Ticker

10/recent/ticker-posts

शिकू आनंदे Learn with Fun 1st to 5th 4 December

  शिकू  आनंदे (Learn with Fun)  या उपक्रमाबाबत पहिली ते पाचवी      


 उपरोक्त उपरोक्त विषयानुसार, मार्च २०२० पासून कोविडच्या
प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्व  शाळा बंद होत्या.टप्याटप्याने शाळा सुरू होत आहेत. अशा परिस्थितीत मुलांचे शिकणे सुरु रहावे, या हेतूने  राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषेदे मार्फत online पद्धतीने विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. शाळा बंद व लॉकडाऊन मुळे शहरी भागात बहुतांश मुले ही घरातच बंदिस्त होती.खेळण्याच्या वयात मुले घरात बंदिस्त झाल्याने अनेक प्रकारच्या  शारीरिक व मानसिक समस्या मुलांमध्ये  निर्माण होऊ शकतात याबाबीचा विचार करून परिषेदेच्या सामाजिक शास्र व कला क्रीडा विभागामार्फत  इ.१ ली ते ८ वीच्या वर्गात अध्ययन करणाऱ्या राज्यातील सर्व मुलांसाठी कला, शारीरिक शिक्षण व कार्यानुभव या विषयाबाबत दर शनिवारी दि.३ जुलै २०२१ पासून  online पद्धतीने *“शिकू  आनंदे ”* (Learn with Fun) हा उपक्रम  सुरू करण्यात आला आहे. 

दि. ४ डिसेंबर २०२१ रोजीच्या सत्रात  *कवायत,नृत्य,गीतगायन,लोकरकाम* या विषयांबाबत तज्ञ शिक्षकाकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. 

स.९ ते १० या वेळेत इ.१ ली ते ५ वी साठी हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. पुढील यु ट्यूब लिंकद्वारे आपणाला या कार्यक्रमात सहभागी होता येईल.

   



 
दिनकर टेमकर
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र पुणे

Post a Comment

0 Comments

Total Pageviews