहेत. विज्ञान विषयामध्ये विद्यार्थ्यांना आवड निर्माण व्हावी यासाठी या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये महाराष्ट्रातील सहावी ते दहावीपर्यंत विज्ञान विषय शिकविणाऱ्या शिक्षकांना विज्ञान विषयातील निवडक संकल्पना प्रत्यक्ष कृतीतून व विविध प्रतिकृती वापरून कशा स्पष्ट कराव्यात याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. दि.०३/०१/२०२२ पासून दर सोमवारी इयत्ता सहावी ते आठवीसाठी सामान्य विज्ञान या विषयाचे अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी दुपारी ३ ते ४ आणि इयत्ता नववी ते दहावीसाठी विज्ञान व तंत्रज्ञान या विषयाचे अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी दुपारी ४ ते ५ या वेळेत तज्ञ मार्गदर्शक यांचेकडून ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन करण्यात येणार आहे.सदर ऑनलाईन कार्यशाळेसाठी युट्युब ची लिंक आणि इतर तपशील खालीलप्रमाणे आहे.



 

सदर ऑनलाईन कार्यशाळेमध्ये उर्वरित शालेय विषयांचे शिक्षक, पालक व विद्यार्थी यांना सुद्धा सहभाग घेता येईल. तरी आपल्या अधिनस्थ शाळेतील इयत्ता सहावी ते इयत्ता दहावीपर्यंतच्या विज्ञान विषयांच्या शिक्षकांसह उर्वरित शालेय विषयांचे शिक्षक, पालक आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत ही माहिती पोहोचविण्यात आणि शिक्षकांना याबाबत अवगत करून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही आपल्या स्तरावरून करण्यात यावी.
(रमाकांत काठमोरे)
सहसंचालक,
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण
परिषद, महाराष्ट्र, पुणे -३०

Post a Comment

0 Comments

Total Pageviews