Ticker

10/recent/ticker-posts

Digital Leadership for Teaching and Learning in the Classroom Training

Digital Leadership for Teaching and Learning in the Classroom


विषय :- दिनांक २३ व २४ डिसेंबर, २०२१ रोजी होणाऱ्या ऑनलाईन गुगल क्लासरूम प्रशिक्षणाबाबत..

संदर्भ:

१. शासन पत्र संकीर्ण -२०२० /प्र.क्र.८७ / एसडी-६ दिनांक ०८ जून २०२०.

२. या कार्यालयाचे पत्र जा.क्र. राशैसंप्रप / गुगल क्लासरूम /२०२०-२०२१ दिनांक ११

जुलै २०२०.

३. या कार्यालयाचे पत्र जा.क्र. राशैसंप्रपम/आय.टी./गुगल क्लासरूम नोंदणी

/२०२१/३१४० दिनांक २३ नोव्हेंबर, २०२१.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये राज्यातील मुलांचे शिक्षण थांबू नये यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून सातत्याने विविध माध्यमांचा वापर केला गेला. यानुसार संदर्भ क्रमांक.२ अन्वये प्रथम टप्प्यामध्ये राज्यातील एकूण ४०,००० शिक्षकांना ऑनलाईन स्वरूपामध्ये गुगल क्लासरूमचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. सद्यस्थितीमध्ये ग्रामीण व शहरी भागातील शाळा सुरु करण्यात आलेल्या आहेत. तरी दैनंदिन अध्यापनामध्ये विविध डिजिटल टूल्सचा प्रभावी व यशस्वी वापर शिक्षकांना करता येणे गरजेचे आहे.विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक संदर्भ साहित्य अभ्यासावयास देणे, विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करणे व विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या अध्यापनाचा, गृहपाठाचा, सूचनांचा त्याच्या सोयीच्या वेळी पाहिजे तेव्हा लाभ घेता यावा यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र व गुगल यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील शिक्षकांना अध्यापनासाठी उपयुक्त असे “Digital Leadership for Teaching and Learning in the Classroom” या विषयावरील दोन दिवसीय ऑनलाईन वेबिनारचे आयोजन दिनांक २३ व २४ डिसेंबर,२०२१ रोजी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्यामार्फत करण्यात येणार आहे.

सदरच्या वेबिनारमध्ये अध्यापनासाठी उपयुक्त अशा गुगल टूल्सच्या वापराबाबत प्रात्यक्षिकासह सविस्तर प्रशिक्षण दिले जाणार आहे. सदरच्या ऑनलाईन प्रशिक्षणाच्या युट्युब लिंक्स व QR कोड खालीलप्रमाणे,यानुसार दोन दिवसीय गुगल क्लासरूम प्रशिक्षणासाठी संदर्भ क्रमांक ३ अन्वये राज्यातील एकूण

८०,०६९ शिक्षकांनी आपली नावनोंदणी केलेली आहे. सदरच्या नोंदणी केलेल्या शिक्षकांना G suit आय.डी.राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे या कार्यालयामार्फत SMS द्वारे तसेच जिल्ह्यास PDF च्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तरी प्रशिक्षणादरम्यान व नंतर च्या कालावधीमध्ये आवश्यक प्रात्यक्षिक कामकाज प्रशिक्षणार्थी यांनी सदरच्या G suit आय.डी. चा वापर करून करावे. सदरचा Gsuit आय.डी. व पासवर्ड संबंधित प्रशिक्षणार्थी याने जतन करून ठेवण्याबाबत सूचित करण्यात यावे. तसेच प्रशिक्षण सत्रांच्या व उत्तर चाचणी पूर्ततेनंतर आपणास प्रशिक्षणार्थी यांना प्रशिक्षण प्रमाणपत्र प्राप्त होईल याचीनोंद घ्यावी.

तरी यानुसारच्या आवश्यक सूचना आपल्या स्तरावरून आपल्या जिल्ह्यामध्ये निर्गमित करण्यात याव्यात जेणेकरून सर्व नोंदणी केलेले शिक्षक सदरच्या प्रशिक्षणाचा लाभ घेऊ शकतील.

 दिवस 2 रा - 24 डिसेंबर 2021 वेळ 3 ते 5


 

गूगल क्लासरूम प्रशिक्षणाचे सर्टिफिकेट मिळण्यासाठी खालील दोन्ही लिंक भरणे आवश्यक आहे.

MH Webinar Feedback Form



Day 1 and Day 2 Assessment Form

प्रशिक्षण दिवस दुसरा 

उपस्थिती लिंक




दिवस 1 ला - 23 डिसेंबर 2021 वेळ 3 ते 5

  



ज्या शिक्षकांना G suit आय. डी. मिळाला नाही. त्यांनी खालील लिंकवर स्पर्श करून G suit आय. डी. प्राप्त करावा.



(रमाकांत काठमोरे)

सहसंचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व

प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र,पुणे.

पुढील स्पर्धेसाठी आणि आजचा अभ्यास साठी आणि शैक्षणिक माहितीसाठी खालील लिंकवर स्पर्श करून व्हॉट्स ग्रुपला जॉईन व्हा


Post a Comment

10 Comments

  1. अतिशय चांगली व उपयुक्त माहिती सर याचा फायदा विद्यार्थ्यांना माहिती सांगताना नक्कीच उपयुक्त ठरेल.

    ReplyDelete
  2. अतिशय महत्वाची माहिती

    ReplyDelete
  3. प्रमाणपत्र केव्हा मिळेल?

    ReplyDelete
  4. This comment has been removed by the author.

    ReplyDelete

Total Pageviews