शिकू आनंदे (Learn with Fun) या उपक्रमाबाबत
विषय:" *शिकू आनंदे* "(Learn with Fun) या उपक्रमाबाबत .....
उपरोक्त विषयानुसार, मार्च २०२० पासून कोविडच्याप्रादुर्भावामुळे राज्यातील सर्व शाळा बंद होत्या.टप्याटप्याने शाळा सुरू होत आहेत. अशा परिस्थितीत मुलांचे शिकणे सुरु रहावे, या हेतूने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषेदे मार्फत online पद्धतीने विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. शाळा बंद व लॉकडाऊन मुळे शहरी भागात बहुतांश मुले ही घरातच बंदिस्त होती.खेळण्याच्या वयात मुले घरात बंदिस्त झाल्याने अनेक प्रकारच्या शारीरिक व मानसिक समस्या मुलांमध्ये निर्माण होऊ शकतात, याबाबीचा विचार करून परिषेदेच्या सामाजिक शास्र व कला क्रीडा विभागामार्फत इ.१ ली ते ८ वीच्या वर्गात अध्ययन करणाऱ्या राज्यातील सर्व मुलांसाठी कला, शारीरिक शिक्षण व कार्यानुभव या विषयाबाबत दर शनिवारी दि.३ जुलै २०२१ पासून online पद्धतीने *“शिकू आनंदे ”* (Learn with Fun) हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. दि. २ ऑक्टोबर २०२१ रोजीच्या सत्रात *प्राणायाम,नृत्य,गायन,हस्तकला* या विषयांबाबत तज्ञ शिक्षकाकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. स.९ ते १० या वेळेत इ.१ ली ते ५ वी साठी हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. पुढील यु ट्यूब लिंकद्वारे आपणाला या कार्यक्रमात सहभागी होता येईल.
स.१० ते ११ या वेळेत इ. ६ वी ते ८ वी च्या मुलांसाठी कार्यक्रम संपन्न होणार असून पुढील यु-ट्यूब लिंकद्वारे सहभागी होता येईल.
याबाबत वरिष्ठ अधिव्याख्याता, गशिअ,अधिव्याख्याता, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख,विषय सहायक यांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे.तसेच whats app समूहाद्वारे आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळा व विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहचवावी.जास्तीत जास्त विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होतील याबाबत योग्य कार्यवाही करावी.
-एम.देवेंदर सिंह (भा.प्र.से.)संचालकराज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र पुणे
विषय:" *शिकू आनंदे* "(Learn with Fun) या उपक्रमाबाबत .....
उपरोक्त विषयानुसार, मार्च २०२० पासून कोविडच्या
प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्व शाळा बंद होत्या.टप्याटप्याने शाळा सुरू होत आहेत. अशा परिस्थितीत मुलांचे शिकणे सुरु रहावे, या हेतूने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषेदे मार्फत online पद्धतीने विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. शाळा बंद व लॉकडाऊन मुळे शहरी भागात बहुतांश मुले ही घरातच बंदिस्त होती.खेळण्याच्या वयात मुले घरात बंदिस्त झाल्याने अनेक प्रकारच्या शारीरिक व मानसिक समस्या मुलांमध्ये निर्माण होऊ शकतात, याबाबीचा विचार करून परिषेदेच्या सामाजिक शास्र व कला क्रीडा विभागामार्फत इ.१ ली ते ८ वीच्या वर्गात अध्ययन करणाऱ्या राज्यातील सर्व मुलांसाठी कला, शारीरिक शिक्षण व कार्यानुभव या विषयाबाबत दर शनिवारी दि.३ जुलै २०२१ पासून online पद्धतीने *“शिकू आनंदे ”* (Learn with Fun) हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. दि. २ ऑक्टोबर २०२१ रोजीच्या सत्रात *प्राणायाम,नृत्य,गायन,हस्तकला* या विषयांबाबत तज्ञ शिक्षकाकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. स.९ ते १० या वेळेत इ.१ ली ते ५ वी साठी हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. पुढील यु ट्यूब लिंकद्वारे आपणाला या कार्यक्रमात सहभागी होता येईल.
स.१० ते ११ या वेळेत इ. ६ वी ते ८ वी च्या मुलांसाठी कार्यक्रम संपन्न होणार असून पुढील यु-ट्यूब लिंकद्वारे सहभागी होता येईल.
याबाबत वरिष्ठ अधिव्याख्याता, गशिअ,अधिव्याख्याता, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख,विषय सहायक यांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे.तसेच whats app समूहाद्वारे आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळा व विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहचवावी.जास्तीत जास्त विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होतील याबाबत योग्य कार्यवाही करावी.
-
एम.देवेंदर सिंह (भा.प्र.से.)
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र पुणे
1 Comments
Ok Iam joining teachers
ReplyDelete