Ticker

10/recent/ticker-posts

Thank A Teacher

 

Thank A Teacher अभियानांतर्गत 2 ते 7 सप्टेंबर 2021 दरम्यान शिक्षक कार्य गौरव सप्ताह साजरा करणेबाबत



प्रत्येक विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षकांचे महत्व अनन्यसाधारण आहे. शिक्षक आपल्या अध्ययन अध्यापनातून व्यक्ती, समाज आणि राष्ट्राची निर्मिती करतो. त्यांच्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन जीवनात यशस्वी होण्यासाठी त्याला प्रेरणा मिळते. शिक्षण क्षेत्रांमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या शिक्षकांच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी संपूर्ण देशामध्ये दरवर्षी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या जयंतीनिमित्त ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनानिमित्त सन २०२०-२१
मध्ये Thank A Teacher अभियान राबविले होते, यावर्षी देखील शिक्षकांचा गौरव करण्यासाठी Thank A Teacher अभियानांतर्गत शिक्षक कार्य गौरव सप्ताह साजरा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय:
विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये शिक्षकाची अत्यंत महत्वाची भूमिका असते. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा गौरव केला जातो. तसेच विद्यार्थी देखील शिक्षकांविषयीच्या आपल्या भावना या दिवशी विविध उपक्रमांच्या माध्यमाद्वारे व्यक्त करत असतात. सद्यस्थितीत कोविड-१९
प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व ठिकाणी शाळा नियमितपणे सुरु करता आलेल्या नाहीत. तरी देखील
अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु रहावे यासाठी दुर्गम भागातील अनेक शिक्षकांनी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना घरी जाऊन, समुह मार्गदर्शन वर्ग आयोजित करून विविध प्रकारे मार्गदर्शन करून शेवटचा विद्यार्थी शिक्षण प्रवाहात राहण्यासाठी प्रयत्न केले आहे. विविध मार्गाने विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु ठेवण्यासाठी आणि विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहण्यासाठी शिक्षक सातत्याने प्रयत्न करत आहेत. अशा सर्व शिक्षकांविषयी आदर व आभार व्यक्त करण्यासाठी शासनाने दि.०२ सप्टेंबर २०२१ ते ०७ सप्टेंबर २०२१ या कालावधीत ThankA Teacher अभियानांतर्गत शिक्षक गौरव सप्ताह साजरा करण्याचे ठरविले आहे. राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता १ ली ते इयत्ता १२ वी मधील विद्यार्थ्यासाठी विविध शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. या कालावधीमध्ये शालेय स्तरावर निबंध लेखन, काव्य वाचन, काव्य लेखन,चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा अशा विविध उपक्रमांचे ऑनलाईन/ऑफलाईन स्वरुपात आयोजन करावे.
तसेच शिक्षकांना प्रोत्साहन मिळण्यासाठी त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात यावा. यामध्ये शाळा, विद्यार्थी,पालक, लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर व समाज यांचा सक्रीय सहभाग घेण्यात यावा.




*

विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासामध्ये शिक्षकांची अत्यंत महत्त्वाची भूमिका असते. विद्यार्थी शिक्षक दिनाच्या निमित्ताने आपल्या शिक्षकांविषयीच्या भावना विविध उपक्रमाच्या माध्यमातून व्यक्त करत असतात.    


      दिनांक 02 सप्टेंबर ते 07 सप्टेंबर 2021 या कालावधीमध्ये  *Thank A Teacher* अभियानाअंतर्गत  शालेय स्तरावर विद्यार्थ्यांकडून निबंध लेखन, काव्यवाचन, काव्यलेखन, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा अशा विविध उपक्रमाचे ऑनलाईन आयोजन करून विद्यार्थ्यांनी आपण सहभाग घेतलेल्या उपक्रमांच्या फोटोज किंवा व्हिडिओज फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम  यासारख्या समाज माध्यमांमधून #ThankATeacher, #ThankyouTeacher, #MyFavouriteTeacher, #MyTeacherMyHero, #ThankATeacher2021 या हॅशटॅगचा वापर करून आपल्या पालकांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून पोस्ट करावेत आणि त्याची लिंक व माहितीची नोंदणी SCERT, महाराष्ट्रच्या खालील प्रणालीवर करावी.


यापूर्वी अधिक माहितीसाठी व मार्गदर्शनास्तव

 

 हा  व्हिडीओ पहावा.


पोस्ट करून झाल्यावर खालील प्रणालीवर आपली नोंदणी करावी.


https://scertmaha.ac.in/thankateacher/register.aspx




राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र,पुणे


Post a Comment

0 Comments

Total Pageviews