शिकू आनंदे (Learn with Fun) या उपक्रमाबाबत
उपरोक्त विषयानुसार, मार्च २०२० पासून कोविडच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्व शाळा बंद होत्या.टप्याटप्याने शाळा सुरू होत आहेत. अशा परिस्थितीत मुलांचे शिकणे सुरु रहावे, या हेतूने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषेदे मार्फत online पद्धतीने विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. शाळा बंद व लॉकडाऊन मुळे शहरी भागात बहुतांश मुले ही घरातच बंदिस्त होती. खेळण्याच्या वयात मुले घरात बंदिस्त झाल्याने अनेक प्रकारच्या शारीरिक व मानसिक समस्या मुलांमध्ये निर्माण होऊ शकतात, या बाबीचा विचार करून परिषेदेच्या सामाजिक शास्र व कला क्रीडा विभागामार्फत इ.१ ली ते ८ वीच्या वर्गात अध्ययन करणाऱ्या राज्यातील सर्व मुलांसाठी कला, शारीरिक शिक्षण व कार्यानुभव या विषयाबाबत दर शनिवारी दि.3 जुलै 2021 पासून online पद्धतीने *“शिकू आनंदे ”* (Learn with Fun) हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. दि. 24 जुलै 2021रोजी *वर्कआउट,कागद काम व ठसे काम* या विषयाबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
स.९ ते १० या वेळेत इ.१ ली ते ५ वी साठी
हा कार्यक्रम संपन्न होणार असून पुढील यु ट्यूब लिंकद्वारे सहभागी होता येईल.
स.१० ते ११ या वेळेत इ. ६ वी ते ८ वीच्या
मुलांसाठी कार्यक्रम संपन्न होणार असून पुढील यु-ट्यूब लिंकद्वारे सहभागी होता येईल.
इ.१ ली ते ५ वीच्या विद्यार्थ्यांनी कागद कामासाठी पांढऱ्या रंगाचा कागद, स्केचपेन, कात्री, डिंक, आइस्क्रीमच्या काड्या व वर्तमानपत्रातील प्राणी-पक्ष्यांची चित्रे इत्यादी साहित्य सोबत ठेवावे. इयत्ता ६ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांनी ठसे काम या घटकासाठी पांढऱ्या रंगाचे ३ कागद, स्केचपेन, वॉटर कलर, ब्रश, झाडाची पडलेली दोन पाने व जाड दोरा इ. साहित्य सोबत ठेवावे.
दिनकर टेमकर
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र पुणे
1 Comments
ज्ञानेश्वरी संतोष हतोळकर
ReplyDelete